खानदेशात ऊस गाळप पूर्ण

खानदेशात अपवाद वगळता ऊस गाळप कार्यवाही पूर्ण झाली आहे. गाळपात पुरूषोत्तमनगर (ता. शहादा) येथील सातपुडा सहकारी साखर कारखान्याने आघाडी घेतली असून, या कारखान्याने सुमारे पाच लाख टन ऊस गाळप केले आहे.
खानदेशात ऊस गाळप पूर्ण
खानदेशात ऊस गाळप पूर्ण

जळगाव ः  खानदेशात अपवाद वगळता ऊस गाळप कार्यवाही पूर्ण झाली आहे. गाळपात पुरूषोत्तमनगर (ता. शहादा) येथील सातपुडा सहकारी साखर कारखान्याने आघाडी घेतली असून, या कारखान्याने सुमारे पाच लाख टन ऊस गाळप केले आहे.

यापाठोपाठ समशेरपूर (ता. नंदुरबार) येथील आयान शुगर या कारखान्याने उसाचे गाळप केले आहे. तर जळगाव जिल्ह्यातील मुक्ताई (ता. मुक्ताईनगर) येथील कारखान्यानेदेखील गाळपाची कार्यवाही वेगात केली. नंदुरबार जिल्ह्यात सर्वाधिक चार कारखाने सुरू होते. यात आयान कारखाना उशिरा सुरू झाला. पण या कारखान्याने गाळप क्षमता वाढवून ती प्रतिदिन आठ हजार टन एवढी केली. यामुळे या कारखान्याने गाळप वेगात केले. खानदेशात सुमारे २२ लाख टन उसाचे गाळप झाले आहे.

डोकारे (ता. नवापूर, जि. नंदुरबार) येथील आदिवासी सहकारी साखर कारखान्यानेदेखील बऱ्यापैकी गाळप केले आहे. खानदेशात यंदा फक्त दोन सहकारी साखर कारखाने सुरू होते. जळगाव जिल्ह्यातील चहार्डी (ता. चोपडा) येथील चोपडा सहकारी साखर कारखाना व न्हावी (ता. यावल) येथील मधुकर सहकारी साखर कारखाना बंद होता. चोपडा कारखाना सलग दोन वर्षे बंद राहिला. तर मधुकर कारखाना यंदाच बंद राहिला. परिणामी या भागातील किंवा या कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात नाशिक, नगर, औरंगाबाद जिल्ह्यातील कारखान्यांनी उसाची खरेदी केली. जळगाव जिल्ह्यातील सर्वच कारखाने सुरू राहीले असते तर गाळप आणखी वाढले असते, असे जाणकारांचे मत आहे.

चोपडा तालुक्यासह चाळीसगाव तालुक्यात उसाचे क्षेत्र अधिक होते. या भागात नाशिक, औरंगाबाद व नगर जिल्ह्यातील कारखान्यांनी ऊस तोडणी केली. नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा कारखान्यान्याकडे मध्य प्रदेशातूनही उसाची आवक झाली. या कारखान्याने मध्य प्रदेशातही ऊस तोडणी वेगात केली.

ग्रामपंचायत निवडणुकीचा व्यत्यय जानेवारी, फेब्रुवारीत पावसामुळे धुळ्यातील साक्री, नंदुरबारमधील तळोदा भागात ऊसतोडणी बंद करावी लागली होती. तसेच यानंतर ग्रामपंचायतीच्या निवडणुकादेखील झाल्या. यामुळे ऊसतोडणीची कार्यवाही संथ गतीने झाली. अन्यथा तोडणी लवकर आटोपली असती, असेही सांगण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com