देशातील साखर उत्पादन वीस टक्‍यांनी घटले 

देशात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा साखरेच्या उत्पादनात ६४ लाख टनाची घट झाली आहे.
sugar
sugar

कोल्हापूर: देशात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा साखरेच्या उत्पादनात ६४ लाख टनाची घट झाली आहे. गेल्या वर्षीपेक्षा उत्पादनात वीस टक्‍यांनी कमी झाल्याचे इस्माच्या सुत्रांनी सांगितले. 

गेल्या वर्षीपेक्षा देशातील हंगामही यंदा कमी काळ चालण्याची शक्‍यता आहे. गेल्या वर्षी १५ एप्रिलअखेर १७२ साखर कारखाने सुरु होते. यंदा याच कालावधीत १३९ कारखाने सुरु आहेत. देशात १५ एप्रिलपर्यंत २४७ लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. गेल्यावर्षी याच कालावधती ३११ लाख टन साखर उत्पादित झाली होती. महाराष्ट्र, कर्नाटकातील साखर कारखाने वेगाने बंद होत आहेत. पंधरा एप्रिलनंतर राज्यात १४६ पैकी १३६ कारखान्यांनी आपला हंगाम पूर्ण केला आहे. येत्या आठवड्याभरात राज्यातील सर्व कारखाने बंद होण्याची शक्‍यता आहे.  इस्माने दिलेल्या माहितीनुसार उत्तरप्रदेशात सर्वाधिक १०८ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. या खालोखाल महाराष्ट्रोत ६० लाख तर कर्नाटकात ३३ लाख टन साखर निर्मिती झाली आहे. कर्नाटकातील उस हंगाम संपला आहे. 

कोरोनामुळे अंतिम टप्प्यात अडचणी  कोरोनाच्या संकटाने गेल्या महिन्याभरात देशात भीतीचे वातावरण आहे. याचा परिणाम कारखान्यांच्या गळीत हंगामावरही झाला असल्याचे साखर उद्योगाच्या सुत्रांनी सांगितले. अनेक ठिकाणी लॉकडाऊन सुरु होण्याअगोदर उस तोड कामगारांनी आपल्या घराकडे धाव घेतल्याने हंगाम रेंगाळला. तर महाराष्ट्रासारख्या राज्यात लाखोंच्या संख्येने ऊसतोडणी कामगार कारखान्यांच्या ठिकाणी अडकले आहेत. हंगाम अंतिम टप्यात येत असताना पश्‍चिम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी हजारो हेक्‍टर ऊस शिल्लक रहाण्याची शक्‍यता निर्माण झाली. यामुळे बऱ्याच ठिकाणी ऊसतोडणी तातडीने उरकण्यासाठी ऊस पेटवून तोडण्याचेही प्रकार घडले. यामुळे उत्पादकांना मोठा तोटा सहन करावा लागला. अंतिम टप्प्यात कारखान्यांचे नियंत्रण न राहिल्याने ऊसाची तोड होताना उत्पादकांना मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत.  साखरेच्या उठावाअभावी कारखाने हवालदिल  १४ एप्रिलनंतर लॉकडाऊन संपेल या अपेक्षेत साखर कारखानदार होते. पण ३ मे पर्यंत हा कालावधी वाढल्याने कारखानदारांचे साखर विक्रीचे गणित बिघडले आहे. आंतराष्ट्रीय वाहतूक ठप्प आहे. लॉकडाऊन निघाल्यानंतर किमान देशांतर्गत बाजारपेठेत साखर जावून काहीसा साठा कमी होइल, अशी अपेक्षा कारखानदारांची होती. परंतू कालावधी वाढल्याने आता मे पर्यंत साखरेचा उठाव होण्याची शक्‍यता धूसर बनली आहे. यामुळे संपूर्ण एप्रिल महिन्यात साखरेची एका पोत्याचीही विक्री होवू शकली नसल्याचे काही कारखानदारांनी सांगितले. यातच ज्या कारखान्यांचा हंगाम एप्रिल मध्ये चालला त्या भागातील मजूरांना कारखान्यांच्या ठिकाणीच थांबण्यास सांगण्यात आले. राज्यात तब्बल एक लाखापर्यंत मजूर अडकून पडले. त्यांचा सगळा खर्च कारखान्यांने करण्याच्या सूचना शासनाने दिल्याने तो भार कारखान्यांवर पडला. 

मे महिन्यात दिलासा मिळणार?  मे मध्ये बाजारपेठा सुरु झाल्यानंतर शीातपेये, आइस्क्रीम व मिठाई उद्योग वेगात सुरु होण्याची शक्‍यता आहे. यावेळी मागणी वाढेल व काहीसा ताण कमी होइल अशी शक्‍यता कारखाना सुत्रांची आहे. परंतू सध्या तरी किती मागणी वाढेल याचा काहीच अंदाज कारखाना पातळीवर नसल्याची स्थिती आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com