Agriculture news in marathi Sugarcane breaks down in sugar mills in Khandesh | Agrowon

खानदेशात साखर कारखान्यांना भासतोय उसाचा तुटवडा

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 23 जानेवारी 2020

जळगाव  : खानदेशातील जळगाव, नंदुरबार चार साखर कारखान्यांनी यंदाच्या गाळप हंगामात सहभाग नोंदविला आहे. उसाचा तुटवडा असल्याने यंदा साखर उत्पादनात घट होणार आहे. उसासाठी कारखान्यांना भटकंती करावी लागत असल्याची स्थिती आहे. 

जळगाव  : खानदेशातील जळगाव, नंदुरबार चार साखर कारखान्यांनी यंदाच्या गाळप हंगामात सहभाग नोंदविला आहे. उसाचा तुटवडा असल्याने यंदा साखर उत्पादनात घट होणार आहे. उसासाठी कारखान्यांना भटकंती करावी लागत असल्याची स्थिती आहे. 

यंदा कारखान्यांना उसाचा तुटवडा जाणवत असल्याने अनेक कारखाने मध्य प्रदेशातूनही उसाची खरेदी करीत आहेत. नंदुरबार जिल्ह्यातील दोन सहकारी व एक खासगी मिळून तीन साखर कारखान्यांनी गाळपात सहभाग घेतला. या तीन कारखान्यांनी शुक्रवारपर्यंत (ता. १७) चार लाख ३९ हजार ३५६ मेट्रिक टन उसाचे गाळप करीत सरासरी ९.४८ च्या उताऱ्याने ४ लाख १६ हजार ५७७ क्‍विंटल साखरेचे उत्पादन केले. जळगाव जिल्ह्यातील केवळ एका कारखान्याने गाळपात सहभाग नोंदवत १ लाख ९९० मेट्रिक टन उसाचे गाळप करत ९.८२ च्या उताऱ्याने ९९ हजार १४० क्‍विंटल साखरेचे उत्पादन केले. जळगाव जिल्ह्यात सहकारी कारखानदारीला फटका बसला आहे, तर धुळ्यात कुठलाही कारखाना सुरू नसल्याची माहिती मिळाली. 


इतर अॅग्रो विशेष
एक लाख टन मका म्यानमारमधून आयातनवी दिल्ली: देशात यंदा कमी उत्पादन झाल्याने...
राज्यातील बावीस कारखान्यांचा गाळप हंगाम...कोल्हापूर  : राज्यातील ऊस गाळप हंगाम हळूहळू...
दूध संकलनासह पदार्थनिर्मितीतून प्रगतीपुणे जिल्ह्यातील वढू (ता. शिरूर) येथील सुनील आणि...
एकलव्य शेतकरी बचत गटाचे उपक्रमगोळप (ता. जि. रत्नागिरी) गावातील एकलव्य शेतकरी...
विदर्भात आज गारपिटीचा इशारापुणे : पूर्व आणि पश्चिमेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांचा...
संघर्ष येथील संपणार कधी? शेती कसत असताना शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी, करावा...
`ज्ञानेश्‍वरी'त दडलंय कृषी विज्ञान कां सु क्षेत्री बीज घातले।  ते आपुलिया परी...
निर्यातबंदी उठविल्याचे कांदा बाजारात...नाशिक : केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री...
साडेआठशे कोटींची एफआरपी थकलीपुणे: राज्यातील साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक...
‘जानुबाई’, ‘केशवराज’ संस्था ठरल्या...पुणे: पाणीवापर संस्थांच्या माध्यमातून प्रभावी...
साम टीव्ही न्यूज महाराष्ट्रात ‘नंबर १’मुंबई ः सर्वोत्तम न्यूज चॅनेल्सच्या स्पर्धेत ‘...
कृषी परिषदेने विद्यापीठांसाठी नेमले...पुणे : महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण व संशोधन...
विदर्भात वादळी पावसाची शक्यतापुणे: पावसाला पोषक हवामान होत असल्याने विदर्भ,...
शेतकऱ्यांना खते, बियाणे अन् महिलांना...शुद्ध पाणीपुरवठा, गावाअंतर्गत सिमेंट रस्ते,...
सांगलीत तूर खरेदी ठप्पसांगली ः जिल्ह्यात हेक्टरी २५७ किलोच तूर खरेदी...
राज्यात गारठा वाढलापुणे  : उत्तरेकडून थंड वाऱ्यांचे प्रवाह...
चीनला द्राक्ष निर्यात सुरूसांगली ः जिल्ह्यात गेल्या वर्षी झालेल्या...
‘लिंकिंग’बाबत कंपन्यांना नोटिसापुणे  : रासायनिक खतांच्या बाजारपेठेत होत...
बाजार समित्यांच्या निवडणुका होणार...मुंबई  ः राज्यातील कृषी उत्पन्न बाजार...
भाजीपाला शेतीतून पेलल्या साऱ्या...लग्नानंतर अवघ्या तीन वर्षातच पतीच्या निधनामुळे...