सातारा जिल्ह्यात आडसाली उसाचे क्षेत्र ३२०० हेक्टरने घटले

सातारा जिल्ह्यात आडसाली उसाचे क्षेत्र ३२०० हेक्टरने घटले
सातारा जिल्ह्यात आडसाली उसाचे क्षेत्र ३२०० हेक्टरने घटले

सातारा ः जिल्ह्यात आडसाली ऊस लागवड करण्याकडे शेतकऱ्यांचा कल काहीसा कमी झाला आहे. जिल्ह्यात आडसालीची १७ हजार १५५ हेक्‍टर क्षेत्रावर ऊस लागवड झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत आडसाली ऊस लागवड क्षेत्रात ३२४० हेक्टरने घट झाली आहे. 

जिल्ह्याच्या पूर्व भागातही पाण्याची उपलब्धतता आहे. तसेच इतर पिकांच्या तुलनेत उसाला शाश्‍वत दर मिळत असला तरी आडसाली उसाचा कालावधी, तुटण्यास होत असलेला विलंब व अपेक्षित उत्पादन यामुळे प्रामुख्याने आडसाली ऊस लागवड करण्याकडे शेतकऱ्यांचा काहीसा कल कमी झाला असल्याचे दिसून येत आहे. आडसाली उसाचे क्षेत्र कमी झाल्याने कारखान्यांचे ऊसतोडणीचे वेळापत्रकात अडचणी येणार असून साखर उताराही कमी होण्याची शक्यता आहे. 

जिल्ह्यात आडसाली हंगामाअखेर १७ हजार १५५ हेक्‍टरवर उसाची लागवड झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत आडसाली ऊस लागवड ३२४० हेक्टरने घट झाली आहे. लागवड झालेल्या उसामध्ये को ८६०३२ या वाणाची सर्वाधिक लागवड असून त्यानंतर एमएस १०००१ या ऊस जातींस प्राधान्य दिले आहे. कऱ्हाड, फलटण, सातारा या तालुक्यात सर्वाधिक लागवड झाली. ऊस लागवडीचा पूर्व हंगाम संपला असून या हंगामात २१ हजार २६८ हेक्टरवर लागवड झाली आहे.

जिल्ह्यात ६२ लाख क्विंटल साखरेची निर्मिती  जिल्ह्यात कारखान्यांच्या संख्येत वाढ झाली असल्याने ऊस शिल्लक राहण्याची भीती कमी झाली आहे. या हंगामात जिल्ह्यातील १४ कारखान्यांकडून उसाचे वेगात गाळप सुरू असून एक मार्च अखेर ५५ लाख ८२ हजार मेट्रिक टन ऊसगाळप करत ६२ लाख ६५ हजार क्विंटल साखरेची निर्मिती केली आहे.    

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com