agriculture news in marathi, sugarcane crop become in trouble due to water shortage, sindhudurga, maharashtra | Agrowon

वैभववाडी तालुक्यात नदी पात्र कोरडे; ऊस शेती संकटात
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 16 मे 2019

पंधरा वर्षांत अशा पद्धतीची पाणीटंचाई निर्माण झाली नव्हती. अरुणा नदी कोरडी पडली आहे. त्यामुळे या गावातील विहिरी, विंधन विहिरींची पातळी देखील खालावली आहे. पाणी नसल्यामुळे ऊसशेती वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
- महेश संसारे, मांगवली, जि. सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग  ः वैभववाडी तालुक्यातील शुक, अरुणा आणि गडनदीचे पात्र कोरडे पडल्यामुळे या नदीच्या पाण्यावर अवलंबून असलेली शेकडो एकर ऊस शेती संकटात सापडली आहे. गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून काही भागातील उसाला पाणीच न दिल्यामुळे तो करपण्यास सुरवात झाली आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

वैभववाडी तालुक्याच्या उत्तरेकडील गावांसाठी लाभदायी ठरणाऱ्या शुक, अरुणा आणि कुसूर येथील गडनदी या तीन नद्या कोरड्या पडल्या आहेत. या नदीपात्रातील मोठया डोहांनी देखील तळ गाठला आहे. त्यामुळे भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. शुक नदीच्या पाण्यावर सांगूळवाडी, वैभववाडी, एडगाव, सोनाळी, कुसूर, उंबर्डे, नापणे, तिथवली ही गावे अवलंबून आहेत. या सर्व गावातील ऊसशेती संकटात होती. परंतु काही दिवसांपूर्वी खांबलवाडी धरणाचे पाणी शुक नदीला सोडल्यामुळे उंबर्डे कातकरवाडी, नापणे या गावांतील शेतीला संजीवनी मिळाली. परंतु उर्वरित गावांतील शेती वाचविण्यासाठी दुसरा कोणताही पर्याय तुर्तास नाही. गडनदीचे पाणी पूर्णपणे आटले आहे. त्यामुळे या गावांतील ऊसशेती धोक्यात आली आहे.

अरुणा नदीचे पात्र पंधरा दिवसांपूर्वीच कोरडे पडले आहे. या नदीच्या पाण्याच्या भरवशांवर ऊसशेती केलेले शेतकरी अडचणीत आले आहेत. पंधरा दिवसांपासून ऊसशेतीला पाणीच न दिल्यामुळे ऊस करपण्यास सुरवात झाली आहे. नदीसोबत विहिरींनी देखील तळ गाठला आहे. विंधन विहिरींना देखील पुरेसे पाणी नसल्यामुळे भीषण पाणीटंचाईची शक्यता निर्माण झाली आहे.
 

इतर बातम्या
नगर जिल्ह्यातील ४३ हेक्टर जमीन गेली...नगर  ः जिल्ह्यात पंधरा दिवसांपूर्वी गोदावरी...
नत्राच्या दुहेरी समस्यांवर मात...जागतिक पातळीवर नत्राचे प्रदूषण आणि शेतीसाठी...
डाळिंबाच्या मार्केटिंग, प्रक्रिया...सोलापूर  : ‘‘जिल्ह्यात उत्पादन होणारे डाळिंब...
जळगाव जिल्हा सहकारी दूध संघाला तीन...जळगाव  ः जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक...
औरंगाबाद जिल्ह्यात पावसाअभावी टोमॅटोचे...औरंगाबाद :  जिल्ह्यातील टोमॅटोचे आगार...
अकोला जिल्ह्यातील पाच पशुवैद्यक दवाखाने...अकोला  ः जिल्हा परिषदेअंतर्गत चालविल्या...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २३ धरणे भरलीसिंधुदुर्ग : मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील २३...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील अनेक...
दसरा, दिवाळीसाठी चांदवड तालुक्यात...नाशिक  : चांदवड तालुक्यातील शेतकरी दसरा,...
नगर जिल्ह्यातील वाहून गेलेल्या...नगर : पुराच्या पाण्याने वाहून गेलेल्या जमिनीचे...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे...सिंधुदुर्ग   ः अतिवृष्टीचा भाजीपाला...
महापुराच्या स्थितीतही ‘त्यांनी’ तीन...नवेखेड, जि. सांगली  : मसुचिवाडी (ता....
वसंतराव नाईक यांनी आधुनिक तंत्रज्ञान...पुसद, जि. यवतमाळ   ः देशातील...
सरकारला खरीप, रब्बीतील फरक कळत नाही :...पैठण, जि. औरंगाबाद  : राज्यातील शेतकऱ्यांची...
पूरग्रस्त भागातील घरांच्या दुरुस्तीसाठी...मुंबई  : पूरग्रस्त ग्रामीण भागातील वाहून...
पीक नुकसानभरपाई नको; संपूर्ण कर्जमाफीच...कऱ्हाड, जि. सातारा   ः महापुराने हुती...
नगर जिल्ह्यात ४०५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर  ः जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी पावसाने...
पूरग्रस्तांना एक हेक्टरसाठी मिळणार...मुंबई : राज्यात विविध भागांत आलेल्या...
राज्याचा पाणीसाठा ६१ टक्क्यांवर;...पुणे : जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीला...
‘दावणीची दौलत’ चाऱ्याअभावी खचली; दक्षिण...कोल्हापूर/ सांगली : बारमाही पाण्याने भरलेल्या...