Agriculture news in Marathi Sugar price hike by Rs 200 | Agrowon

साखरच्या दरात २०० रुपयांनी वाढ

राजकुमार चौगुले
शुक्रवार, 20 ऑगस्ट 2021

गेल्या वर्षभरापासून क्विंटलला ३१०० रुपयांच्या आसपास असणारे साखरेचे दर गेल्या पंधरा दिवसांत वाढत जाऊन ३३०० रुपये झाले आहेत. नजीकच्या काळात ३५०० रुपये पर्यंत दरात वाढ होण्याची शक्यता साखर उद्योगातील सूत्रांनी व्यक्त केली.

कोल्हापूर : आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे दर वाढत आहेत. याचा सकारात्मक परिणाम स्थानिक साखर विक्रीच्या दरावर होत आहे. गेल्या वर्षभरापासून क्विंटलला ३१०० रुपयांच्या आसपास असणारे साखरेचे दर गेल्या पंधरा दिवसांत वाढत जाऊन ३३०० रुपये झाले आहेत. नजीकच्या काळात ३५०० रुपये पर्यंत दरात वाढ होण्याची शक्यता साखर उद्योगातील सूत्रांनी व्यक्त केली.

यंदाच्या साखर हंगामाच्या पार्श्‍वभूमीवर साखर उद्योगाकडून साखरेच्या किमान विक्री दरात शासनाने वाढ करावी, अशी मागणी सातत्याने होत होती. परंतु सरकारने निर्णय घेण्याआधीच बाजारातील साखरेचे दर वाढत असल्याने साखर कारखान्यांना अनपेक्षित सुखद धक्का बसला आहे. साखरेचे दर वाढत असल्याने अनेक कारखान्यांनी जुनी साखर ही बाजारात आणण्यास सुरुवात केली आहे. शिल्लक साखरेचा साठा कमी होत असल्याने याचा सकारात्मक परिणाम यंदा सुरू होणाऱ्या साखर हंगामावर होणार आहे.

साखरेच्या दरात आणखी शंभर दोनशे रुपये वाढ झाल्यास व साखरेची विक्री वेगात झाल्यास यंदाच्या हंगामासाठी साखर कारखान्यांना बँकेवर कमी अवलंबून राहावे लागेल. हे कारखान्यांना फायदेशीर ठरेल, अशी शक्यता साखर कारखाना प्रतिनिधींनी व्यक्त केली. 

भारताला निर्यातीला वाव
आंतरराष्ट्रीय बाजार आणि व्यापार स्रोतांकडून आलेल्या अहवालांनुसार, ब्राझीलमध्ये सध्या सुरू साखर हंगामात साखर उत्पादनावर वाईट परिणाम झाला आहे. दुष्काळामुळे साखर उत्पादन कमी होत आहे. याचा परिणाम दर वाढण्यावर होत आहे. ब्राझीलमध्ये पुढील साखर हंगाम एप्रिल २०२२ मध्ये सुरू होईल. या हंगामात ही साखर उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे. बाजारातील सूत्रांनुसार थायलंडमध्ये साखरेचे उत्पादन यंदा जास्त राहण्याची शक्यता आहे. पण ही साखर जानेवारी २०२२ नंतर येईल. तोपर्यंत भारताला साखरनिर्यातीला वाव आहे.

 केंद्राचा यंदाच्या हंगामाबाबतचा अंदाज
केंद्राच्या अंदाजानुसार मागील हंगामातील शिल्लक साखर ९० लाख टन इतकी आहे. यंदा  ३४० लाख टन साखर (इथेनॉलनिर्मितीची साखर वगळून) तयार होईल. मागील वर्षासह यंदा उपलब्ध साखर ४३० लाख टन असेल. स्थानिक बाजारात २६५ लाख टन साखर विक्री होऊ शकते. निर्यात अथवा इथेनॉलनिर्मिती झाली नाही, तर १६५ लाख टन साखर पुढील हंगामासाठी शिल्लक राहू शकते. शिल्लक साखर कमी राहावे यासाठी निर्यात व इथेनॉलनिर्मिती दोन्ही महत्त्वाच्या बाबी असल्याचे केंद्राने स्पष्ट केले आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात वाढणारे साखरेचे दर स्थानिक बाजारातील साखरेच्या दराची तेजी वाढवण्यास कारणीभूत ठरत आहेत. सध्याची परिस्थिती पाहता पुढील काही महिने साखरेचे दर चांगले राहण्याची शक्यता आहे. कारखान्यांनी निर्यात करताना या बाबी लक्षात घेऊन जादा साखर निर्यात केल्यास ते उद्योगासाठी फायदेशीर ठरू शकेल. 
- अभिजित घोरपडे, साखर निर्यातदार


इतर अॅग्रोमनी
सोयाबीनः सावध, ऐका पुढल्या हाका जगाची लोकसंख्या २०५० साली १० अब्ज...
सहकाराला मारक कायदे बदलण्याला प्राधान्य राज्यातील सहकारी बॅंकिंग व्यवस्थेचे अभ्यासक...
कापूस वायदा सरकारी रडारवरदेशात ऑगस्ट ते डिसेंबर या कालावधीत एकंदर नऊ कृषी...
सोयापेंडीच्या मागणीमुळे सोयाबीनचे दर...पुणे ः बाजारात सध्या सोयाबीन दर एका भावपातळीवर...
cotton market: पांढरं सोनं उद्योगाच्या... पुणे ः कापसाचे दर वाढल्याची हाकाटी पिटत कापड...
कृषी तंत्रज्ञान क्षेत्रातील गुंतवणूक १...देशभरातील कृषी तंत्रज्ञान क्षेत्रातील स्टार्ट...
हळद दराची वाटचाल दहा हजार रुपयांकडेनागपूर : लांबलेला पावसाळा, त्यामुळे शिवारात...
नाशिकमधील उन्हाळ कांद्याचा साठा अखेरीकडेनाशिक : फेब्रुवारी २०२१पासून उन्हाळ कांद्याची...
‘मँगोनेट’ अंतर्गत सात वर्षांत ४, ५६६... रत्नागिरी : हापूसची परदेशात निर्यात होऊन येथील...
साखर उत्पादनाची शतकी मजलकोल्हापूर : देशात यंदाचा साखर हंगाम सुरू...
हरभऱ्याची भिस्त नाफेडच्या खरेदीवरकमी मागणी, आयातीमुळे हरभरा दर दबावात पुणे -...
प्रयोग, वैविध्यपूर्ण फळबागेतून अर्थकारण...मांजर्डे (जि. सांगली) येथील उमेश पवार यांनी...
देशातील तूर उत्पादनात मोठी घटपुणे : देशात तूर पिकाला यंदा सततचा पाऊस, मर रोग,...
खर्चात बचत हाच नफ्याचा पायानांदेड शहरापासून ३० किलोमीटरवरील दापशेड (ता. लोहा...
बाजारातील असंतुलनामुळे सोयाबीनची दरवाढपुणे ः जागतिक बाजारात सध्या सोयाबीन दरात झालेली...
कापूस आवक वाढूनही दर स्थिरावले जळगाव ः  कापड उद्योगातील वाढती महागाई व...
सोयाबीनमधील तेजी कायम पुणे ः आवक कमी मात्र मागणी जास्त असल्याने देशातील...
सोयाबीन दरात सुधारणा पुणे ः सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी यंदा...
आयात उडदाला ग्राहक मिळेना पुणे : देशात यंदा उडीद उत्पादनात घट झाली मात्र...
तुरीचे दर स्थिरावले; नवीन तूर पुढील...पुणे : देशातील नवीन तूर डिसेंबरपासून बाजार येणार...