शिखर बँकेच्या वतीने सोलापुरात आज ऊस परिसंवाद

शिखर बँकेच्या वतीने सोलापुरात आज ऊस
शिखर बँकेच्या वतीने सोलापुरात आज ऊस

सोलापूर : महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेच्या (शिखर बँक) वतीने सोलापूर येथे ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुरुवारी (ता. ५) परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. ऊस उत्पादनातील विविध विषयांवर या वेळी शेतकऱ्यांना तज्ज्ञ मार्गदर्शन करतील. त्यासाठी स्वतंत्रपणे तांत्रिक सत्रेही यात होणार आहेत. 

येथील जामगुंडी मंगल कार्यालयात सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत हा परिसंवाद होईल. परिसंवादाचे उद्‍घाटन राज्याचे सहकार, मदत व पुनर्वसनमंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते होणार आहे. या वेळी बँकेचे प्रशासक विद्याधर अनासकर, प्रशासकीय सदस्य अविनाश महागावकर, संजय भेंडे, व्यवस्थापकीय संचालक डॉ. अजित देशमुख व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. 

महाराष्ट्रातील साखर कारखानदारी टिकावी आणि त्याची व्याप्ती वाढावी यासाठी पुणे येथे यशस्वीरीत्या पार पडलेल्या साखर परिषदेनंतर महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेच्या वतीने ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्यांवर मात करून गुणवत्ता पूर्ण उत्पादन घेता यावे, या उद्देशाने सदर परिसंवाद आयोजित केला आहे. 

महाराष्ट्रात विभानिहाय असे परिसंवाद शिखर बँक राबवणार येणार असल्याचे सांगण्यात आले. या परिसंवादाच्या उद्‍घाटन सत्रानंतर पाच विविध विषयांवर तांत्रिक सत्रे होणार आहेत.

हे तज्ज्ञ करणार मार्गदर्शन या परिसंवादात माळेगाव पुणे, येथील मुख्य ऊस विकास अधिकारी सुरेश जगदाळे ‘ऊस उत्पादन खर्च व व्यवस्थापन’, कृषी भूषण संजीव माने बियाणे व ऊस लागवड, तात्यासाहेब कोरे सहकारी साखर कारखान्याचे वारणाचे कार्यकारी संचालक शहाजी भगत ‘ऊस पीक व पाणी व्यवस्थापन’, जवाहर साखर कारखान्याचे मुख्य कृषी अधिकारी किरण कांबळे ‘ऊसतोडणी व्यवस्थापन’, याबाबत मार्गदर्शन करणार आहेत. तर परिसंवादाची सांगता कीटकशास्त्र कृषी विद्यालयाचे पांडुरंग मोहिते ‘उसावरील रोग- कीड व त्यावरील औैषधे’ या महत्त्वाच्या विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com