Agriculture news in marathi Sugar production in Nanded region is 25 lakh quintals | Agrowon

नांदेड विभागात साखरेचे २५ लाख क्विंटलवर उत्पादन

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 27 फेब्रुवारी 2020

नांदेड : नांदेड विभागातील परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर या चार जिल्ह्यांतील १३ साखर कारखान्यांनी यंदाच्या गाळप हंगामामध्ये सोमवार (ता. २४) पर्यंत २३ लाख ७० हजार ८१० टन उसाचे गाळप केले आहे. सरासरी १०.५७ टक्के उता-याने २५ लाख ४ हजार ८९० टन साखर उत्पादन घेतले आहे.

नांदेड : नांदेड विभागातील परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर या चार जिल्ह्यांतील १३ साखर कारखान्यांनी यंदाच्या गाळप हंगामामध्ये सोमवार (ता. २४) पर्यंत २३ लाख ७० हजार ८१० टन उसाचे गाळप केले आहे. सरासरी १०.५७ टक्के उता-याने २५ लाख ४ हजार ८९० टन साखर उत्पादन घेतले आहे.

नांदेड विभागातील चार जिल्ह्यांत यंदाच्या हंगामात १७ पैकी १३ साखर कारखान्यांना ऊस गाळपाचे परवाने मिळाले. सोमवार (ता.२४) पर्यंत त्यांनी केलेल्या उस गाळपाची माहिती प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयास सादर केली. त्यानुसार, परभणी जिल्ह्यातील ५ पैकी ३ खासगी कारखान्यांनी ५ लाख २८ हजार ८१० टन उसाचे गाळप केले. तर, सरासरी १०.५४ टक्के उताऱ्याने ५ लाख ५७ हजार ४९० क्विंटल साखर उत्पादन घेतले. पूर्णा तालुक्यातील बळिराजा शुगर्सचा साखर उतारा सर्वाधिक ११.१८ टक्के आला. 

हिंगोली जिल्ह्यातील ३ सहकारी आणि एका खासगी कारखान्याने ६ लाख ९५ हजार २९० टन उसाचे गाळप केले. सरासरी १०.७९ टक्के उताऱ्याने ७ लाख ५० हजार ५०० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले. भाऊराव चव्हाण युनिट २ कारखान्याचा साखर उतारा सर्वाधिक ११ टक्के आला. नांदेड जिल्ह्यातील ४ पैकी २ सहकारी आणि २ खासगी  कारखान्यांनी एकूण ६ लाख ८४ हजार ४५० टन उसाचे गाळप केले. सरासरी १०.५० टक्के साखर उताऱ्याने ७ लाख १८ हजार १५० क्विंटल उत्पादन घेतले. भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याचा (युनिट ४) साखर उतारा सर्वाधिक १०.९० टक्के आला. 

लातूर जिल्ह्यातील २ खासगी कारखान्यांनी ४ लाख ६२ हजार ३०० टन उसाचे गाळप केले. सरासरी १०.३५ टक्के उताऱ्याने ४ लाख ७८ हजार ४५० क्विंटल उत्पादन घेतले. जागृती शुगर्सचा साखर उतारा सर्वाधिक १०.४४ टक्के आला.


इतर ताज्या घडामोडी
नगरला भाजी खरेदीसाठी पुन्हा लोकांची...नगर ः भाजी खरेदीसाठी लोक गर्दी करीत असल्यामुळे...
घनसावंगी तालुक्यात गारपीटीचा पुन्हा...घनसावंगी, जि.जालना : कोरोना संसर्गामुळे बंदने...
अकोला : शेतमालाची नोंदणी कृषी विभागाकडे...अकोला  ः ‘कोरोना’मुळे सर्वत्र संचारबंदी लागू...
पंढरपूर भागात ऐन बहरातील शेवग्याला कोयताकरकंब, जि. सोलापूर ः ‘कोरोना’मुळे सर्वच...
हिंगोलीत वाहन परवान्यासाठी स्वतंत्र कक्षहिंगोली ः राज्यात कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये...
नगर : काही ठिकाणी 'खासगी'कडून दूध...नगर  ः कोरोना विषाणू संसर्गाच्या...
सोलापुरात `फोन करा अन किराणा माल,...सोलापूर : कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये, यासाठी...
अकोल्यात भाजीपाला विक्रीसाठी...अकोला ः गेल्या काही दिवसांपासून ‘कोरोना’...
विदर्भ, मराठवाड्यातील शेतकऱ्यांना...मुंबई : राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम २०१३...
परभणी शासकीय दुग्धशाळेत दूध संकलनात वाढपरभणी ः ‘कोरोना’ विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर...
जळगावातून उत्तर भारताकरिता केळीची...जळगाव  ः जिल्ह्यातून केळीची उत्तर भारतासह...
कऱ्हाडमध्ये मिळतोय घरपोच भाजीपाला  कऱ्हाड, जि.सातारा  :  कऱ्हाड शहरातील...
जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत ठेवा...सोलापूर : ‘कोरोना’ विषाणूंच्या प्रार्दुभावाला...
सोलापूरात ‘कोरोना’बाबत माहितीसाठी...सोलापूर : ‘कोरोना’ विषाणूच्या प्रतिबंधासाठी...
सोशल मीडियाच्या मदतीने ढोबळी मिरचीची...जळगाव ः कोरोना विषाणूच्या संकटामुळे परराज्यातील...
खुद्द पंतप्रधानांनी साधला नायडू...पुणे : ‘‘तुम्ही स्वतःची नीट काळजी घेत आहात ना,...
निफाडमध्ये पावसाच्या तडाख्यात...नाशिक : चालू वर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे...
औरंगाबादेत शेतकरी गटांची फळे, धान्य...औरंगाबाद : जिल्ह्यातील जवळपास चाळीस गावांतील...
अकोला ः केळी उत्पादकांसाठी मार्ग काढा;...अकोला ः कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव...
तयार बेदाणा बॉक्स नसल्याने ठेवायचा कोठे...सांगली : जिल्ह्यात बेदाणा उत्पादन अंतिम टप्प्यात...