मराठवाड्यासह खानदेशात उसाचे गाळप ७६ लाख मेट्रिक टनावर

मराठवाड्यासह खानदेशात उसाचे गाळप ७६ लाख मेट्रिक टनावर
मराठवाड्यासह खानदेशात उसाचे गाळप ७६ लाख मेट्रिक टनावर

औरंगाबाद : मराठवाड्यासह खानदेशातील पाच जिल्ह्यांतील २३ साखर कारखान्यांनी ४ मार्चपर्यंत ७६ लाख २ हजार ५०८ मेट्रीक टन उसाचे गाळप केले. या गाळपातून ७८ लाख ९३ हजार २६७ क्‍विंटल साखरेचे उत्पादन झाल्याची माहिती साखर विभागाच्या सूत्रांनी दिली. 

औरंगाबाद जिल्ह्यातील पाच साखर कारखान्यांनी यंदा ऊस गाळपात सहभाग नोंदविला आहे. या पाचही कारखान्यांनी ४ मार्चपर्यंत १४ लाख २५ हजार ९६५ मेट्रीक टन उसाचे गाळप करून १५ लाख १६ हजार ७५५ क्‍विंटल साखरेचे उत्पादन घेतले. या कारखान्यांचा सरासरी साखर उतारा १०.६४ टक्‍के राहिला. जालना जिल्ह्यातील पाच कारखान्यांनी १७ लाख ८५ हजार ८०९ मेट्रिक टन उसाचे गाळप करून सरासरी १०.९१ टक्‍के साखर उताऱ्यानुसार १९ लाख ४८ हजार ११० क्‍विंटल साखरेचे उत्पादन घेतले.

पाचपैकी रामेश्‍वर साखर कारखान्याने आपला गाळप हंगाम गुंडाळला आहे. ६ नोव्हेंबर २०१८ ला या कारखान्याने ऊस गाळपास सुरवात केली होती. कारखान्याने केवळ २ लाख १८ हजार २७२ मेट्रिक टन उसाचे गाळप करून सरासरी ९.३३ टक्‍के साखर उताऱ्याने २ लाख ३ हजार ६५० क्‍विटंल साखरेचे उत्पादन घेतले. 

बीड जिल्ह्यातील सात साखर कारखान्यांनी २९ लाख ९७ हजार ७५७.९७ मेट्रिक टन उसाचे गाळप केले. सरासरी १०.०६ टक्‍के साखर उताऱ्याने ३० लाख १५ हजार ६० क्‍विंटल साखरेचे उत्पादन केले. 

नंदुरबार जिल्ह्यातील तीन साखर कारखान्यांनी ९ लाख ७३ हजार ९८५ मेट्रिक टन उसाचे गाळप केले. सरासरी १०.३१ टक्‍के साखर उतारा राखून १० लाख ४ हजार २६७ क्‍विंटल साखरेचे उत्पादन घेतले. जळगाव जिल्ह्यातील तीन साखर कारखान्यांनी सरासरी ९.७६ टक्‍के साखर उतारा कायम राखला. ४ लाख १८ हजार ९९० मेट्रिक टन उसाचे गाळप करून ४ लाख ९ हजार ७५ क्‍विंटल साखरेचे उत्पादन घेतले. या सर्व कारखान्यांपैकी जवळपास १२ साखर कारखान्यांचा ४ मार्चअखेरपर्यंत गाळप केलेल्या उसाचा साखर उतारा सरासरी १० टक्‍क्‍यांपुढे राहिल्याची माहिती साखर विभागाच्या सूत्रांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com