‘स्वाभिमानी’ची ऊस परिषद  १९ ऑक्‍टोबरला जयसिंगपुरात 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेची यंदाची ऊस परिषद जयसिंगपूर येथे १९ ऑक्टोबरला होणार असल्याची घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी बुधवारी (ता. २९) पत्रकार परिषदेत केली.
   ‘स्वाभिमानी’ची ऊस परिषद  १९ ऑक्‍टोबरला जयसिंगपुरात  Sugarcane Council of ‘Swabhimani’ On 19th October in Jaysingpur
  ‘स्वाभिमानी’ची ऊस परिषद  १९ ऑक्‍टोबरला जयसिंगपुरात  Sugarcane Council of ‘Swabhimani’ On 19th October in Jaysingpur

कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेची यंदाची ऊस परिषद जयसिंगपूर येथे १९ ऑक्टोबरला होणार असल्याची घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी बुधवारी (ता. २९) पत्रकार परिषदेत केली. तत्पूर्वी ‘एफआरपी’चे तुकडे करणाऱ्यांच्या विरोधात नवरात्रीपासून (ता.७) ‘जागर एफआरपीचा, आराधना शक्तिस्थळांची’ हे आंदोलन जोतिबा डोंगरावरून सुरू होईल. राज्यातील विविध शक्तिस्थळांची आराधना करत दसऱ्याला जेजुरी येथे मेळाव्याद्वारे या आंदोलनाची सांगता होणार असल्याचे शेट्टी यांनी सांगितले.  शेट्टी म्हणाले, ‘‘१५ ऑक्टोबरपासून कारखाने सुरू करायला मंत्री समितीने परवानगी दिली आहे. राज्य सरकारने परवानगी दिली असली, तरी स्वाभिमानीच्या ऊस परिषदेशिवाय पश्‍चिम महाराष्ट्रात कारखाने सुरू होत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. या परिषदेत सध्याची साखर हंगामाची स्थिती शेतकऱ्यांची स्थिती, पूरग्रस्तांची स्थिती यावर सविस्तर चर्चा होऊन आंदोलनाची दिशा ठरविण्यात येईल. दुपारी एक वाजता जयसिंगपूर येथील विक्रमसिंह मैदानावर ही परिषद होणार आहे. कारखान्यांना यंदा चांगले दिवस आले आहेत, साखरेचे दर ३८०० रुपये क्विंटलपर्यंत गेल्याने कारखान्यांना यंदा एफआरपी देणे सहज शक्य आहे. परंतु केंद्र सरकार, राज्य सरकार व कारखानदार मिळून एफआरपी तीन टप्प्यांत देण्याचा घाट घालत आहेत, याला आम्ही विरोध करणार आहोत.’’ या वेळी जालिंदर पाटील, सावकार मादनाईक यांच्यासह ‘स्वाभिमानी’चे पदाधिकारी उपस्थित होते.    

एकरकमी एफआरपीसाठी  किसान संघाचे आज आंदोलन 

पुणे : राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकरकमी रास्त व किफायतशीर दर (एफआरपी) मिळावा, यासाठी भारतीय किसान संघ व साखर आयुक्तांमध्ये झालेल्या बैठकीत कोणताही तोडगा निघू शकला नाही. त्यामुळे साखर आयुक्तालयासमोर आज (गुरुवारी) आंदोलन करण्यावर किसान संघ ठाम आहे.  साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी किसान संघाच्या पदाधिकाऱ्यांना चर्चेसाठी बोलावले होते. एफआरपीच्या मुद्द्यावर आयुक्तांनी काही व्यवहारिक अडचणी चर्चेत मांडल्या. १४ दिवसांत एफआरपी अदा करण्याइतपत रक्कम कारखान्यांच्या हाती येत नाही. काही कारखान्यांसमोर वित्तीय समस्या आहेत. तसेच काही कारखान्यांचे नक्त मूल्य उणे (मायनस नेटवर्थ) असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.  एफआरपीची तुकडे पाडण्याची शिफारस नाकारून केंद्र शासन शेतकऱ्यांच्या हितार्थ निर्णय जाहीर करीत नाही, तोपर्यंत आंदोलनावर आम्ही ठाम राहू, असे संघाने स्पष्ट केले. चर्चेत संघाचे प्रांत महामंत्री मदन देशपांडे, कोशाध्यक्ष बबनराव केंजळे, संघटनमंत्री चंदन पाटील, पुणे जिल्हा अध्यक्ष भगवान फुलावरे यांनी भाग घेतला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com