Agriculture news in Marathi Sugar should be priced at Rs 3,500 per quintal: Shinde | Page 2 ||| Agrowon

साखरेला प्रतिक्विंटल ३५०० रुपये दर मिळावा ः शिंदे

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 2 एप्रिल 2021

केंद्र सरकारने साखरेला प्रतिक्विंटल ३५०० रुपये आधारभूत दर निश्‍चित केला, तरच उसाला एफआरपीप्रमाणे दर देणे कारखान्यांना शक्य होईल, असे विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याचे अध्यक्ष, आमदार बबनराव शिंदे यांनी सांगितले.

सोलापूर ः केंद्र सरकारने साखरेला प्रतिक्विंटल ३५०० रुपये आधारभूत दर निश्‍चित केला, तरच उसाला एफआरपीप्रमाणे दर देणे कारखान्यांना शक्य होईल, असे विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याचे अध्यक्ष, आमदार बबनराव शिंदे यांनी सांगितले.

विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याची २१ वी ऑनलाइन अधिमंडळ वार्षिक सर्वसाधारण सभा कारखान्याचे अध्यक्ष, आमदार शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्या वेळी ते बोलत होते.

आमदार शिंदे म्हणाले, की ऊसदरासह कर्ज व त्यावरील व्याज यामुळे कारखाने अडचणीत येतील. मागील हंगामात केंद्र शासनाने साखरेचे उत्पादन जास्त झाल्याने निर्यात साखरेस अनुदान देणेचे धोरण निश्‍चित केल्याचा फायदा कारखान्याना एफआरपी देण्यासाठी झालेला आहे. तरीही अनुदानाचे ७४ कोटी रुपये कारखान्यांना येणे बाकी आहे. कारखानदारी अत्यंत अडचणीतून मार्गक्रमण करीत आहे. आम्ही चालू गळीत हंगामात शेतकऱ्यांना प्रतिटन दोन हजार रुपये अॅडव्हान्स दिलेला आहे. तसेच उसाचे सर्व बिल दिले आहे, असेही आमदार शिंदे म्हणाले. उपाध्यक्ष वामन उबाळे यांच्यासह संचालक उपस्थित होते. स्वागत, प्रास्ताविक व विषय पत्रिकेचे वाचन प्रभारी कार्यकारी संचालक सुहास यादव यांनी केले. आभार संचालक सुरेश बागल यांनी मानले.

सहा लाख पोती निर्यात करणार
केंद्र शासनाने ठरवून दिलेल्या साखर निर्यात कोट्याप्रमाणे साखर विक्री झालेली आहे. आणखी ६ लाख पोती साखर निर्यात करण्याचा प्रयत्न आहे. पुढील हंगामात दररोज तीन लाख लिटर इथेनॉल तयार करणार आहोत. ६ कोटी ७५ लाख युनिट वीज निर्यात केली आहे. चालू हंगामात दोन्ही युनिटचे मिळून १९ लाख मेट्रिक टन गाळप झाले आहे. डिस्टलरी प्रकल्पात वाढ करून इथेनॉल कसे वाढेल, यासाठी प्रयत्न करणार आहे, असे आमदार शिंदे म्हणाले.

 


इतर ताज्या घडामोडी
शाश्‍वत कापूस उत्पादन तंत्रज्ञान अवगत...अकोला ः कापूस हे विदर्भातील प्रमुख पीक आहे. या...
अकोल्यात ५५ हजार हेक्टरला तडाखाअकोला ः गेल्या आठवड्यात जिल्ह्यात ५२ पैकी ३५...
रत्नागिरीत हजार हेक्टर भातक्षेत्र...रत्नागिरी : अतिवृष्टीमुळे मोठ्या नद्यांना आलेल्या...
सांगलीत ३३ हजार हेक्टर पिकांचे नुकसानसांगली : जिल्ह्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून...
खानदेशात पंधरा हजार हेक्टर बाजरीची...जळगाव : खानदेशात यंदा पाऊस लांबल्याने आणि...
नाशिक बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांचे...नाशिक : नाशिक बाजार समितीसंदर्भात शासनाकडे...
खानदेशात हलक्या सरी; जोरदार पावसाचा अभावजळगाव : खानदेशात यंदा पाऊसमान अद्याप कमी आहे....
नांदेड जिल्ह्यात पीकविमा योजनेत नऊ लाख...नांदेड : पंतप्रधान पीक विमा योजनेत शेतकऱ्यांनी...
मराठवाड्यातील पशुविज्ञान केंद्राचे घोडे...परभणी ः भारतीय कृषी संशोधन परिषदेने महाराष्ट्र...
परभणी जिल्ह्यात भाजीपाला पिकांची नासाडीपरभणी ः अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेकडो एकरवरील...
पैसे थकवणाऱ्या व्यापाऱ्यांचे लिलाव बंद...सोलापूर ः शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या पट्ट्या...
पुण्यात लाख हेक्टरवर खरिपाच्या पेरण्या पुणे : जिल्ह्यात जुलै महिन्याच्या तिसऱ्या...
पीकविम्यासाठी स्वाभिमानीचा कृषी...पुणे : पीकविमा योजनेतील गेल्या खरिपाची नुकसान...
नगरमध्ये खरीप पेरण्यांनी सरासरी ओलांडली नगर : नगर जिल्ह्यात खरिपाच्या पेरण्यांनी सरासरी...
`लातूरला शेतकऱ्यांनी भरला २३ कोटीचा...लातूर : ‘‘पंतप्रधान खरीप पीक विमा २०२१...
नियमित कर्जदार शेतकऱ्यांना  मिळणार...गोंदिया : राज्य सरकारने नियमित कर्ज परतफेड...
सातारा : पाच हजार हेक्टर क्षेत्र ...सातारा : जिल्ह्यात मागील आठवड्यात झालेल्या...
सांगलीतील पूर ओसरू लागला  सांगली : कृष्णा नदीला आलेल्या महापुराचा सांगली...
सिंधुदुर्गमध्ये नुकसानीचे पंचनामे सुरू सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात अतिवृष्टीने झालेल्या...
पुराचा वारंवार फटका बसणाऱ्या घरांच्या...सांगली : ज्या भागातील घरांना आणि रहिवाशांना...