Agriculture news in marathi Sugar, vegetable distribute to Islampurkar | Agrowon

इस्लामपूरकरांना भाजीपाल्यासह साखरवाटप

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 7 एप्रिल 2020

नवेखेड, जि. सांगली : बोरगाव (ता. वाळवा) येथील ग्रामस्थांनी ‘लॉकडाऊन’मध्ये अडकलेल्या इस्लामपूरकरांना तीन ट्रॉल्या भाजीपाला व तीस क्विंटल साखरेचे वाटप करून मायेचा ओलावा जपला. 

नवेखेड, जि. सांगली : बोरगाव (ता. वाळवा) येथील ग्रामस्थांनी ‘लॉकडाऊन’मध्ये अडकलेल्या इस्लामपूरकरांना तीन ट्रॉल्या भाजीपाला व तीस क्विंटल साखरेचे वाटप करून मायेचा ओलावा जपला. 

इस्लामपूर शहरात ‘कोरोना’चे २५ रुग्ण सापडल्याने सर्वत्र खळबळ माजली आहे. त्यामुळे इस्लामपूर शहरात गेले आठवडाभर लॉकडाऊन कडक करण्यात आले. त्यामुळे लोकांच्या दैनंदिन गरजांचा प्रश्न निर्माण झाला आहे. याला पर्याय म्हणून दातृत्वाचे अनेक हात पुढे आले आहेत.

इस्लामपूर शहरापासून अवघ्या सात-आठ किलोमीटरवरील बोरगाव ग्रामस्थांनी इस्लामपूरकरांची अडचण लक्षात घेतली. कृष्णा काठावरील शेतकऱ्यांनी पिकविलेला भाजीपाला दिवसभर फिरून एकत्रित केला. अन्य काही वस्तू शेतकऱ्यांकडून आणल्या. भाजीपाला उपलब्ध नसलेल्या ग्रामस्थांनी रोख रक्कम दिली. त्यातून ३० क्विंटल साखर खरेदी करून त्याचेही वाटप इस्लामपूरकरांना केले. 

आता पुढील टप्प्यात एक दिवसाचे दूध संकलन करून ते इस्लामपुरात वाटप करण्यात येईल. त्याचबरोबर पोल्ट्री व्यवसायिकांकडून अंडी एकत्र करून त्याचे वाटप करण्यात येईल. जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र पाटील, उपसरपंच सूर्यकांत पाटील, माजी उपसरपंच प्रमोद शिंदे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष रणधीर पाटील, हेमंत पाटील, संतोष पाटील, सचिन डांगे, कृष्णकुमार वाटेगावकर, मालोजी पाटील, दीपक पाटील यांनी परिश्रम घेऊन ही मोहीम राबवली. 

भाऊ भावाच्या मदतीला धावला... 

भाऊ भावाच्या मदतीला धावून यावा, याप्रमाणे ग्रामस्थांनी मदत केली. महापुराने कृष्णा काठावर हाहाकार उडाला होता. गावातून बाहेर पडायचा एकमेव मार्ग म्हणचे इस्लामपूर शहराकडे जाणारा मार्ग. त्याच मार्गाने कृष्णा काठावरील ग्रामस्थ इस्लामपूर येथे दाखल झाले. इस्लामपूरकरांनी त्यांच्या जेवणाची, राहण्याची व्यवस्था केली होती. आता ‘कोरोना’मुळे इस्लामपूरवर संकटात आहे. त्यामुळे आवश्‍यक वस्तूंचा पुरवठा बोरगावातील ग्रामस्थांनी केला आहे. 
 


इतर ताज्या घडामोडी
खानदेशात पाऊस थांबला, वाफशाची प्रतीक्षाजळगाव : खानदेशात गुरुवारी (ता.२५) पाऊस थांबला....
सांगलीत नियोजनाअभावी थेट शेतमाल विक्री...सांगली : लॉकडाउनच्या काळात संपूर्ण बाजारपेठा बंद...
सोलापुरातील उपबाजार समित्यांचा प्रस्ताव...सोलापूर ः सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या...
कोल्हापुरात शेतकरी संघटनांकडून कृषी...कोल्हापूर : राज्यसभेत मंजूर झालेल्या कृषी...
नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे...सोलापूर ः अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या...
शेतकऱ्यांचे प्रश्‍न शासनाकडे पोचवणार :...नाशिक : ‘‘मी देखील शेतकऱ्याचाच मुलगा आहे. कांदा...
मराठवाड्यात कृषी विधेयकांची होळीऔरंगाबाद / परभणी /  नांदेड :...
वऱ्हाडात विधेयकांविरोधात ‘स्वाभिमानी’...अकोला : केंद्र शासनाने संसदेत नुकतीच...
`अमरावती जिल्ह्यात पीक नुकसानीचे...अमरावती :  जिल्ह्यात संततधार पावसामुळे...
जालना, औरंगाबादमधील दोन मंडळात अतिवृष्टीऔरंगाबाद : काही दिवसांपासून मराठवाड्याच्या...
नगरला निदर्शने, अकोलेत विधेयकांची होळीनगर : केंद्र सरकारने मंजूर केलेल्या तीन शेतकरी...
ऊसतोड मजुरांचा विमा सरकारने उतरवावा नगर ः राज्यात सध्या कोरोना व्हायरस संसर्ग वाढत...
परभणीत हिरव्या मिरचीला २५०० ते ४०००...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
दूध, अंडी ः मानवी आहारासाठी उपयुक्तआपल्या शरीराला लागणारी ऊर्जा आहारातून मिळते...
दहा हजाराची लाच स्वीकारणारा हुलजंतीचा...सोलापूर ः खरेदी केलेल्या जमीन दस्तावर दाखल...
`जतमध्ये मूग, उडीद खरेदी केंद्र सुरू...सांगली :जिल्ह्यात मूग व उडीद हमीभावाने खरेदी...
सांगलीत २८ टक्क्यांवरच ऊस लागवडसांगली :  जिल्ह्यात गेल्या आठवड्यापूर्वी...
खानदेशातील बाजारात उडदाच्या आवकेत घटजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...
नाशिकमध्ये खासदारांच्या घरासमोर  'राख...नाशिक : केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने...
नगर जिल्ह्यात कांदा बियाणे गरज,...नगर ः जिल्ह्यात दरवर्षी सुमारे एक लाख...