Agriculture news in Marathi Sugar mills should take responsibility for the workers | Agrowon

साखर कारखान्यांनी कामगारांची जबाबदारी घ्यावी

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 24 सप्टेंबर 2020

राज्यातील साखर कामगारांची आरोग्याची जबाबदारी संबंधित कारखान्यांवर सोपवावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे सचिव राजेंद्र तावरे पाटील यांनी केली आहे. या बाबतचे पत्र त्यांनी साखर आयुक्तांना पाठवले आहे.

कोल्हापूर : राज्यातील साखर कामगारांची आरोग्याची जबाबदारी संबंधित कारखान्यांवर सोपवावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे सचिव राजेंद्र तावरे पाटील यांनी केली आहे. या बाबतचे पत्र त्यांनी साखर आयुक्तांना पाठवले आहे.

राज्यातील साखर कामगारांचे कोरोना पॉझिटिव्ह होण्याचे प्रमाण प्रचंड वाढत चालेले आहे. प्रत्येक साखर कारखान्यात पंधरा ते वीस साखर कामगार व त्यांच्या संसर्गाने त्यांच्या कुटुंबातील काही सदस्य कोरोनामुळे आजारी पडलेले दिसतात. काही कारखान्यावर तर कोरोनाने गंभीर आजारी पडून साखर कामगार निधन पावल्याचे सुद्धा दिसून आले आहे.

पण दुसऱ्या बाजूला राज्यातील साखर कारखाने पंधरा ऑक्टोबरला चालू करण्याची प्रत्येक कारखान्यावर घाई चालू झालेली आहे. त्यामुळे साखर कामगारांना कामावर यावेच लागत आहे. त्यासाठी ले ऑफ देऊन पगारी सुट्ट्या वगैरे इतर कोणत्याही तरतुदी साखर कारखान्याच्या व्यवस्थापनाने केलेल्या दिसून येत नाहीत. कोरोनाचे संकट साखर कामगारांवर वाढतच चालले आहे. कारखान्यांच्या व्यवस्थापनाचे मात्र याकडे लक्ष नाही त्यांचा हंगाम चालू करण्याच्या दृष्टीने कामगारांवर रोज दबाव वाढतानाच दिसून येत आहे.

साखर कामगार कोरोनाने आजारी पडला किंवा त्यांच्या सहवासाने त्यांच्या कुटुंबातील सदस्य कोरोनाने आजारी पडले तर त्यांच्या सर्व कुटुंबाच्या दवाखान्याची आर्थिक खर्चाची जबाबदारी कारखान्यांना द्यावी. या काळात घरातील सदस्यामुळे किंवा स्वतः आजारी पडल्याने क्वारंटाइन-विलीनीकरण व्हावे लागले तर त्या कामगाराला त्या काळातील संपूर्ण दिवसांची पगारी रजा देण्यात यावी.

कारखान्यात कामावर असलेल्या कोणत्याही मग तो कायम कामगार, हंगामी किंवा रोजंदारी, कंत्राटी, बदली, सिव्हिल कामगार व त्यांचे कुटुंबातील सदस्यांचे साखर कामगाराच्या सहवासानेच संसर्ग होऊन कोरोना झाल्यामुळे त्यांचे निधन झाल्यास कामगाराला व त्यांच्या कुटुंबास त्या-त्या साखर कारखान्याकडून रुपये दहा लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी पत्रात करण्यात आलेली आहे.


इतर ताज्या घडामोडी
किसान रेल्वेने सांगलीतून हळद जाणार इतर...सांगली ः किसान रेल्वेतून शेतकऱ्यांसह, उद्योग आणि...
वऱ्हाडात पीएम किसानचे साडे तेरा कोटी...अकोला ः पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेच्या मदतीस...
चिपळूणात साडेसात हजार शेतकऱ्यांना...रत्नागिरी ः परतीच्या पावसाने चिपळूण तालुक्यातील...
रिसोड बाजारात सोयाबीनची विक्रमी आवकवाशीम ः रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सोलापूर जिल्ह्यात मदतीसाठी ३३५ कोटींची...सोलापूर : अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे जिल्ह्यातील...
अकोल्यात शेतकरी करणार दोन लाख क्विंटल...अकोला ः गेल्या काही हंगामापासून सोयाबीन...
संत गाडगेबाबा सूतगिरणी सुरू करावी ः...अमरावती : कापूस उत्पादकांना दिलासा देण्यासाठी...
पुणे जिल्ह्यातील सगळी धरणे तुडूंबपुणे ः चालू वर्षी ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये...
भंडाऱ्यात ७९ धान खरेदी केंद्रांना मंजुरीभंडारा ः केंद्र सरकारच्या किमान आधारभूत खरेदी...
सोलापूर जिल्ह्यात रास्त भाव दुकानांना...सोलापूर : ‘‘जिल्ह्यात राष्ट्रीय अन्नसुरक्षा...
खानदेशात ३१ हजार हेक्टरवर गव्हाची पेरणी...जळगाव ः खानदेशात यंदा गव्हाची पेरणी सुमारे दोन...
परभणी जिल्ह्यात सतरा हजार क्विंटल...परभणी : ‘‘यंदाच्या रब्बी हंगामातील पेरणीसाठी...
शेतकऱ्यांना सरकारकडून मदतीची प्रतीक्षातऱ्हाडी, जि. धुळे : वरुणराजाच्या लहरीपणामुळे पिके...
नाशिक जिल्ह्यात लिलाव बंदमुळे शेतकरी...नाशिक : मागील वर्षी हवामान बदल, अवकाळी पाऊस व...
‘कृषी स्वावलंबन योजनेसाठी ऑनलाइन अर्ज...परभणी : ‘‘बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना आणि डॉ....
सोयाबीन बियाणे विक्रेत्यांविरुध्द ...अकोला ः यंदाच्या खरिपात सोयाबीन बियाणे उगवले...
शोषणाविरोधात एकवटले संत्रा उत्पादक अमरावती : व्यापाऱ्यांचा शोषणाविरोधात एल्गार...
कांदा साठा मर्यादा वाढविण्याची मागणी नाशिक: कांदा साठा मर्यादा घालून दिल्याने...
दुधाळ जनावरांच्या व्यवस्थापनाची सूत्रेगोठ्याच्या भोवतालच्या परिसरात दलदल आणि जास्त गवत...
पौष्टिक चाऱ्यासाठी बरसीम लागवड ठरते...द्विदल हिरव्या चाऱ्याची उपलब्धता हा...