agriculture news in Marathi sugar rate will be get from ethanol production Maharashtra | Page 2 ||| Agrowon

इथेनॉलमुळे ऊस, साखरेला दर मिळेल : शेखर गायकवाड

टीम अॅग्रोवन
सोमवार, 22 फेब्रुवारी 2021

राज्यात यंदा ११० कोटी लिटर इथेनॉलचे उत्पादन होणार असून, यामुळे उसाला व साखरेला चांगला भाव मिळेल, अशी माहिती राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली.

शिराढोण, जि. उस्मानाबाद ः राज्यात यंदा ११० कोटी लिटर इथेनॉलचे उत्पादन होणार असून, यामुळे उसाला व साखरेला चांगला भाव मिळेल, अशी माहिती राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली. 

नॅचरल उद्योग समूहाच्या वतीने ऊस खोडवा व्यवस्थापन व शेतकरी प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्‍घाटन बुधवारी (ता. १७) आवाड शिरपुरा येथील कृषी भूषण पांडुरंग आवाड यांच्या शेतात साखर आयुक्त शेखर गायकवाड यांचे हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते. नॅचरल उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष बी. बी. ठोंबरे अध्यक्षस्थानी होते. तर प्रादेशिक सहसंचालक (साखर) राजेंद्र दराडे, प्रादेशिक सहसंचालक (साखर) बी. एल. वांगी, कृषी विशेषज्ञ अरुण देशमुख, संचालक अनिल ठोंबरे, पांडुरंग आवाड उपस्थित होते. 

साखर आयुक्त म्हणाले, की ब्राझीलच्या धरतीवर राज्यात १० लाख टन साखर उत्पादन कमी करून या वर्षी ११० कोटी लिटर इथेनॉलचे उत्पादन होणार असल्याने उसाला तसेच साखरेस चांगला भाव मिळेल. मागील वर्षी इथेनॉलचे १८ कोटी लिटर उत्पादन झाले होते. शेतकऱ्यांतील आपसांतील संवाद संपल्याने आत्महत्या वाढल्याची खंत गायकवाड यांनी या वेळी व्यक्त केली. भूगर्भातील पाण्याचा भरमसाट उपसा होत असल्याने हा विषय भविष्यासाठी चिंताजनक असल्याचे गायकवाड यांनी सांगितले. 

अरुण देशमुख म्हणाले, की शेतकऱ्यांनी उसाला ठिबक सिंचनद्वारेच पाण्याचे नियोजन करून उत्पादन वाढवायला हवे. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन पांडुरंग आवाड यांनी केले. तर प्रवर्तक दिलीपराव भिसे यांनी आभार मानले. 

लागवड मर्यादा असावी 
बी. बी. ठोंबरे म्हणाले, की शेतकऱ्यांना ऊस लागवडीसाठी क्षेत्र मर्यादा असावी. जेणेकरून कमी क्षेत्रात जादा उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये स्पर्धा राहील आणि आर्थिक उत्पन्न वाढेल. यासाठी शासनस्तरावर नियमावली होणे गरजेचे आहे. 
 


इतर अॅग्रो विशेष
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात गारांनी...पुणे : गेल्या चार ते पाच दिवसांपासून मध्य...
सोयाबीन बियाणे वाहतुकीसाठी अट पुणे : सोयाबीन बियाणे उत्पादक कंपन्यांनी वाहतूक...
काळ्या गव्हाच्या लागवडीची...नाशिक : काळ्या गव्हामध्ये पौष्टिकता, औषधी गुणधर्म...
सांगलीत बेदाण्याचे सौदे पंधरा दिवस बंदच सांगली ः कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने सांगली...
विदर्भात आज पावसाची शक्यता पुणे : मागील आठ दिवसांपासून वादळी पावसाने अनेक...
आवारात गर्दी नियंत्रणासाठी प्रभावी...पुणे : ‘ब्रेक द चेन’ मोहिमेअंतर्गत कोरोना...
पुणे बाजार समिती शनिवार-रविवार बंद; इतर...पुणे : पुणे बाजार समिती सोमवार ते शुक्रवार...
मराठवाड्यात ‘पूर्वमोसमी’चे दणके सुरूचऔरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड,...
विक्रीपूर्वी सोयाबीन चाचणीवर...अकोला ः राज्यात या हंगामात सोयाबीन बियाणे विक्री...
‘आत्मा’अंतर्गत शेतकरी समित्यांची...अकोला ः राज्यात कृषी विस्तारविषयक सुधारणांसाठी...
तासगाव पश्‍चिम भागात द्राक्ष खरड...सांगली ः जिल्ह्यातील द्राक्ष हंगाम अंतिम टप्प्यात...
खत उद्योगाचे सावध नियोजन पुणे  : गेल्या हंगामातील पहिल्या...
राज्यात पूर्वमोसमी, गारपिटीने पिकांचे...पुणे : मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाड्यात तुरळक...
सांगलीत बेदाणा सौदे बंद सांगली ः लॉकडाउनमध्ये शेतीमालाची खरेदी-विक्री...
विदर्भात पूर्वमोसमीचा जोर राहणारपुणे : राज्यातील अनेक भागांत पूर्वमोसमी पावसाने...
उन्हाळा, रमजानमुळे टरबुजाला मागणीअकोला : उन्हाचा तडाखा वाढत चालला असल्याने...
व्यावसायिक दृष्टिकोनातून घडवली...नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील भात उत्पादक...
गाजराने दिले उत्पन्नासह चाराहीनगर जिल्ह्यात अकोल तालुक्यातील गणोरे येथील...
‘गोल्डनबीन’ला झळाळीविदर्भातील अकोला, वाशीमसह मराठवाड्यातील लातूर...
बाबासाहेबांच्या सत्याग्रहाचे शास्त्रडॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला प्रत्येक लढा...