ऊस तोडणी कामगारांच्या मागण्यांबाबत साखर संघाची समिती 

राज्यातील ऊस तोडणी व वाहतूक कामगारांच्या मागण्यांबाबत रास्त व व्यवहार्य तोडगा काढण्यासाठी साखर संघाने समिती स्थापन केली आहे.
cane chopping
cane chopping

पुणे: राज्यातील ऊस तोडणी व वाहतूक कामगारांच्या मागण्यांबाबत रास्त व व्यवहार्य तोडगा काढण्यासाठी साखर संघाने समिती स्थापन केली आहे. 

कामगारांसोबत यापूर्वी झालेला ऊस तोडणी सामंजस्य करार २०१९-२० समाप्त झालेला आहे. त्यामुळे नव्या कराराबाबत सात ऊस तोडणी व वाहतूक मुकादम संघटनांनी साखर संघाला निवेदन दिले आहे. 

या संघटनांनी साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, उपाध्यक्ष श्रीराम शेटे, आबासाहेब पाटील, माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्यासोबत चर्चा केली होती. साखर संघाच्या संचालक मंडळात याबाबत चर्चा करून निर्णय घेऊ, असे या बैठकीत ठरले होते. 

संचालक मंडळाने या मागण्यांवर चर्चा केली असता स्वतंत्र समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. समितीमध्ये दांडेगावकर यांच्यासह श्रीराम शेटे, हर्षवर्धन पाटील, प्रकाश सोळंके, प्रकाश आवाडे, भानुदास मुरकुटे, अरूण लाड, राजेंद्र नागवडे व कल्याणराव काळे यांचा समावेश आहे. 

या समितीची बैठक गुरूवारी (ता.२४) झाली असता विविध संघटनांनी आपल्या मागण्या रास्त व व्यवहार्य पातळीवर आणाव्यात, असा प्रस्ताव दिला आहे. तसेच, विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी देखील आपली बाजू मांडली.  लवकरच तोडगा  कामगार संघटनांशी चर्चा सकारात्मक झाली आहे. त्यामुळे मागण्यांबाबत लवकरच व्यवहार्य तोडगा काढला जाईल, अशी ग्वाही साखर संघाच्या अध्यक्षांनी यावेळी कामगार प्रतिनिधींना दिली.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com