इगतपुरी, नाशिक तालुक्यात वाऱ्यामुळे उसाचे पीक भुईसपाट

नाशिक : जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने गुरुवारी (ता.६) इगतपुरी व नाशिक तालुक्यातील ऊस लागवडी भुईसपाट झाल्या आहेत.
Sugarcane crop flattened due to wind in Igatpuri, Nashik taluka
Sugarcane crop flattened due to wind in Igatpuri, Nashik taluka

नाशिक : जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने गुरुवारी (ता.६) इगतपुरी व नाशिक तालुक्यातील ऊस लागवडी भुईसपाट झाल्या आहेत. त्यामुळे एकीकडे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नुकसान झाले असताना,  शेतकऱ्यांना अस्मानी फटका सोसावा लागतो.

जिल्ह्याच्या सिन्नर तालुक्यातील पश्चिम, इगतपुरीच्या पूर्व, तर नाशिकच्या दक्षिण भागात भाजीपाला पिकासह ऊस लागवडी मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यामुळे अगोदर भाजीपाला काढणीला असताना कोरोनाच्या तडाख्यात दरात व मागणीत घसरण झाली. त्यामुळे मोठे नुकसान शेतकऱ्यांना सोसावे लागले आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या आशा ऊस पिकावर होत्या. मात्र आता हे पीक भुईसपाट झाल्याने अडचणी वाढल्या आहेत.

सप्टेंबर ते डिसेंबर २०१९ दरम्यान सुरू लागवडी झालेल्या आहेत. मात्र, गुरुवारी सायंकाळनंतर पाऊस सुरू झाल्यानंतर मध्यरात्रीपर्यंत वाऱ्याचा वेग अधिक होता. त्यामुळे उसाचे पीक भुईसपाट झाले. अनेक शेतकऱ्यांनी शुक्रवारी (ता.७)दुसऱ्या दिवशी फेरफटका मारला. त्यावेळेस लागवडीखालील क्षेत्र मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे आगामी काळात उसाची गुणवत्ता, वजन यावर परिणाम होईलच. मात्र नुकसान वाढत जाईल, असे त्यांचे म्हणणे आहे. पिंपळगाव डुकरा, पिंपळगाव घाडगा, साकुर, शेणीत, निनाव्ही, भरविहीर, लहवीत, राहुरी येथे नुकसान झाले.

पंचनामे करून मदत द्या

अगोदर कोरोनामुळे भाजीपाला विकता आला नाही. त्यानंतर पावसाने लागवडी बाधित झाल्या. तर, आता जे हक्काचे पीक होते. ते भुईसपाट झाले आहे. त्यामुळे वजनात घट, घुस, उंदीर यांचा प्रादुर्भाव वाढेल. त्यामुळे सरकारने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.

अगोदरच शेतकऱ्यांना कोरोनाचा मोठा फटका सहन करावा लागला आहे. त्यातच आता अस्मानी संकट शेतकऱ्यांवर आल्याने आता नुकसान दुहेरी आहे.   - बाळासाहेब कुकडे, शेतकरी, साकुर, ता. इगतपुरी

चालू वर्षी ऊस पीक जोमात होते. त्यात पावसासह आलेल्या वादळी वाऱ्याने ऊस जमीनदोस्त झाला आहे. त्यामुळे आता वजनात घट होईल.  - गोकुळ जाधव, शेतकरी, शेणीत, ता. इगतपुरी

यंदाची ऊस लागवडीची स्थिती (हेक्टर)

तालुका  आडसाली  पूर्वहंगामी सुरू  खोडवा   एकूण
नाशिक  १३६.४०  ८४.५ १५०.५०   ३७५.५० ७४६.४५
इगतपुरी  ००   ००  २२२   १०६  ३२८

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com