agriculture news in marathi, sugarcane crop affected by whitegrum, beed, maharashtra | Agrowon

माजलगाव तालुक्यात उसाला ‘हुमणी’चे ग्रहण
टीम अॅग्रोवन
रविवार, 9 सप्टेंबर 2018

हुमणीमुळे उसाचे नुकसान होत असून शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. शासनाने तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी.

- गंगाभीषण थावरे, अध्यक्ष, शेतकरी संघर्ष समिती.

माजलगाव, जि. बीड  : कापसाचे पिके सलाइनवर आहे. कापूस, सोयाबीनवर किडींचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी संकटात आहे. त्यातच आता उसालाही ‘हुमणी’चे ग्रहण लागल्याने तालुक्यातील १७ हजार हेक्टरवरील उसाचे पीक धोक्यात आले आहे.

जून महिन्याच्या सुरवातीलाच पडलेल्या समाधानकारक पावसावर शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी केली; परंतु जुलै, ऑगस्ट महिन्यात मोठा खंड पडल्याने खरिपाची सर्वच पिके सलाइनवर आहेत. यावर्षीही कापसावर बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्याने त्यावर उपाययोजना करताना शेतकरी मेटाकुटीला आले आहे. रिमझिम पावसावर कशाबश्या आलेल्या सोयाबीनच्या कोवळ्या शेंगावर किडींचा प्रादुर्भाव झाला आहे.

यामुळे नगदी पीक हातचे जाण्याच्या भीतीने शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यातच आता ऊस पिकावरही हुमणी किडीचा प्रादुर्भाव झाला आहे. तालुक्यात एकूण १७ हजार हेक्टरवर उसाची लागवड करण्यात आलेली आहे. सध्या उसाचे पीक जोमात असताना तालुक्यातील अनेक गावांत हुमणीमुळे या पिकाचे मोठे नुकसान होत आहे. हुमणीचा विळखा वाढत असल्याने तालुक्यातील १७ हजार हेक्टरवरील उसाचे पीक धोक्यात आल्याने मोठे संकट उभे राहिले आहे.

उत्पादन घटणार
खरीप हंगामात २३ हजार ५९ हेक्टरवरील सोयाबीन, ३० हजार ७८३ हेक्टरवरील कापूस, १७ हजार हेक्टरवरील उसावर विविध प्रकारच्या किडींचा प्रादुर्भाव झाल्याने खरीप उत्पादनात मोठी घट होण्याचा अंदाज शेती तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

तालुक्यात हुमणीचा प्रादुर्भाव दिसून येत असून याबाबत कृषी विभाग उपाययोजनेबाबत जनजागृती करीत आहे. शेतकऱ्यांनी कृषी सहायक, तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क साधून मार्गदर्शन घ्यावे, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी पी. पी. कुंभार यांनी केले आहे.

इतर ताज्या घडामोडी
मराठवाड्यातील चार जिल्ह्यांत पाऊसऔरंगाबाद / जालना : औरंगाबाद, जालना या दोन...
सोलापुरातील कांदा उत्पादकांच्या...सोलापूर : राज्यातील कांदा उत्पादक...
कोयना धरणात ४४.७० टीएमसी उपयुक्त...सातारा  ः कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात...
पुणे जिल्ह्यातील पूर्व भागात पावसाची...पुणे  : जवळपास आठवडाभराच्या विश्रांतीनंतर...
`कुकडी`तून घोड धरणात पाणी सोडण्याची...न्हावरे, जि. पुणे   ः पावसाळा सुरू होऊन...
विद्राव्य खतांना अनुदान देण्याची मागणीकापडणे, जि. धुळे   ः विद्राव्य खतांना...
नगर जिल्ह्यात पाचशे वैयक्तिक पाणीयोजना...नगर  ः पावसाळा सुरू होऊन दीड महिना उलटला;...
सोलापुरात कृषी विभाग शेतकऱ्यांना देणार...सोलापूर : जिल्हा परिषदेच्या कृषी समितीने...
जळगाव बाजार समितीत ज्वारी, बाजरी,...जळगाव  : कृषी उत्पन्न बाजार समितीत...
नाणार रिफायनरी प्रकल्पाच्या समर्थनासाठी...रत्नागिरी  ः नाणार येथे ग्रीन रिफायनरी...
मुख्यमंत्री कोण होणार हे जनता ठरवेल ः...नाशिक  : मुख्यमंत्री कोण होणार हे जनता ठरवेल...
द्राक्ष शेतीत संघटनात्मक कार्यपद्धती...नाशिक : जागतिक द्राक्ष निर्यातीत नाशिक जिल्ह्याचा...
बुलडाणा जिल्ह्यात दुष्काळी स्थितीचा...नांदुरा, जि. बुलडाणा   ः तालुक्यात...
नांदेड, परभणी, हिंगोलीत पाऊसनांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील २८...
सांगली जिल्ह्यातील ४६८ गावांमधील...सांगली  : जिल्ह्यात ४६८ गावांमधील गावठाणांचा...
लातूर, उस्मानाबाद, जालना, बीड...लातूर : लातूर, उस्मानाबाद, जालना आणि बीड...
अकोला जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकटअकोला ः पावसाचा खंड आणि त्यातच दिवसाचे...
जलसंधारण कामासाठी जलशक्ती योजना :...वाल्हे, जि. पुणे  : राज्यात जलयुक्त...
अनधिकृत बंधारे काढण्यासाठी ‘स्वाभिमानी’...नगर  : भंडारदरा धरणापासून ते ओझर...
बचत गटांना प्रोत्साहनासाठी ‘हिरकणी...सोलापूर  : राज्याच्या औद्योगिक आणि आर्थिक...