Agriculture news in Marathi, Sugar, Sugar Factories, Sugar Season | Agrowon

ऑक्टोबरमध्ये ४ लाख टन साखर उत्पादनाची शक्यता
मनोज कापडे
गुरुवार, 24 ऑगस्ट 2017

नव्या हंगामात कारखान्यांसाठी ९ लाख हेक्टरपेक्षा जादा ऊस उपलब्ध राहू शकतो, असा सहकार विभागाचादेखील अंदाज आहे. यंदा किमान १२४ साखर कारखाने पहिल्याच टप्प्यात सुरू होऊ शकतात.

पुणे : राज्याचा ऊस गाळप हंगाम सुरू करण्यासाठी यंदा सरकारने वेळेत परवानगी दिल्यास ऑक्टोबरमध्ये कारखान्यांकडून किमान चार लाख टन साखर तयार केली जाऊ शकते, अशी माहिती कारखानदार सूत्रांनी दिली.

राज्यात २०१५-१६ मधील हंगामात शेतकऱ्यांनी ९ लाख ८७ हजार हेक्टरवर ऊस केला होता. मात्र, दुष्काळामुळे २०१६-१७ मध्ये अवघ्या ६ लाख ३३ हजार हेक्टरवर ऊस पिकवला गेला. कमी उसामुळे गेल्या हंगामात २७ कारखाने बंद ठेवावे लागेल. गेल्या हंगामात दीडशे साखर कारखान्यांनी ३७२.४५ लाख टन उसाचे गाळप केले. त्यापासून ४१.८६ लाख टन साखर तयार केली होती. यंदा वेळेत गाळप सुरू झाल्यास किमान चार लाख टन साखर हंगामाच्या पहिल्याच महिन्यात तयार होऊ शकते.
पावसामुळे पिकाची स्थितीदेखील सुधारली आहे. 

नव्या हंगामात कारखान्यांसाठी ९ लाख हेक्टरपेक्षा जादा ऊस उपलब्ध राहू शकतो, असा सहकार विभागाचादेखील अंदाज आहे. यंदा किमान १२४ साखर कारखाने पहिल्याच टप्प्यात सुरू होऊ शकतात. देशाचा विचार करता ऑक्टोबरमध्ये २६० साखर कारखाने सुरू होतील. त्यात उत्तर प्रदेशातील ९२ कारखान्यांचा समावेश राहील, असे सूत्रांचे म्हणणे आहे. 

महाराष्ट्राच्या तुलनेत उत्तर प्रदेशात एक महिना उशिरा म्हणजेच नोव्हेंबरपासून गाळप सुरू होते. मात्र, यंदा तेथे भरपूर उसामुळे साखर कारखाने लवकर सुरू होत आहेत. उत्तर प्रदेशातील कारखान्यांकडून ऑक्टोबरमध्ये किमान पावणेतीन लाख टनाच्या आसपास साखर तयार करण्याइतपत गाळप होण्याची चिन्हे आहेत. राज्याच्या शेजारील कर्नाटक व गुजरातमधील गाळपदेखील ऑक्टोबरपासून सुरू होण्याची शक्यता आहे. मात्र, तेथील साखर उत्पादन पहिल्या महिन्यामध्ये एक लाख टनाच्या पुढे जाण्याची शक्यता कमी असल्याचे कारखानदारांना वाटते. 
 

इतर अॅग्रो विशेष
सरकी ढेपेचे दर कडाडल्याने दूध उत्पादक...अकोला : दुधाळ जनावरांना पोषक खाद्य म्हणून खाऊ...
लष्करी अळीपासून कपाशीला धोका नाहीः कृषी...पुणे: राज्याच्या कापूस पिकाला अमेरिकन लष्करी...
खानदेशातही कापसावर लष्करी अळीजळगाव  : खान्देशात जळगाव, धुळे जिल्ह्यांतील...
विधानसभेचा बिगुल वाजलामुंबई: चौदाव्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे...
कांदा दरस्थिती आढाव्यासाठी केंद्राचे...नाशिक : कांदा दर, आवक स्थितीचा आढावा...
पापड उद्योगातून मिळाले शेतीला आर्थिक बळकहाटूळ (ता. शहादा, जि. नंदुरबार) येथील आशा व...
बाजारपेठेनुसारच पीक लागवडीचे नियोजनआष्टा (ता. वाळवा, जि. सांगली) येथील सौ. मृदुला...
अमेरिकन लष्करी अळीची कपाशीवरही चाल ! (...नगर : अमेरिकन लष्करी अळीने (स्पोडोप्टेरा...
महाराष्ट्रात २१ ऑक्टोबरला मतदान, २४ ला...नवी दिल्ली : महाराष्ट्रासह हरियाना राज्य...
नावीन्यपूर्ण संकल्पना रुजवीत यशस्वी...लासलगाव (जि. नाशिक) येथील शंतनू नानासाहेब पाटील...
औरंगाबाद रेशीम उपसंचालक कार्यालयाला...औरंगाबाद : मराठवाड्याची राजधानी औरंगाबाद येथे...
कोकण कृषी विद्याठाकडून बांबूच्या २६...दाभोळ, जि. रत्नागिरी  : कोकणात व्यावसायिक...
नगर जिल्ह्यात तागावर स्पोडोप्टेरा अळीचा...नगर ः मक्यावर अमेरिकन लष्करी अळीने (स्पोडोप्टेरा...
पावसामुळे खानदेशात उडदाचे नुकसानजळगाव  ः सततच्या पावसामुळे खानदेशात उडदाचे...
नागपूर विभागात तीन गावे लष्करी अळीच्या...नागपूर ः राज्यभरात मक्‍यावरील अमेरिकन लष्करी...
राज्यात अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरीपुणे ः  कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यातील...
श्रमशक्तीच्या जागरातून घडवूया समृद्ध...कितीही प्रगती झाली तरी मानवी जीवन, निसर्ग आणि...
शेतकऱ्यांच्या ‘महारोषा’चे काय?मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील...
खानदेशात लष्करी अळीकडून ४० टक्के मका...जळगाव  ः खानदेशात मका पिकावर अमेरिकन लष्करी...
नाशिक जिल्ह्यात मका लष्करी अळीच्या...नाशिक  : जिल्ह्यात यंदा अमेरिकन लष्करी अळीचा...