साखरेला प्रतिक्विंटल ३५०० रुपये दर मिळावा ः शिंदे

केंद्र सरकारने साखरेला प्रतिक्विंटल ३५०० रुपये आधारभूत दर निश्‍चित केला, तरच उसाला एफआरपीप्रमाणे दर देणे कारखान्यांना शक्य होईल, असे विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याचे अध्यक्ष, आमदार बबनराव शिंदे यांनी सांगितले.
Sugar should be priced at Rs 3,500 per quintal: Shinde
Sugar should be priced at Rs 3,500 per quintal: Shinde

सोलापूर ः केंद्र सरकारने साखरेला प्रतिक्विंटल ३५०० रुपये आधारभूत दर निश्‍चित केला, तरच उसाला एफआरपीप्रमाणे दर देणे कारखान्यांना शक्य होईल, असे विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याचे अध्यक्ष, आमदार बबनराव शिंदे यांनी सांगितले.

विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याची २१ वी ऑनलाइन अधिमंडळ वार्षिक सर्वसाधारण सभा कारखान्याचे अध्यक्ष, आमदार शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्या वेळी ते बोलत होते.

आमदार शिंदे म्हणाले, की ऊसदरासह कर्ज व त्यावरील व्याज यामुळे कारखाने अडचणीत येतील. मागील हंगामात केंद्र शासनाने साखरेचे उत्पादन जास्त झाल्याने निर्यात साखरेस अनुदान देणेचे धोरण निश्‍चित केल्याचा फायदा कारखान्याना एफआरपी देण्यासाठी झालेला आहे. तरीही अनुदानाचे ७४ कोटी रुपये कारखान्यांना येणे बाकी आहे. कारखानदारी अत्यंत अडचणीतून मार्गक्रमण करीत आहे. आम्ही चालू गळीत हंगामात शेतकऱ्यांना प्रतिटन दोन हजार रुपये अॅडव्हान्स दिलेला आहे. तसेच उसाचे सर्व बिल दिले आहे, असेही आमदार शिंदे म्हणाले. उपाध्यक्ष वामन उबाळे यांच्यासह संचालक उपस्थित होते. स्वागत, प्रास्ताविक व विषय पत्रिकेचे वाचन प्रभारी कार्यकारी संचालक सुहास यादव यांनी केले. आभार संचालक सुरेश बागल यांनी मानले.

सहा लाख पोती निर्यात करणार केंद्र शासनाने ठरवून दिलेल्या साखर निर्यात कोट्याप्रमाणे साखर विक्री झालेली आहे. आणखी ६ लाख पोती साखर निर्यात करण्याचा प्रयत्न आहे. पुढील हंगामात दररोज तीन लाख लिटर इथेनॉल तयार करणार आहोत. ६ कोटी ७५ लाख युनिट वीज निर्यात केली आहे. चालू हंगामात दोन्ही युनिटचे मिळून १९ लाख मेट्रिक टन गाळप झाले आहे. डिस्टलरी प्रकल्पात वाढ करून इथेनॉल कसे वाढेल, यासाठी प्रयत्न करणार आहे, असे आमदार शिंदे म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com