कर्नाटकसाठीची ऊसतोडणी मंदावली

ऊस तोडणी
ऊस तोडणी

कोल्हापूर: दक्षिण महाराष्ट्रात उसाची रक्कम कारखान्याकडून तुटल्याने उत्पादक अस्वस्थ बनला आहे. या मानसिकतेतूनच उत्पादकांनी यंदा कर्नाटक सीमाभागातील कारखान्यांना ऊस पाठविण्यासही अनुत्सुकता दाखविली आहे. यामुळे प्रत्येक वर्षी कर्नाटकातील कारखान्यांशी करावी लागणारी स्पर्धा यंदा कमी झाली आहे. कर्नाटक सीमाभागातील कारखान्यांनीही यंदा दराबाबत सावधगिरी बाळगाताना अजून रक्कम दिली नाही. यामुळे जे शेतकरी कर्नाटक सीमाभागात ऊस पाठवतात त्यांनी या कारखान्यांना पसंती दिली नसल्याचे चित्र आहे.   दक्षिण महाराष्ट्रात ज्या वेळी उस हंगाम सुरू होतो. त्या वेळी कारखान्यांचे पहिले स्पर्धक बेळगाव व आसपासच्या सीमाभागातील कारखाने असतात. यामुळे आंदोलन सुरू असले तरी अनेकदा कर्नाटकातील कारखाने याचा फायदा घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात ऊसतोडणी कामगार कोल्हापूर सांगली जिल्ह्यात पाठवतात. यामुळे दोन्ही राज्यांतील कारखान्यात ऊस तोडणीसाठी अक्षरश: स्पर्धा लागते.  यंदाही सुरवातीला सीमाभागातील कारखान्यांना शेतकऱ्यांनी ऊस पाठविला. परंतु, या शेतकऱ्यांच्या पदरींही निराशाच आली आहे. महाराष्ट्रातील कारखाने दर देत नसल्याने कर्नाटकातील कारखान्यांनीही अद्याप शेतकऱ्यांना रक्कम दिली नाही. कोल्हापूर सांगलीतील कारखान्यांनी दराबाबत निर्णय घेतल्यास हे कारखाने ऊस बिलाची रक्कम देऊ शकतील पण कर्नाटकातील कारखान्यांनी ऊस बिले न दिली तर काय करायचे या विवंचनेतून शेतकऱ्यांनी कर्नाटकात ऊस पाठविण्यास फारसा उत्साह दाखविला नाही.  काही भागातील ऊस कर्नाटकात जात असला तरी हे प्रमाण खूप कमी झाल्याचे कारखाना प्रतिनिधींनी सांगितले. याचा काहीसा फायदा राज्यातील कारखान्यांना होण्याची शक्‍यता आहे कमी उत्पादकतेमुळे हंगाम लवकर संपण्याची शक्‍यता होती. त्या कारखान्यानं दहा ते पंधर दिवसांचा कालावधी जादा मिळण्याची शक्‍यता असल्याने हे कारखाने निर्धारित वेळेत हंगाम पूर्ण करु शकतील अशी शक्‍यता आहे. बिले थकलेलीच साखर दराच्या घसरणीची अडचण सगळ्याच कारखान्यांना आहे. कर्नाटकातील कारखानेही याला अपवाद नाहीत. यामुळे कर्नाटक सीमाभागातील कोणताही कारखाना धाडसाने बिले देण्यास पुढे येत नसल्याचे चित्र आहे. महाराष्ट्रातील कारखान्यांनी बिले जमा करण्यास सुरवात केल्यास त्यांच्या अंदाजावरच आम्ही बिले जमा करू असे एका सीमाभागातील कारखाना प्रतिनिधींने सांगितले. यामुळे कर्नाटकातील कारखाने तातडीने बिले देण्याची शक्‍यताही धूसर बनली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com