agriculture news in Marathi sugar mills have The challenge of complete crushing Maharashtra | Page 2 ||| Agrowon

कोरोनामुळे अंतिम टप्प्यातील ऊस हंगाम पूर्णत्वाचे आव्हान 

राजकुमार चौगुले
मंगळवार, 2 मार्च 2021

 राज्यातील गळीत हंगाम अंतिम टप्प्यात आला असताना आता या टप्प्यात कोरोनाचे संकट घोंघावत आहे. लॉकडाऊन झाल्यास अडकून पडू या भीतीने ऊसतोडणी कामगारांत अस्वस्थता पसरली आहे. 

कोल्हापूर : राज्यातील गळीत हंगाम अंतिम टप्प्यात आला असताना आता या टप्प्यात कोरोनाचे संकट घोंघावत आहे. लॉकडाऊन झाल्यास अडकून पडू या भीतीने ऊसतोडणी कामगारांत अस्वस्थता पसरली आहे. अनेक कारखान्यांच्या ऊसतोडणी मजुरांनी घरी परतण्याबाबत तगादा लावल्याने आता उर्वरित हंगाम पूर्ण करण्याचे मोठे आव्हान कारखान्यांपुढे उभे राहिले आहे. 

राज्यातील गळीत हंगाम अजून एक महिना चालेल अशी शक्‍यता आहे. यंदा ऊसतोडणी कामगार कमी आल्याने त्याचा ताण सुरवातीपासूनच साखर कारखान्यांवर जाणवला. यामुळे बहुतांशी कारखान्यांनी यंत्राने ऊसतोडणीला प्राधान्य दिले. सध्या राज्यातील कारखान्यांची शेवटच्या टप्प्यातील ऊस तोडणी सुरु आहे. यातच कोरोनाचे संकट घोंगावू लागले आहे.

सध्या राज्यात विदर्भ, मराठवाड्यात कोरोनाचे संकट गडद आहे. या भागातील अनेक जिल्ह्यांत लॉकडाऊन सुरु आहे. या पार्श्‍वभूमीवर या भागातून पश्‍चिम महाराष्ट्र व अन्य भागातील कारखान्यांकडे ऊस तोडणीसाठी आलेल्या मजुरांत भितीचे वातावरण पसरले आहे. याचा प्रतिकूल परिणाम ऊसतोडणीवर होत आहे. 

विशेष करुन पश्‍चिम महाराष्ट्रातील कारखान्यांकडे अजूनही एक ते सव्वा महिना पुरेल इतका ऊस शिल्लक आहे. अनेक ठिकाणी यंत्राने तोडणी करता येत नसल्याने त्यांना कामगारांवर अवलंबून राहावे लागणार आहे. कारखान्यांनी कामगारांची तपासणी नियमित केली असली तरी गेल्या वर्षी तब्बल दोन महिन्यांहून अधिक काळ अडकून पडलेल्या कामगारांनी गावाकडे जाण्यासाठी कारखान्यांकडे पिच्छा सुरु केला आहे. 

गेल्या वर्षी केवळ पश्‍चिम महाराष्ट्रातील सुमारे एक लाख ऊसतोडणी कामगार कारखान्यावरच अडकून पडले होते. एप्रिलच्या शेवटी शेवटी शासनाने खास निर्णय घेऊन कामगारांना विशेष गाड्यांनी त्यांच्या गावी पोचवले. यंदा मात्र पश्‍चिम महाराष्ट्रापेक्षा कामगारांच्या मूळ गावीच कोरोनाचे संकट नव्याने उभे ठाकले आहे. यामुळेच कामगारांत अस्वस्थता निर्माण झाल्याचे कारखाना प्रतिनिधींनी स्पष्ट केले. 

कारखान्यांच्या शेती विभागाची कसरत 
लवकर ऊस जात नसल्याने शेतकऱ्यांकडून तर कोरोनामुळे घरी जाण्यासाठी कामगारांकडूनचा दबाव कारखान्यांच्या शेती विभागावर येत आहे. ऊसतोडणी यंत्रणेमध्ये समन्वय साधण्यासाठी कारखान्यांच्या शेती विभागावर चांगलाच ताण येत असल्याचे चित्र बहुतांशी कारखान्यांत आहे. कामगारांच्या बैठका घेऊन त्यांची समजूत घालण्याबरोबरच शेतकऱ्यांच्या ऊसतोडणीही वेळेत पूर्ण करण्याबाबतचे नियोजन द्रुतगतीने सुरु असल्याचे चित्र कारखान्यांच्या शेती विभागात आहे. 

राज्यातील गाळप स्थिती 
सुरू कारखाने ः
१८७ 
ऊस गाळप ः ८१८ लाख टन 
साखर उत्पादन ः ८४ लाख टन 
बंद झालेले कारखाने ः ९ 
अपेक्षित गाळप ः ९५० लाख टन 
शिल्लक ऊस ः १३२ लाख टन 


इतर अॅग्रो विशेष
चैत्री यात्राही यंदा प्रतिकात्मक...सोलापूर ः कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्‍...
अवजारे उद्योगावर मंदीचे ढग पुणेः राज्यात पाच अब्ज रुपयांची उलाढाल करणाऱ्या...
फळे, भाजीपाला थेट पणन परवान्याला ६...पुणे ः कोरोना टाळेबंदीत शेतीमालाचे नुकसान होऊ नये...
देशाची साखर उत्पादनात उच्चांकी झेप कोल्हापूर ः साखर उत्पादनात देशाची घोडदौड ३०० लाख...
क्यूआर कोड रोखणार हापूसमधील भेसळ रत्नागिरी ः बाजारपेठेमध्ये ‘हापूस’ची कर्नाटक...
जालन्यात वर्षभरात ४२९ टन रेशीम कोष...जालना : येथे प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात...
राज्यात उन्हाचा चटका वाढणार पुणे : आठवडाभर पूर्वमोसमी पावसाने धुमाकूळ...
भाजीपाला विकण्याचे शेतकऱ्यांपुढे आव्हान...कोल्हापूर : ‘ब्रेक द चेन’च्या नवीन...
आठवडी बाजारांचे नेटवर्क उभारत यशस्वी...पुणे येथील नरेंद्र पवार व चार मित्रांनी एकत्र...
धान्य प्रक्रियेतून ‘संत तेजस्वी’ ची...शेतकरी गटापासून वाटचाल करीत देऊळगावमाळी (जि....
कोविडला नैसर्गिक आपत्ती घोषित करा ः...मुंबई ः राज्यातल्या ऑक्सिजन तुटवड्याच्या पार्श्‍...
उन्हाळी काकडीने उंचावले धामणखेलचे...बाजारपेठेची मागणी ओळखून धामणखेल (ता. जुन्नर. जि....
कडवंचीचे द्राक्ष आगार तोट्यात जालना : जिल्ह्यातील द्राक्षाचे आगार म्हणून ओळख...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात गारांनी...पुणे : गेल्या चार ते पाच दिवसांपासून मध्य...
सोयाबीन बियाणे वाहतुकीसाठी अट पुणे : सोयाबीन बियाणे उत्पादक कंपन्यांनी वाहतूक...
काळ्या गव्हाच्या लागवडीची...नाशिक : काळ्या गव्हामध्ये पौष्टिकता, औषधी गुणधर्म...
सांगलीत बेदाण्याचे सौदे पंधरा दिवस बंदच सांगली ः कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने सांगली...
विदर्भात आज पावसाची शक्यता पुणे : मागील आठ दिवसांपासून वादळी पावसाने अनेक...
आवारात गर्दी नियंत्रणासाठी प्रभावी...पुणे : ‘ब्रेक द चेन’ मोहिमेअंतर्गत कोरोना...
पुणे बाजार समिती शनिवार-रविवार बंद; इतर...पुणे : पुणे बाजार समिती सोमवार ते शुक्रवार...