agriculture news in marathi Sugarcane conference for study of cancelling Air distance between sugar factories | Agrowon

हवाई अंतराची अट रद्द करण्यासाठी ऊस परिषद

टीम अॅग्रोवन
बुधवार, 6 ऑक्टोबर 2021

दोन साखर कारखान्यातील हवाई अंतराची अट सरकारने काढण्यासाठी शेतकरी संघटनेच्या वतीने ऊस परिषदेचे आयोजन केले आहे. ही परिषद माजलगाव (जि. बीड) तालुक्यातील दिंद्रुड येथे ३० ऑक्टोबरला दुपारी १२ वाजता होणार आहे.

पुणे : शेतकऱ्यांची होणारी अमानूष लूट थांबविण्यासाठी दोन साखर कारखान्यातील हवाई अंतराची अट रद्द करण्याची गरज आहे. ही अट सरकारने काढण्यासाठी शेतकरी संघटनेच्या वतीने ऊस परिषदेचे आयोजन केले आहे. ही परिषद माजलगाव (जि. बीड) तालुक्यातील दिंद्रुड येथे ३० ऑक्टोबरला दुपारी १२ वाजता होणार आहे.

परिषदेच्या अध्यक्षस्थानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील हे असतील. या वेळी शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष कालिदास आपेट, उपाध्यक्ष ॲड. अजित काळे, क्रांतिसिंह नाना पाटील ब्रिगेडचे अध्यक्ष शिवाजीराव नांदखिले, शेतकरी महिला आघाडीचे अध्यक्ष विमल आकनगिरे, शेतकरी युवा आघाडीचे अध्यक्ष रामेश्‍वर गाडे, ऊस नियंत्रण मंडळाचे सदस्य बाळासाहेब पटारे, शेतकरी संघटनेचे मराठवाडा विभागाचे प्रमुख बंडू सोळंके, विदर्भ प्रमुख धनंजय काकडे पाटील, मराठी कवी लेखक संघटनेचे अध्यक्ष दिनकर दाभाडे, बीडचे जिल्हाध्यक्ष अनुरथ काशीद, अजिमोद्दिन शेख, सुभाष मायकर, केशव फपाळ, राधाकिशन गडदे, जालिंदर देशमुख, अब्दुल फता पटेल आदी उपस्थित राहणार आहेत.

याबाबत श्री. नांदखिले म्हणाले, की २०१३ मध्ये झालेल्या ऊस आंदोलनात चंद्रकांत नलवडे आणि कुंडलिक कोकाटे यांच्या बलिदानानंतर साखर कारखानदारीतील भ्रष्टाचार आणि अकार्यक्षमता संपविण्यासाठी डॉ. सी. रंगराजन समितीने दोन साखर कारखान्यातील हवाई अंतराची अट रद्द करावी अशी महत्त्वाची शिफारस केली. दुर्दैवाने महाराष्ट्रातील साखर सम्राटांच्या सरकारने याऊलट भूमिका घेतली. दोन साखर कारखान्यातील हवाई अंतराची अट १५ किलोमीटरवरून २५ किलोमीटर केली. परिणामी, नवीन साखर कारखाने उभारणी ठप्प झाली. उसाचे दर सातत्याने कमी करण्यात साखर सम्राट यशस्वी झाले. एफआरपीचा कायदा म्हणजे शेतकऱ्यांना लुटण्याचा खुला परवाना झाला आहे. त्यामुळे कारखानादारांमध्ये स्पर्धा होण्याची गरज आहे. त्यासाठी हवाई अंतराची अट काढणे गरजेचे आहे. त्यासाठी ही ऊस परिषद आयोजित केली आहे.


इतर अॅग्रो विशेष
किमान तापमानात घट होण्याची शक्यतापुणे : राज्यात पावसाने उघडिप दिल्यानंतर किमान...
‘महाडीबीटी’च्या कामात अडथळाअकोला ः कृषी खात्याच्या विविध योजनांचा लाभ...
कृषी निविष्ठा केंद्रांचे परवाने आता...पुणे ः राज्यातील कृषी सेवा केंद्रांना परवान्याची...
आयातीमुळे कडधान्य दर दबावातपुणे ः तुरीचा हंगाम पुढील काही दिवसांत सुरू होईल...
...तर द्राक्षाचे नुकसान टळले असतेनाशिक : गेल्या तीन वर्षांपासून कसमादे भागातील...
साहित्य संमेलनाचे अनुदान शेतकरी,...नाशिक : वामनदादा कर्डक जन्मशताब्दी साहित्यनगरी...
देशी वाणाने सकस उत्पादन ः राहीबाई पोपेरेसांगली : पारंपरिक बियाणाला रासायनिक खताच्या...
शिवरायांच्या स्वराज्यापासून महात्मा...कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी...
मराठवाड्यात आंब्यावर संकटाचे ढगऔरंगाबाद : यंदा आंब्यावर संकटाचे ढग कायम आहेत....
पुन्हा उभा राहिलो अन् यशस्वीही झालो...दुग्ध व्यवसायात भरभराट येत असतानाच कुट्टी यंत्र...
पीकबदल, फळबागांसह पूरक उद्योगांची साथऔरंगाबाद जिल्ह्यातील जडगाव येथील भोसले कुटुंबाने...
डेअरी उद्योगातील खरेदीदराचा गोंधळ कायमपुणे ः राज्यातील दुधाच्या बाजारपेठेत विक्रीविषयक...
ऊस उत्पादकांचे अद्याप ४,४४५ कोटी थकीतकोल्हापूर : गेल्या हंगामात उत्तर प्रदेशातील साखर...
कोरड्या हवामानाचा अंदाज, गारठाही वाढणारपुणे : राज्यात पावसाने उघडीप दिली असून, आकाश...
लातूर जिल्ह्यात द्राक्ष बागांना पावसाचा...लातूर ः जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून...
पाकिस्तानमध्ये कापसाचे दर टिकूनपुणे ः पाकिस्तानमध्ये यंदा कापूस उत्पादनात वाढ...
‘पशुसंवर्धन’च्या योजनांसाठी अर्ज...पुणे ः जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सुशिक्षित व...
मनाच्या वेदना दूर करण्यासाठी संघर्ष ः...कुंडल, जि. सांगली : माणसाच्या अंगाला, कपड्याला...
शेती हा आर्थिक प्रश्‍न ः विलास शिंदेनाशिक : शेतीविषयी चर्चा राजकीय व सामाजिक अंगाने न...
उसाच्या पहिल्या पेमेंटकडे लागले लक्षपुणे ः राज्यातील साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांकडून...