देशांतर्गत साखरेच्या दरात १०० रुपयांनी घट 

गेले पंधरा दिवस साखर उद्योगाच्या दृष्टीने अत्यंत वाईट गेले आहेत. उन्हाळ्याच्या हंगामात साखरेला जादा मागणी असते. शीतपेये, लग्नसमारंभ, मोठे उत्सव यासाठी जादा साखर लागते. पण या सर्व गोष्टी कोरोनामुळे थांबल्या आहेत. अगोदर घेतलेली साखर अनेक ठिकाणी शिल्लक आहे. नव्याने मागणी नसल्याने दरात मोठी घसरण होत आहे. - विश्वजित शिंदे, साखरतज्ज्ञ
sugar
sugar

कोल्हापूर : कोरोनामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेची मागणी घटलेली असतानाच याचा परिणाम देशांतर्गत बाजारपेठेमध्येही दिसून येत आहे. देशभरात लग्नसमारंभासह अन्य मोठे उत्सवही थांबल्याने साखरेच्या मागणीत मोठी घट आली आहे. याचा परिणाम साखरेच्या विक्रीवर होत आहे. साखरेचा कोटा तसाच पडून राहत असल्याने कारखान्यांचे अर्थकारण कोलमडत आहे.  गेल्या पंधरवड्यात साखरेच्या किमतीत सरासरी १०० रुपयांनी घट झाली आहे. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात असणारा क्विंटलला ३२०० रुपयांचा दर ३१०० रुपयांवर आला आहे. विषाणूचा प्रभाव वाढत आहे, परिणामी स्थिती लवकर सुधारण्याची शक्यता नसल्याने कारखानदार धास्तावले आहेत  महिन्यापासून कोरोनामुळे देशातील बाजारपेठा थंडावल्या आहेत. केंद्र शासनाने लग्नसमारंभासहीत अन्य सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी आणली आहे, याचा विपरीत परिणाम साखरेच्या विक्रीवर झाला आहे. याचबरोबर आइस्क्रीम व शीतपेयाच्याही मागणीत मोठी घट आहे. देशातील बहुतांशी बाजारपेठा बंद असल्याने आइस्क्रीम व अन्य पदार्थांना मागणी नाही. आजारी पडू नये यासाठी नागरिक खबरदारी घेत आहेत. यामुळे शीतपेयांची विक्री थंडावली आहे.  आइस्क्रीम, शीतपेये, मिठाई यांना मोठ्या प्रमाणात साखर लागते. उत्पादित होणाऱ्या साखरेपैकी ६०% टक्के साखर घरगुती वापराशिवाय अन्य उत्पादनाला लागते. जास्त साखर लागणारे उद्योग कोरोनामुळे अडचणीत आल्याने साखर उद्योगाला याचा फटका बसला आहे. गेल्या महिन्यात एमएसपीपेक्षा काहीसा जादा दर साखरेला होता. पण मार्चमध्ये मात्र हा दर एमएसपीपर्यंत आला आहे. पण दर खाली येऊनही मागणी नसल्याने विक्री ठप्प झाल्यासारखी स्थिती आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com