जगात सर्वाधिक दूध उत्पादनाची टिमकी वाजविणाऱ्या आपल्या देशात मुळातच दुधाचे सेवन फारच कमी आहे.
अॅग्रो विशेष
कारखान्यांपुढे साखर विक्रीचे आव्हान
गेल्या काही दिवसांत देशात वाढणारी थंडी व सणासुदीचे दिवस संपल्याने आता देशातील कारखान्यांपुढे कोट्याएवढ्या साखरेची विक्री करण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.
कोल्हापूर : गेल्या काही दिवसांत देशात वाढणारी थंडी व सणासुदीचे दिवस संपल्याने आता देशातील कारखान्यांपुढे कोट्याएवढ्या साखरेची विक्री करण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. वाढत्या थंडीमुळे शीतपेय उद्योगांतून मागणी कमी होत असल्याने आता गेल्या वर्षीची साखर संपविण्यासाठी कारखान्यांचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत.
गेल्या दोन महिन्यांच्या साखर खरेदी विक्रीचा आढावा घेतल्यास दिवाळीच्या पार्श्वभूमीवर साखरेच्या मागणीत काहीशी वाढ दिसून आली. केंद्राने सणांचे दिवस लक्षात घेऊन कारखान्यांना नोव्हेंबरमध्ये २२.५० लाख टन साखर विक्रीचा कोटा दिला. दिवाळीच्या दरम्यान देशात अनेक ठिकाणी कोरोनाचे प्रमाण घटल्याने मिठाई उत्पादकांनी मिठाईच्या उत्पादनाला प्राधान्य दिले. यामुळे ऑक्टोबरच्या उत्तरार्धापासून साखरेच्या मागणीत वाढ झाली.
देशातील बहुतांशी राज्यांमध्ये साखरेची विक्री किमान विक्री दराप्रमाणे म्हणजेच ३१०० रुपयापर्यंत झाली. साधारणतः: नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत साखरेची मागणी बऱ्यापैकी होती. दिवाळी संपल्यानंतर मिठाईसाठीची मागणी कमी झाली. त्यातच थंडी सुरु झाल्याने शीतपेय उद्योगानेही हात आखडता घेतला. परिणामी साखरेच्या मागणीत घट झाली आहे.
केंद्राने ३३०० रुपये किमान विक्री मूल्य करण्याच्या हालचाली केल्या होत्या. परंतु त्याचीही अंमलबजावणी न झाल्याने विक्री वाढून ही कारखानदारांना २०० रुपयांचा तोटा सहन करावा लागला. गेल्या वर्षी साधारणतः: देशात ११५ लाख टन साखर शिल्लक होती. केंद्राने यंदाच्या आक्टोबरमध्ये २३ लाख टन साखरेचा कोटा निर्धारित केला. तर नोव्हेंबर मध्ये २२.५० लाख टन साखर कोट्याला मंजुरी दिली.
अनेक कारखान्यांनी सणासुदीच्या मागणीचा लाभ उठवत साखर विक्रीला प्राधान्य दिले. यामुळे ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात साखरेचा उठाव झाला. या कालावधीत चाळीस लाख टनांपर्यंत साखरेची विक्री झाली. अजूनही देशात सत्तर ते पंचाहत्तर लाख टन साखर विक्रीचे आव्हान आहे. आता मार्च पर्यंत साखरेला उठाव कमी राहण्याची शक्यता असल्याचे साखर उद्योगातील तज्ज्ञांनी सांगितले. सध्या होणारे उच्चांकी साखर उत्पादन व गेल्या वर्षीच्या साखरेचा दबाव या पार्श्वभूमीवर साखर विक्री करण्याचे आव्हान कारखान्यांपुढे आहे.
केंद्रीय अन्न मंत्रालयाने डिसेंबरसाठी कारखान्यांचा साखर विक्रीचा कोटा जाहीर केला आहे. डिसेंबर महिन्यासाठी देशाच्या ५५० कारखान्यांना साखर विक्रीचा २१.५० लाख टन कोटा देण्यात आला. या कोट्याप्रमाणे साखर विक्री करणे आता कारखान्यांना अडचणीचे ठरणार आहे.
प्रतिक्रिया...
गेल्या दोन महिन्याच्या तुलनेत डिसेंबरमध्ये साखरेला मागणी कमी राहण्याची शक्यता आहे. कारखान्यांना कोट्याप्रमाणे साखर विक्री करण्यासाठी जादा प्रयत्न करावे लागतील. केंद्राने किमान विक्री मूल्य दरात तातडीने वाढ करण्याची गरज आहे.
- विजय औताडे, साखर तज्ज्ञ
- 1 of 653
- ››