साखर संघातर्फे मुख्यमंत्री सहायता निधीस ५१ लाख रुपयांची मदत

महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाच्या वतीने कोविडच्या उपचारासाठी शासनास ५१ लाख रुपयांची मदत देण्यात आली. संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांना हा निधी सुपूर्द करण्यात आला.
Sugar team donates Rs 51 lakh to CM assistance fund
Sugar team donates Rs 51 lakh to CM assistance fund

कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाच्या वतीने कोविडच्या उपचारासाठी शासनास ५१ लाख रुपयांची मदत देण्यात आली. संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांना हा निधी सुपूर्द करण्यात आला. सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील, व्यवस्थापकीय संचालक संजय खताळ उपस्थित होते.

गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची दुसरी लाट तीव्र होत आहे. राज्याच्या विविध शहरांत कोरोनामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी शासनाचे प्रयत्न सुरू आहेत. राज्यात ज्या-ज्या वेळी अशी नैसर्गिक आपत्ती निर्माण झाली त्या-त्या वेळी साखर उद्योगाने पुढाकार घेऊन सामाजिक दायित्वाची जाणीव ठेवून राज्य शासनास मदत केलेली आहे.

याबाबत संघाच्या संचालक मंडळात चर्चा होऊन मुख्यमंत्री सहायता निधीस मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्यातील सर्व सहकारी साखर कारखान्यांच्या वतीने ही मदत देण्यात आल्याचे साखर संघातर्फे सांगण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com