agriculture news in Marathi sugar production down by 57 lac ton Maharashtra | Agrowon

देशात साखर उत्पादनात ५७ लाख टनांनी घट

टीम अॅग्रोवन
रविवार, 15 मार्च 2020

हंगामाच्या सुरुवातीला देशातील शिल्लक साखर विक्रमी १४५ लाख टन असली तरी त्यातून राखीव साठा योजनेमधील ४० लाख टन व ५० लाख टनाची अपेक्षित निर्यात लक्षात घेता हंगामाअखेर सुमारे ५५ ते ६० लाख टन साखर शिल्लक राहण्याचा अंदाज आहे. त्याचा अनुकूल परिणाम स्थानिक बाजारातील साखर विक्री दरावर राहील. मात्र कुठल्याही परिस्थितीत किमान ५० लाख टन साखर देशाबाहेर जाण्यावरच वरील आशादायक आकडेवारी दिसणार आहे. तेव्हा जरी कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे आंतरराष्ट्रीय साखर दरात सध्या घसरण झालेली असली तरी उद्दिष्टाप्रमाणे साखर निर्यात होण्यावरच नजीकच्या भविष्यातील स्थानिक साखर दर टिकून राहण्यास मदत होणार आहे.
— प्रकाश नाईकनवरे, व्यवस्थापकीय संचालक, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ

कोल्हापूर: देशातील गळीत हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. शुक्रवारी, १३ मार्चअखेर २१० लाख टन साखर उत्पादित झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत साखरेचे उत्पादन ५७ लाख टनांनी कमी असल्याची माहिती राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या सूत्रांनी दिली.

उत्तर प्रदेश राज्याने ८३ लाख टन साखरेचे उत्पादन करून पुन्हा एकदा आघाडी घेतली असून हे उत्पादन गेल्या वर्षीच्या राज्यातील या तारखेच्या उत्पादनापेक्षा २ लाख टनाने अधिक आहे. या उलट महाराष्ट्रातील ५५ लाख टन नवे साखर उत्पादन हे गतवर्षीच्या या तारखेस झालेल्या साखर उत्पादनापेक्षा ४३ लाख टनाने कमी आहे.

कर्नाटकमधील ३३ लाख टन नवे साखर उत्पादन हेदेखील गतवर्षी या तारखेस झालेल्या साखर उत्पादनापेक्षा ९ लाख टनाने कमी आहे. गुजरातमध्ये ८ लाख टन नवे साखर उत्पादन झाले असून ते गतवर्षीच्या या तारखेस झालेल्या साखर उत्पादनापेक्षा अडीच लाख टनाने कमी आहे. 

अशीच थोडी फार परिस्थिती इतर राज्यात दिसत असून, हंगामअखेर देशपातळीवरील नवे साखर उत्पादन २६५ लाख टनाइतके सीमित राहण्याचा अंदाज आहे. त्यात उत्तर प्रदेश ११८ लाख टन, महाराष्ट्र ६० लाख टन, कर्नाटक ३४ लाख टन आणि गुजरात ९ लाख टन असण्याचा अंदाज आहे.

उत्तर प्रदेशात उत्पादनात वाढ
उत्तर प्रदेशात आत्तापर्यंत गेल्या वर्षीच्या तुलनेत उत्पादनात २ लाख टनांनी वाढ झाली आहे. या उलट महाराष्ट्रातील उत्पादन ४३ लाख टनांनी नेकमी झाले आहे. कर्नाटकमध्येही यंदा उत्पादनात गेल्या वर्षीच्या तुलनेत ९ लाख टन घट झाली आहे. तर गुजरातमध्ये यंदा अडीच लाख टनांनी साखर उत्पादनात घट झाली आहे.


इतर अॅग्रोमनी
संरक्षण सिद्धतेप्रमाणेच आरोग्य...सार्वजनिक आरोग्य आणि करोना सारख्या गंभीर साथी...
अनेक वर्षानंतर कापसाची विक्रमी खरेदीभारतीय कापूस महामंडळाने (सीसीआय) अनेक वर्षानंतर...
शेतीमालाचे फ्युचर्स व्यवहार सुरूकोरोनामुळे ‘एनसीडीइएक्स'ने २० एप्रिल च्या...
विमानसेवा बंदचा भाजीपाला निर्यातीला...पुणे : फेब्रुवारी ते मे या काळात युरोपीय...
वेळेवर करा कर्जाची परतफेडसुरवातीच्या काळात उत्पन्न सुरू होईपर्यंतचा...
मध निर्यातीत मोठी वाढनाशिक: भारतात उत्पादित होणाऱ्या नैसर्गिक मधाला...
शेतकरी उत्पादक कंपन्या ‘डिजिटल’ होणार;...पुणे : राज्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांना डिजिटल...
कुटुंबाच्या अर्थकारणात डाळिंबासह लिंबू...सात एकरांवरील डाळिंब हे मुख्य पीक असले तरी...
देशात साखर उत्पादनात ५७ लाख टनांनी घटकोल्हापूर: देशातील गळीत हंगाम अंतिम टप्प्यात आला...
राज्य अर्थसंकल्पातील महत्वाच्या तरतुदीकृषी   महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती...
'फिक्की'च्या राष्ट्रीय परिषदेत जैन...दिल्ली ः इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री...
ऊस, आले पिकासह जमिनीच्या विश्रांतीचे...कोल्हापूर जिल्ह्यातील शेडशाळ (ता. शिरोळ) येथील...
अन्नधान्याचे यंदा विक्रमी उत्पादन नवी दिल्ली: देशात यंदा खरीप हंगामात...
राज्यातील रेशीम बाजारात १० कोटींची...नागपूर ः राज्यात रेशीमकोष खरेदी बाजारपेठेला...
आर्थिक निर्णयांनी वाढवला प्रियंकाताईंचा...पती गौरव काकडे यांच्या आग्रहावरून पुणे शहरातील...
गेल्या वर्षीच्या साखर निर्यातीसाठी...कोल्हापूर : गेल्या वर्षीची (२०१८-१९) साखर निर्यात...
आंतरराष्ट्रीय डाळ परिषदेकडे उद्योजकांचे...पुणे  : जागतिक कडधान्य उत्पादन व बाजारपेठेला...
कच्च्या साखरेच्या दरात उच्चांकी वाढकोल्हापूर : जागतिक बाजारात कच्च्या साखरेच्या दरात...
साखरेच्या दुहेरी किमतीसाठी सूत्र तयार...नवी दिल्ली: साखरेचे घसरणारे दर स्थिर...
आंतरपिकांतून कुटुंबाचे अर्थकारण केले...माचले (ता. चोपडा, जि. जळगाव) येथील दीपक माणिक...