उत्पादन घटीमुळे साखरदर वधारणार

साखर
साखर

नवी दिल्ली ः गेल्या हंगामापासून साखरेचे दर दबावात आहेत. मात्र २०१८-१९ च्या हंगामात साखर उत्पादनाचा आकडा जाहीर होणाऱ्या अंदाजानुसार घटतच आहे. उत्पादन कमी होण्याची शक्यता असल्याने काही प्रमाणात साखरेचे दर वाढण्यासाठी साह्यभूत ठरणार आहे, अशी माहिती रेटिंग एजन्सी ‘आयसीआरए’ने अहवालातून दिली.   देशात २०१८-१९ च्या हंगामात दुष्काळाची स्थिती अनेक ऊस उत्पादक राज्यांमध्ये असल्याने त्याचा परिणाम उत्पादनावर झाला आहे. त्यामुळे राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय संस्थांनी देशातील साखर उत्पादनात घट होण्याचा अंदाज जाहीर केला आहे. मागील आठवड्यात इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (इस्मा) महत्त्वाच्या ऊस उत्पादक राज्यांमध्ये हवामानाचा फटका बसल्यान सुधारित अंदाज जाहीर करून सुरवातीच्या ३५० ते ३५५ लाख टन साखर उत्पादनाच्या अंदाजात घट करून ३१५ ते ३२० लाख टन उत्पादनाचा सुधारित अंदाज जाहीर केला आहे. गेल्या २०१७-१८ च्या गाळप हंगामात ३२३ लाख टन साखर उत्पादन केले होते.  ‘इस्मा’ने उत्तर प्रदेशच्या साखर उत्पादनातही सुरवातीच्या १३० ते १३५ लाख टन अंदाजात घट करून १२१ लाख टन उत्पादन होईल, असे म्हटले आहे. ‘‘उत्तर प्रदेशातील ऊस पट्ट्यात सप्टेंबर महिन्यात जेव्हा पीक ऐन वाढीच्या अवस्थेत होते, तेव्हा जाेरदार पाऊस झाला. त्याचा परिणाम ऊस पिकाच्या वाढीवर झाला. तसेच अनेक भागात पाणीटंचाईची स्थिती असल्याने उत्पादन घटण्याचा अंदाज आहे. त्यामुळे राज्यात गेल्या वर्षीपेक्षा कमी ऊस गाळपासाठी उपब्ध होणार आहे. तसेच उताऱ्यावरही परिणाम होण्याची शक्यता आहे,’’ असे ‘इस्मा’ने म्हटले आहे.    ‘इस्मा’ने महाराष्ट्रातील उत्पादनाच्या अंदाजात घट करून ११० ते ११५ लाख टनांवरून ९५ लाख टन उत्पादन होईल, असे म्हटले आहे. महाराष्ट्र राज्यातील अनेक भागांत पावासाने मोठा खंड दिला. अनेक भागांत दुष्काळ तर काही ठिकाणी अतिपाऊस याचा परिणाम पिकावर झाला आहे. तसेच लाखो हेक्टरवर हुमणीचा प्रादुर्भाव झाल्यानेही पीक प्रभावित झाले आहे. इथेनॉलला प्रोत्साहन देशातील अतिरिक्त साखर उत्पादनामुळे दराचा प्रश्‍न निर्माण होत असल्याने केंद्र सरकारने इथेनॉलनिर्मितीला प्रोत्साहन दिले आहे. इथेनॉल प्रकल्प उभारणीसाठी निधी उपलब्ध करणे आणि इथेनॉलच्या दरात वाढ करून जास्तीत जास्त उत्पानादनावर केंद्राने लक्ष केंद्रित केले आहे. कायद्यात बदल करून सरकारने थेट उसापासून इथेनॉलनिर्मितीलाही परवानगी दिली आहे. त्यामुळे या उद्योगाकडेही मोठ्या प्रमाणात ऊस जाण्याची शक्यता आहे. वातावरणाचा फटका बदलत्या वातावरणाचा ऊस पिकावर मोठा परिणाम झाला आहे. देशातील एकूण ऊस उत्पादनापैकी जवळपास ८० टक्के ऊस उत्पादन उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि कर्नाटक या तीन राज्यांमध्ये होते. या तीनही राज्यांमध्ये पीक बदलत्या वातावरणामुळे कीड-रोगांचा प्रादुर्भाव तसेच काही भागांतील दुष्काळी स्थितीमुळे प्रभावित झाले आहे. ऊस उत्पादक अनेक भागांत पावसाचा खंड, तसेच अतिपाऊस अशा विविध कारणांमुळे पिकावर परिणाम झाला. त्यामुळे यंदा ऊस उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com