agriculture news in marathi Sugar production takes speed in Country reaches 142 lakh tonne | Page 2 ||| Agrowon

देशातील साखर उत्पादन ‘सुसाट’; १४२ लाख टन उत्पादन

राजकुमार चौगुले ः ॲग्रोवन वृत्तसेवा
सोमवार, 25 जानेवारी 2021

यंदाच्या हंगामातील साखर उत्पादनाने सुसाट वेग पकडला आहे. १५ जानेवारीअखेरपर्यंत देशातील ४८७ कारखान्यांनी १४२ लाख टन साखर उत्पादित केली आहे.

कोल्हापूर : यंदाच्या हंगामातील साखर उत्पादनाने सुसाट वेग पकडला आहे. १५ जानेवारीअखेरपर्यंत देशातील ४८७ कारखान्यांनी १४२ लाख टन साखर उत्पादित केली आहे. गेल्या वर्षीपेक्षा ३३ लाख टनांनी यंदा उत्पादनात वाढ झाली आहे.

पहिल्यापासून महाराष्ट्राने घेतलेली आघाडी या कालावधीतही कायम आहे. या कालावधीत राज्यातील १८१ कारखान्यांनी तब्बल ५१.५५ लाख टन साखर उत्पादित केली आहे. गेल्या वर्षीचे राज्यातील या कालावधीचे उत्पादन लक्षात घेतल्यास ते दुप्पट आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत राज्यात २५ लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. विशेष बाब म्हणजे गेल्या वर्षी शेवटपर्यंत आघाडीवर राहणाऱ्या उत्तर प्रदेशामध्ये मात्र आश्‍चर्यकरीत्या गेल्या वर्षीच्या तुलनेतही उत्पादन कमी झाले आहे. 

उत्तर प्रदेशात उसाची पुरेशी वाढ न झाल्याने रिकव्हरीत घट झाल्याने गेल्या वर्षी इतकेही उत्पादन काढताना उत्तर प्रदेशातील कारखान्यांची कसरत होत असल्याचे चित्र आहे. उत्तर प्रदेशात १२० कारखान्यांनी ४२.९९ लाख टन साखरनिर्मिती केली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत ११९ कारखान्यांनी ४३.७८ लाख टन साखर तयार केली होती. गुजरात, कर्नाटकात मात्र अपवाद वगळता गेल्या वर्षीइतकेच उत्पादन होत आहे.

कारखानदार हवालदिलच...
साखरेचे उत्पादन वाढत असले, तरी विक्रीच्या पातळीवर मात्र अद्याप प्रतिसाद नसल्याने कारखानदार हवालदिलच आहेत. वाढते उत्पादन कारखानदारांना चिंतीत करत असून, येत्या पंधरा दिवसांत साखरेचा किमान विक्रीचा दर वाढविण्यासाठी केंद्राकडे जोरदार प्रयत्न करण्यात येणार असल्याचे साखर उद्योगातील सूत्रांनी सांगितले. केंद्रीय नेतृत्वाला याबाबाबतची माहिती राज्यातील कारखान्यांमार्फत देण्यासाठी नियोजन सुरू असल्याचे साखर कारखान्यांच्या प्रतिनिधींनी सांगितले.

देशातील साखर उत्पादनाची स्थिती 
(१५ जानेवारी २०२१ अखेरची)

  • राज्य : साखर उत्पादन (लाख टन)
  • उत्तर प्रदेश :   ४२.९९
  • महाराष्ट्र :   ५१.५५
  • कर्नाटक :   २९.८०
  • गुजरात :   ४.४०
  • तमिळनाडू :   १.१५
  • अन्य राज्ये  :  १२.८१

इतर अॅग्रोमनी
आवक वाढूनही हरभरा दर टिकून पुणे ः यंदा हरभरा उत्पादनात घटीचा अंदाज आणि सण...
देशातील कापूस उत्पादन ३५८ लाख गाठींवर...नवी दिल्ली ः देशात यापूर्वी कापसाचे ३६० लाख गाठी...
मोहरीला दराचा ‘तडका’ पुणे ः राजस्थानमध्ये मोहरीच्या दराने हमीभावाचा...
हळदीची आवक वाढू लागली सांगली/परभणी ः बाजार समित्यांत हळदीची आवक वाढू...
देशात विक्रमी फलोत्पादनाचा अंदाज पुणे ः देशात २०२०-२१ मध्ये फलोत्पादनात फळांचे १०३...
चीनकडून शेतीमालाची आक्रमक खरेदी पुणे ः जागतिक पातळीवर जवळपास सर्वच शेतमालाची...
हरभरा दरात घसरणीची शक्यता कमीपुणे ः हरभरा आवक वाढत असून पुढील १० ते १२ दिवसांत...
तेलबिया उत्पादनात वाढ वॉशिंग्टन ः जागतिक तेलबिया उत्पादनात फेब्रुवारी...
सांगली बाजार समितीत हळदीची आवक वाढलीसांगली ः  कोरोना विषाणूचा वाढता...
सरकारी आकड्यांपेक्षा हरभरा उत्पादनात घट यंदाच्या हंगामात सुरुवातीपासूनच पिकांना बदलत्या...
देशात साखर उत्पादनात ४० लाख टनांनी वाढलेकोल्हापूर : देशातील साखर कारखान्यांनी...
केंद्रीय गोदाम महामंडळाची क्षमता अनेक...नवी दिल्ली ः केंद्रीय गोदाम महामंडळाची क्षमता...
पाकिस्तानची भारतीय कापसाला पसंती जळगाव ः पाकिस्तान कापसासाठी भारताच्या दारात...
हरभरा बाजारात सुधाराची चिन्हे पुणे ः बाजारात हरभरा आवक सुरू झाली आहे....
बाजारात तूर खातेय भाव; वाढ कायम पुणे ः इतर कडधान्य पिकांसह तूर उत्पादनातही घट...
हळदीला दराचा ‘रंग’ पुणे ः हळद उत्पादनात घट झाल्याने यंदा हळदीचे दर...
अन्नधान्याचे विक्रमी उत्पादन नवी दिल्ली ः देशात यंदा अन्नधान्याचे विक्रमी...
राष्ट्रीय खाद्यतेल मिशनचा यंदाही चकवापुणे : राष्ट्रीय खाद्यतेल मिशनची यंदाही घोषणा न...
सोयाबीनमधील तेजी कायम पुणे ः सोयाबीनने प्लॅंट दरासह बाजार...
हरभरा बाजाराला ‘नाफेड’चा टेकू पुणे ः नाफेडने राज्यनिहाय खरेदीचे उद्दिष्ट जाहीर...