इथेनॉलकडे साखर वळविणार

येत्या हंगामात जादा ऊस गाळपाच्या शक्यतेमुळे साखरेचे उत्पादनही मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.
Sugar Factory
Sugar Factory

कोल्हापूर: येत्या हंगामात जादा ऊस गाळपाच्या शक्यतेमुळे साखरेचे उत्पादनही मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. जास्तीत जास्त कारखान्यांनी इथेनॉल निर्मितीकडे वळावे यासाठी वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनच्या (विस्मा) च्या वतीने कारखानदारांत जागृती करण्यात येत आहे. यंदा राज्यात बी हेवी मोलॅसीसपासून इथेनॉल निर्मिती करुन साखरेचे उत्पादन दहा लाख टनांनी कमी करण्याचे उद्दिष्ट ‘विस्मा’चे आहे. यासाठी उपाययोजनाही सुचविल्या आहेत. याबाबतचे सविस्तर विवेचन राज्यातील प्रत्येक कारखान्याला पाठविले आहे. 

गेल्या पंधरवड्यात ‘विस्मा’ने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत एका बैठकीत याबाबतचे मुद्दे मांडले. मंत्री गडकरी यांनी इथेनॉल तयार होईल तेवढे खरेदी करण्याचे आश्वासन दिले. तसेच एफआरपी, साखरेचे मूल्य, व आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रूड ऑइलचे दर याचा अभ्यास करुन इथेनॉलला दर चांगला देण्याची ग्वाही दिली. या सर्व सकारात्मक प्रयत्नांमुळे इथेनॉल निर्मिती फायदेशीर ठरेल असा विश्वास ‘विस्मा’ला आहे.   असे होऊ शकते इथेनॉल उत्पादन

  • स्वत:ची डिस्टलरी असलेले कारखाने थेट शुगर सिरपपासून इथेनॉल निर्मिती करु शकतात.
  • राज्यात १०८ कारखान्यांकडे डीस्टीलरी आहेत. त्यांच्याकडून साधरणत: २५ टक्के उसाचा रस शुगर सिरपच्या माध्यमातून डिस्टलरीकडे थेट पाठवून इथेनॉल निर्मिती शक्य.
  • अशा पद्धतीने इथेनॉल निर्मिती केल्यास १५ टक्के साखर उत्पादन कमी होऊ शकते.
  • बी-हेवी व शुगर सिरपच्या माध्यमातून २० लाख टन साखर कमी करता येईल.
  • गोदावरी शुगर रिफायनरी व सोमय्या ग्रुपची दिशादर्शक पद्धती

  • या कारखान्यांनी ३५ टक्के शुगर सिरप वापरुन इथेनॉल निर्मिती केली
  • गेल्या हंगामात १२ लाख टनांपैकी २६ टक्के उसाचा वापर थेट इथेनॉल निर्मितीसाठी केला
  • यातून ३५ टक्के साखरेचे उत्पादन कमी केले
  • हा प्रयोग राज्यातील कारखान्यांना शक्य
  • प्रतिक्रिया गेल्या हंगामाच्या तुलनेत यंदा साखरेचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. शंभर टनापेक्षा जास्त साखरेचे उत्पादन अपेक्षित आहे.  जादा साखर निर्मितीमुळे कारखानदारी अडचणीत येऊ शकते. यामुळे इथेनॉल निर्मिती हा चांगला पर्याय कारखानदारांपुढे आहे. साखरेचे उत्पादन फक्त खपाइतकेच करावे लागेल. उर्वरित वापर हा शंभर टक्के इथेनॉल, इतर केमिकल्स, बायो सिएनजी यासाठी केल्यास साखर उद्योग स्वावलंबी बनेल  - बी.बी. ठोंबरे, अध्यक्ष, वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशन

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com