agriculture news in Marathi sugar production decreased by 26 percent Maharashtra | Agrowon

देशात साखर उत्पादनात २६ टक्के घट

कोजेन्सिस वृत्तसेवा
सोमवार, 20 जानेवारी 2020

नवी दिल्ली ः देशात १५ जानेवारीपर्यंत ४४० साखर कारखान्यांचे ऊस गाळप सुरू होते. या कारखान्यांनी १ ऑक्टोबर ते १५ जानेवारीदरम्यान १०८.८ लाख टन साखर निर्मिती केली आहे. गेल्या वर्षी याच काळातील उत्पादनाच्या तुलनेत २६.२ टक्क्यांनी घट झाली आहे, अशी माहिती इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (इस्मा) प्रसिद्ध केलेल्या पत्रकातून मिळाली.  

नवी दिल्ली ः देशात १५ जानेवारीपर्यंत ४४० साखर कारखान्यांचे ऊस गाळप सुरू होते. या कारखान्यांनी १ ऑक्टोबर ते १५ जानेवारीदरम्यान १०८.८ लाख टन साखर निर्मिती केली आहे. गेल्या वर्षी याच काळातील उत्पादनाच्या तुलनेत २६.२ टक्क्यांनी घट झाली आहे, अशी माहिती इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (इस्मा) प्रसिद्ध केलेल्या पत्रकातून मिळाली.  

देशात यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी कारखान्यांनी गाळप सुरू केले होते. १५ जानेवारीपर्यंत ४४० साखर कारखान्यांकडून गाळप केले गेले. तर मागील वर्षी याच काळात ५११ साखर कारखाने सुरू होते. साखर उत्पादनात अग्रेसर असलेल्या उत्तर प्रदेशात यंदा ११९ साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले होते. मागील वर्षी याच काळात ११७ साखर कारखाने सुरू होते. उत्तर प्रदेशातील साखर कारखान्यांनी १५ जानेवारीपर्यंत ४३.८ लाख टन साखर निर्मिती केली होती. तर मागील वर्षी याच काळात ४१.९ लाख टन साखर उत्पादन झाले होते. यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत साखर उत्पादन वाढले आहे. 

कर्नाटकातील ६३ साखर कारखान्यांनी २१.९ लाख टन साखर उत्पादन घेतले. गेल्या वर्षी याच काळात ६५ साखर कारखान्यांनी २६.८ लाख टन साखर उत्पादन घेतले होते. कर्नाटक साखर उत्पादनात उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रानंतर तीन नंबरवर आहे. देशातील साखर कारन्यांकडे २०१८-१९ मधील हंगामातील साडेचार हजार कोटी रुपयांची थकबाकी आहे. 

महाराष्ट्रात साखर उत्पादनात ५५ टक्के घट
देशातील साखर उत्पादनातील नंबर दोनवर असलेल्या महाराष्ट्रात यंदा उसाची उपलब्धता कमी असल्याने साखर उत्पादन घटले आहे. यंदा राज्यातील साखर उत्पादन गेल्या वर्षीच्या तुलनेत ५५.४ टक्क्यांनी घटले आहे. एक ऑक्टोबर ते १५ जानेवारीदरम्यान राज्यात २५.५ लाख टन साखर उत्पादन झाले आहे. राज्यात या काळात १३९ साखर कारखान्यांनी गाळप केले. मागली वर्षी याच काळात १८९ साखर कारखान्यांचे गाळप सुरू होते. नगर, बीड आणि औरंगाबाद जिल्ह्यातील प्रत्येकी एक साखर कारखाना ऊस उपलब्धतेअभावी बंद पडले आहेत, अशी माहिती ‘इस्मा’ने दिली. 

१५६ कोटी इथेनॉल पुरवठा होणार
‘इस्मा’ने म्हटले आहे, की देशातील साखर कारखान्यांनी तेल कंपन्यांशी पहिले करार केल्याप्रमाणे १५६ कोटी लिटर इथेनॉलचे उत्पादन होणार आहे. करार झालेल्या १५६ कोटी लिटर इथेनॉलपैकी सहा हजार १६३ लाख लिटर इथेनॉल हे बी-हेव्ही मोलॅसिसपासून बनविले जाणार आहे. तर, १०६० लाख लिटर इथेनॉल थेट उसाच्या रसापासून बनविले जाणार आहे. 

राज्यनिहाय साखर उत्पादन (लाख क्विंटलमध्ये)

राज्य  २०१९-२०   २०१८-१९  बदल (टक्के) 
उत्तर प्रदेश ४३.७८  ४१.९३ ४.४ 
महाराष्‍ट्र    २५.५१   ५७.२५  (-)५५.४ 
कर्नाटक  २१.९०  २६.७६    (-)१८.२ 
गुजरात  ३.७२  ५.४२ (-)३१.४ 
तमिळनाडू   १.५०  २.२९    (-)३४.५ 
आंध्र प्रदेश  १.८५  २.८५  (-)३५.१

        


इतर अॅग्रोमनी
अन्नधान्याचे यंदा विक्रमी उत्पादन नवी दिल्ली: देशात यंदा खरीप हंगामात...
राज्यातील रेशीम बाजारात १० कोटींची...नागपूर ः राज्यात रेशीमकोष खरेदी बाजारपेठेला...
आर्थिक निर्णयांनी वाढवला प्रियंकाताईंचा...पती गौरव काकडे यांच्या आग्रहावरून पुणे शहरातील...
गेल्या वर्षीच्या साखर निर्यातीसाठी...कोल्हापूर : गेल्या वर्षीची (२०१८-१९) साखर निर्यात...
आंतरराष्ट्रीय डाळ परिषदेकडे उद्योजकांचे...पुणे  : जागतिक कडधान्य उत्पादन व बाजारपेठेला...
कच्च्या साखरेच्या दरात उच्चांकी वाढकोल्हापूर : जागतिक बाजारात कच्च्या साखरेच्या दरात...
साखरेच्या दुहेरी किमतीसाठी सूत्र तयार...नवी दिल्ली: साखरेचे घसरणारे दर स्थिर...
आंतरपिकांतून कुटुंबाचे अर्थकारण केले...माचले (ता. चोपडा, जि. जळगाव) येथील दीपक माणिक...
खानदेशात १२ लाख गाठी बाजारात कापसाची आवकजळगाव : कापसाची खेडा खरेदी मागील आठवड्यात...
ब्राझील भारताकडून गव्हासह भरडधान्य...नवी दिल्ली: दोन्ही देशांच्या कृषिमंत्र्यांमध्ये...
हरभरा, सोयाबीन वगळता सर्व पिकांच्या...खरीप पिकाच्या उत्पादनात जरी घट अपेक्षित असली तरी...
खाद्यतेल आयात शुल्क कमी कराः ग्राहक...नवी दिल्ली: देशांतर्गत वाढलेले खाद्यतेलाचे...
खाद्यतेल बाजारात सटोडियांकडून खोड्याचा...पुणे : खाद्यतेलासह तेलबिया वायदे बाजारात सध्या...
नव्या बेदाण्यास १७५ रुपये दर तासगाव, जि. सांगली ः तासगाव कृषी उत्पन्न बाजार...
कापड गिरण्या बाजारातून कापूस खरेदीस...मुंबई ः साउथ इंडियन मिल्स असोसिएशनने केंद्रीय...
देशात साखर उत्पादनात २६ टक्के घटनवी दिल्ली ः देशात १५ जानेवारीपर्यंत ४४० साखर...
साखर दराची दुहेरी पद्धत ठरवाकोल्हापूर : साखर उद्योगाला बळकटी आणण्यासाठी...
जालन्यात रेशीम कोषाला मिळाला ५०० रुपये...जालना : येथील बाजार समितीच्या आवारात रेशीम कोष...
तादंळाच्या आफ्रिकेतील बाजारपेठेवर चीनचा...नवी दिल्ली : तांदळाची आयात करणारा देशच आता...
खान्देशची केळी निर्यातीत आघाडीकेळीने जगात जळगावला मोठी ओळख दिली आहे. ही ओळख...