Agriculture news in Marathi Sugar team donates Rs 51 lakh to CM assistance fund | Page 2 ||| Agrowon

साखर संघातर्फे मुख्यमंत्री सहायता निधीस ५१ लाख रुपयांची मदत

टीम अॅग्रोवन
बुधवार, 12 मे 2021

महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाच्या वतीने कोविडच्या उपचारासाठी शासनास ५१ लाख रुपयांची मदत देण्यात आली. संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांना हा निधी सुपूर्द करण्यात आला.

कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाच्या वतीने कोविडच्या उपचारासाठी शासनास ५१ लाख रुपयांची मदत देण्यात आली. संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांना हा निधी सुपूर्द करण्यात आला. सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील, व्यवस्थापकीय संचालक संजय खताळ उपस्थित होते.

गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची दुसरी लाट तीव्र होत आहे. राज्याच्या विविध शहरांत कोरोनामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी शासनाचे प्रयत्न सुरू आहेत. राज्यात ज्या-ज्या वेळी अशी नैसर्गिक आपत्ती निर्माण झाली त्या-त्या वेळी साखर उद्योगाने पुढाकार घेऊन सामाजिक दायित्वाची जाणीव ठेवून राज्य शासनास मदत केलेली आहे.

याबाबत संघाच्या संचालक मंडळात चर्चा होऊन मुख्यमंत्री सहायता निधीस मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्यातील सर्व सहकारी साखर कारखान्यांच्या वतीने ही मदत देण्यात आल्याचे साखर संघातर्फे
सांगण्यात आले.


इतर बातम्या
औरंगाबाद :सोयाबीनची सरासरीच्या दीडपट...औरंगाबाद : सोयाबीनची सरासरी क्षेत्राच्या दीडपट...
जळगाव जिल्ह्यात ५७ टक्के पाऊसजळगाव : जिल्ह्यात आतापर्यंत ५७ टक्के पाऊस झाला...
शनिवारपर्यंत सुरू राहणार मका, ज्वारीची...औरंगाबाद : राज्यात रब्बीतील मका व ज्वारी खरेदीला...
परभणी जिल्ह्यात पीकविमा तक्रारींचा...परभणी ः पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गंत टोल फ्री...
नाशिक जिल्ह्यात धरणसाठा ४६ टक्क्यांवरनाशिक : गत सप्ताहात जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट...
सोलापूर ःविमा कंपनी शेतकऱ्यांपर्यंत...सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात पीकविम्यासाठी भारती...
अकोला ः नैसर्गिक आपत्तीनंतर पीकविमा...अकोला ः पीकविमा हा आपत्तीच्या काळात शेतकऱ्यांना...
मराठवाड्यात एक लाख हेक्टरवर पीकनुकसानऔरंगाबाद : मराठवाड्यातील आठपैकी सहा जिल्ह्यांत...
मंगळवेढ्यात सूर्यफूल पीकविम्यातून वगळलेमंगळवेढा, जि. सोलापूर ः मंगळवेढा तालुक्यात...
कोल्हापूर : पीकविम्याच्या ऑनलाइन...कोल्हापूर : विमा योजनेत सहभागाबाबतीत राज्यात...
नाशिक : पीकविम्याबाबत तक्रारींचा पाढानाशिक : पीकविमा कंपन्यांची असक्षम यंत्रणा......
सिंधुदुर्गात कार्यालय; पण शेतकऱ्यांना...सिंधुदुर्गनगरी : विमा कंपनीचे सिंधुदुर्गनगरी येथे...
रत्नागिरी : पूरबाधित शेतकऱ्यांची...रत्नागिरी : जिल्ह्यातील नदी किनारी भागात पुरामुळे...
नांदेडमध्ये विमा कंपनीचे जिल्ह्याच्या...नांदेड : पंतप्रधान पीकविमा योजनेत जिल्ह्यासाठी...
पावसाची उसंत, सावरण्याची धडपड सुरु पुणे : पावसासाठी पोषक वातावरण नसल्याने पावसाचा...
नगर : विमा कार्यालय, हेल्पलाइन नंबरची... नगर : नुकसानीची शेतकऱ्यांना भरपाई मिळावी,...
कोल्हापूर : पूर फुटाने वाढला, इंचाने...कोल्हापूर : जिल्ह्यातील पूरस्थिती हळूहळू कमी होत...
विमा कंपन्यांचा राज्यभर सावळागोंधळ पुणे ः पंतप्रधान पीकविमा योजनेतील खासगी विमा...
कोकणात मुसळधारेची शक्यता पुणे : कोकणसह संपूर्ण राज्यात पावसाचा जोर कमी...
राजकीय नेत्यांनी पूरग्रस्त भागांचे दौरे...मुंबई : राजकीय नेत्यांनी पूरग्रस्त भागाचे दौरे...