agriculture news in Marathi sugar rate down by 100 rupees Maharashtra | Page 2 ||| Agrowon

देशांतर्गत साखरेच्या दरात १०० रुपयांनी घट 

राजकुमार चौगुले
सोमवार, 23 मार्च 2020

गेले पंधरा दिवस साखर उद्योगाच्या दृष्टीने अत्यंत वाईट गेले आहेत. उन्हाळ्याच्या हंगामात साखरेला जादा मागणी असते. शीतपेये, लग्नसमारंभ, मोठे उत्सव यासाठी जादा साखर लागते. पण या सर्व गोष्टी कोरोनामुळे थांबल्या आहेत. अगोदर घेतलेली साखर अनेक ठिकाणी शिल्लक आहे. नव्याने मागणी नसल्याने दरात मोठी घसरण होत आहे. 
- विश्वजित शिंदे, साखरतज्ज्ञ 
 

कोल्हापूर : कोरोनामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेची मागणी घटलेली असतानाच याचा परिणाम देशांतर्गत बाजारपेठेमध्येही दिसून येत आहे. देशभरात लग्नसमारंभासह अन्य मोठे उत्सवही थांबल्याने साखरेच्या मागणीत मोठी घट आली आहे. याचा परिणाम साखरेच्या विक्रीवर होत आहे. साखरेचा कोटा तसाच पडून राहत असल्याने कारखान्यांचे अर्थकारण कोलमडत आहे. 

गेल्या पंधरवड्यात साखरेच्या किमतीत सरासरी १०० रुपयांनी घट झाली आहे. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात असणारा क्विंटलला ३२०० रुपयांचा दर ३१०० रुपयांवर आला आहे. विषाणूचा प्रभाव वाढत आहे, परिणामी स्थिती लवकर सुधारण्याची शक्यता नसल्याने कारखानदार धास्तावले आहेत 
महिन्यापासून कोरोनामुळे देशातील बाजारपेठा थंडावल्या आहेत.

केंद्र शासनाने लग्नसमारंभासहीत अन्य सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी आणली आहे, याचा विपरीत परिणाम साखरेच्या विक्रीवर झाला आहे. याचबरोबर आइस्क्रीम व शीतपेयाच्याही मागणीत मोठी घट आहे. देशातील बहुतांशी बाजारपेठा बंद असल्याने आइस्क्रीम व अन्य पदार्थांना मागणी नाही. आजारी पडू नये यासाठी नागरिक खबरदारी घेत आहेत. यामुळे शीतपेयांची विक्री थंडावली आहे. 

आइस्क्रीम, शीतपेये, मिठाई यांना मोठ्या प्रमाणात साखर लागते. उत्पादित होणाऱ्या साखरेपैकी ६०% टक्के साखर घरगुती वापराशिवाय अन्य उत्पादनाला लागते. जास्त साखर लागणारे उद्योग कोरोनामुळे अडचणीत आल्याने साखर उद्योगाला याचा फटका बसला आहे. गेल्या महिन्यात एमएसपीपेक्षा काहीसा जादा दर साखरेला होता. पण मार्चमध्ये मात्र हा दर एमएसपीपर्यंत आला आहे. पण दर खाली येऊनही मागणी नसल्याने विक्री ठप्प झाल्यासारखी स्थिती आहे.


इतर अॅग्रो विशेष
`अमूल`कडून शेतकऱ्यांना मंदीतही २००...पुणे : राज्यातील डेअरी उद्योग सध्या अतिशय बिकट...
राज्यात कोरोना रुग्णसंख्या ७४८;...मुंबई : राज्यातील कोरोनाचा विळखा वाढत चालला...
केंद्र सरकारकडून रासायनिक खत अनुदानात...पुणे: ऐन लॉकडाऊनच्या गोंधळात केंद्र सरकारने...
शेतकरी कंपन्यांची संकलन केंद्रे...पुणे:  ‘ई-नाम’ प्रणालीत गेल्या दोन...
कोरोनामुळे हापूस अडचणीत; मुंबई बाजार...मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वाशी...
कोरोनामुळे ‘टोमॅटो बेल्ट’ लॉकडाऊन; पुणे...पुणेः गेल्या काही वर्षात जिल्‍ह्यातील जुन्नर, खेड...
कोल्हापूर कृषी महाविद्यालयाकडून...कोल्हापूर : येथील कोल्हापूर कृषी महाविद्यालयाच्या...
राज्यात उष्ण, दमट हवामानाचा अंदाज;...पुणे : तापमानाचा पारा चाळीशी पार गेल्याने उन्हाचा...
राज्यात आत्तापर्यंत तेरा हजार टन...नगर ः कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर...
प्रयोगशीलतेतून मिळवले आर्थिक स्थैर्यनाशिक जिल्ह्यातील आडगाव येथील शिवाजी शंकर देशमुख...
...शेतकरी मात्र 'फार्म क्वाॅरंटाइन' !सांगली : कोरोनाने सर्वांची झोप उडाली आहे. संपूर्ण...
केसरची चव यंदा दुर्मिळ; संकटांमुळे आंबा...औरंगाबाद: यंदा बहुतांश आंबा बागांना मोजकाच मोहर...
राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या...मुंबई : राज्यात कोरोनाबाधित १४५ नवीन रुग्णांची आज...
दूध भुकटी योजनेसाठी १८७ कोटी मंजूर मुंबई: कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या विपरीत...
फळे, भाजीपाला थेट विक्रीसाठी ...नगर : फळे, भाजीपाला विक्रीसाठी नगर जिल्ह्यामधील...
पहिल्याच दिवशी २६० किलो मोसंबी वाजवी...औरंगाबाद : आधी बागवानाने मागितली तेव्हा दिली नाही...
कृषी उत्पादनांसह निर्धारीत अत्यावश्‍यक...नवी दिल्ली: देशात कोरोना विषाणूचा प्रसार...
समाजविघातक वृत्तींवर कडक कायदेशीर...मुंबई: कृपा करून शिस्त पाळा, सहकार्य करा असे मी...
शेती अवजारे, स्पेअरपार्टस् दुकानांना...नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्रालयाने शुक्रवारी (ता...
मराठवाड्यात आजही वादळी पावसाची शक्यता पुणे: उन्हाचा ताप वाढल्याने सोलापूर, मालेगाव,...