कमी दराने साखर विक्री अंगलट येण्याची शक्यता

राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे दर उच्चांकी असताना राज्यातील काही कारखानदार कमी किमतीत साखर विकत असल्याने साखर उद्योगात अडचणीची स्थिती निर्माण झाली आहे.
Sugar sales at low rates are likely to decline
Sugar sales at low rates are likely to decline

कोल्हापूर : राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे दर उच्चांकी असताना राज्यातील काही कारखानदार कमी किमतीत साखर विकत असल्याने साखर उद्योगात अडचणीची स्थिती निर्माण झाली आहे. 

काही व्यापारी कारखानदारांकडून ३१०० ते ३२०० याच दरामध्ये साखरेची खरेदी गडबडीने करून नफा मिळवण्याचा प्रयत्न करीत आहेत. मागणी वाढत असल्याने कारखानदारही मिळेल त्या किमतीत साखर विक्री करत असल्याने कारखान्यांना तोटा होण्याची शक्यता असल्याचे साखर उद्योगातील सूत्रांनी सांगितले.

साखर दराचे उड्डाण सुरूच आंतरराष्ट्रीय बाजारात दररोज साखर दराची वाढती कमान कायम आहे. शुक्रवारी (ता. ८) लंडन शुगर वायदे बाजारात  रिफाइंड व्हाइट साखरेचे दर प्रति टन ५२० डॉलरपर्यंत पोहोचले होते. एप्रिलपासून सप्टेंबर अखेरपर्यंतच्या कालावधीत तब्बल शंभर डॉलरनी साखर दराची वाढ झाली आहे. हा एक विक्रमच असल्याचे साखर उद्योगातून सांगण्यात आले. जागतिक बाजारातील सर्वात मोठा साखर उत्पादक देश असलेल्या ब्राझीलमध्ये निर्माण झालेली दुष्काळ सदृश स्थिती व अति थंडी या परिस्थितीमुळे साखर हंगाम २०२१-२२ मध्ये ब्राझीलमध्ये अंदाजे ७० ते ७५ लाख टन साखर उत्पादन कमी होण्याचा अंदाज आहे.

जागतिक बाजारात जानेवारी ते मे या कालावधीत कच्च्या साखरेची मोठी मागणी राहील ती भारतासाठी फायद्याची आहे. डिसेंबर २१ पर्यंत आवश्यक असणारी कच्ची साखर मोठ्या कंपन्यांनी भारतातून खरेदी केली असल्यामुळे सध्या कच्च्या साखरेची मागणी मंदावली आहे. परंतु जागतिक बाजारातील या मोठ्या कंपन्यांना जानेवारीनंतर जी साखर आवश्यक आहे त्यासाठी त्यांना भारताशिवाय दुसरा पर्याय नाही, याचा विचार करता भारतीय कारखानदारांनी साखर विक्रीचे नियोजन करणे आवश्यक आहे.

जागतिक बाजारात दरवाढीला आता सुरुवात झाली आहे. जागतिक बाजारात होत असलेल्या रिफाइन पांढऱ्या साखरेचा दर याचा विचार करता भारतीय बाजारातील २०२१- २२ हंगामातील एस ३० (बारीक साखर) पांढऱ्या साखरेला अंदाजे प्रतिक्विंटल ३३०० ते ३४०० रुपये पेक्षा अधिकचा दर मिळणे अपेक्षित आहे. (कारखाना ते बंदर वाहतूक खर्च रु १०० ते १०० प्रति क्विंटल सह) यावर्षी एस ३० बारीक पांढरी साखर  महाराष्ट्रातून संपली आहे. त्यामुळे हंगाम २०२१-२२ मध्ये उत्पादित होणाऱ्या बारीक साखरेला मोठ्या प्रमाणात मागणी येऊ शकते.

निर्यातदार सूत्रांनी सांगितले की, कारखानदारांनी आपल्या काही आर्थिक गरजा भागवण्यासाठी कमी दराने साखर विक्री करू नये. अन्यथा जागतिक बाजारातील दर किती वाढत गेले तरी भारतीय कारखानदारीला त्याचा फायदा होऊ शकणार नाही. ज्या प्रमाणात रिफाइंड पांढरे साखरेचे दर वाढत आहेत त्या प्रमाणात कच्च्या साखरेचे दर वाढत नसल्याची स्थिती आहे.

जागतिक बाजारात दरवाढीला आता सुरुवात झाली आहे. जागतिक बाजारात होत असलेल्या रिफाइन पांढऱ्या साखरेचा दर याचा विचार करता भारतीय बाजारातील २०२१- २२ हंगामातील एस ३० (बारीक साखर) पांढऱ्या साखरेला अंदाजे प्रतिक्विंटल ३३०० ते ३४०० रुपये पेक्षा अधिकचा दर मिळणे अपेक्षित आहे. (कारखाना ते बंदर वाहतूक खर्च रु १०० ते १०० प्रति क्विंटल सह) यावर्षी एस ३० बारीक पांढरी साखर  महाराष्ट्रातून संपली आहे. त्यामुळे हंगाम २०२१-२२ मध्ये उत्पादित होणाऱ्या बारीक साखरेला मोठ्या प्रमाणात मागणी येऊ शकते. निर्यातदार सूत्रांनी सांगितले की, कारखानदारांनी आपल्या काही आर्थिक गरजा भागवण्यासाठी कमी दराने साखर विक्री करू नये. अन्यथा जागतिक बाजारातील दर किती वाढत गेले तरी भारतीय कारखानदारीला त्याचा फायदा होऊ शकणार नाही. ज्या प्रमाणात रिफाइंड पांढरे साखरेचे दर वाढत आहेत त्या प्रमाणात कच्च्या साखरेचे दर वाढत नसल्याची स्थिती आहे.

साखर कारखानदार कमी दराने साखर विक्री करत आहेत ही बाब खरी आहे. २०२१-२२  व २०२२ -२३ हे हंगाम भारतीय कारखानदारीसाठी सुवर्णकाळ आहे. याचा विचार करून साखर विक्री नियोजन करणे गरजेचे आहे. जागतिक बाजारात रिफाइंड साखरेचे दर वाढत असल्यामुळे भारतीय एस ३० बारीक साखरेला मोठ्या प्रमाणात मागणी येईल, परिणामी निर्यातीचे दर व देशांतर्गत बाजारातील साखरेचे दर लिंक होतील. कारखानदारांनी गडबड न करता साखर विक्रीचे नियोजन करावे, असे वाटते. काही मूठभर कारखान्यांचे चुकीचे निर्णयामुळे संपूर्ण कारखानदारीला जागतिक बाजारातील दरवाढीचा फायदा मिळू शकणार नाही याचा विचार करावा. - अभिजित घोरपडे, साखर निर्यातदार

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com