agriculture news in Marathi sugarcane crushing may be stopped within month in Nashik division Maharashtra | Agrowon

महिनाभरात पडणार नाशिक विभागातील साखर कारखान्यांचा पट्टा

टीम अॅग्रोवन
शनिवार, 18 जानेवारी 2020

नगर, नाशिक जिल्ह्यांमध्ये १५ कारखाने सुरू आहेत. यंदा बहुतांश कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात उसाची टंचाई आहे. आतापर्यंत २७ लाख टन साखरेचे गाळप झालेय, अजून साधारण पंचवीस लाख टन गाळप होईल. 
- मच्छिंद्र कुसमुडे, कृषी अधिकारी, प्रादेशिक सहसंचालक (साखर)
 

नगर ः नगर, नाशिक जिल्ह्यामध्ये यंदा ३२ पैकी केवळ पंधरा कारखाने सुरू आहेत. या कारखान्यांचाही अजून महिनाभरात पट्टा पडणार असल्याचा अंदाज प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयातून व्यक्त करण्यात आला. आतापर्यंत सुमारे २७ लाख टन उसाचे गाळप झाले आहे. अजून साधारण पंचवीस लाख टन उसाचे गाळप होण्याची शक्यता आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा चाळीस टक्केच गाळप होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

नगरसह राज्याच्या अनेक भागांत मुख्य आर्थिक आधार म्हणून साखर कारखानदारीकडे पाहिले जाते. एकेकाळी जिल्ह्यात साखरेचा गाळप हंगाम सहा ते सात महिने चालायचा. मात्र, दुष्काळामुळे उसाचे क्षेत्र पन्नास हजार हेक्‍टरने घटले आहे. नाशिक विभागामध्ये यंदा आतापर्यंत १५ साखर कारखान्यांनी सुमारे २७ लाख ३० हजार ८०९ टन गाळप केले असून २५ लाख ६७ हजार ५५० क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे.

नगर, नाशिक जिल्ह्यांमध्ये ऊस टंचाईचा मोठा फटका बसला असून विभागातील तब्बल सतरा कारखाने बंद आहेत. गाळप आणि साखर उत्पादनात खासगी कारखान्यांचाच बोलबाला आहे. यंदा नगर जिल्ह्यात तेवीसपैकी केवळ १३ साखर कारखान्यांना गाळप परवाने मिळाले आहेत.

केदारेश्‍वर कारखाना उसाअभावी मध्येच बंद करावा लागला. सुरू असलेल्या कारखान्यांपैकी ९ कारखान्यांचा हंगाम १५ फेबुवारीपर्यंत बंद होईल तर अगस्ती, विखे पाटील, संगमनेर व अशोक हे कारखाने साधारण मार्चच्या सुरवातीपर्यंत चालण्याचा अंदाज आहे.

उसाचा गाळप हंगाम साधारण पाच ते सहा महिने चालत असतो. यंदा केवळ आडीच महिने चालण्याची ही पहिलीच वेळ आहे. गेल्या वर्षी १ कोटी ३४ लाख टन गाळप झाले होते. यंदा ५५ लाख टनाच्या जवळपास म्हणजे गतवर्षीच्या तुलनेत चाळीस टक्के गाळप होईल, असा अंदाज आहे. 

‘अंबालिका’चा वरचष्मा
राजकीय वर्तुळात नेहमीच चर्चेत राहिलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा कर्जत तालुक्‍यातील अंबालिका साखर कारखाना साखरेच्या उत्पादनात अव्वल राहिला. दुसऱ्या स्थानावर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचा भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना आहे. मागील वर्षीही ‘अंबालिका’ने आघाडी घेतली होती.

 


इतर अॅग्रो विशेष
जळगाव ः कापसाच्या खेडा खरेदीला कमी...जळगाव ः कापसाची खेडा खरेदी मागील आठवड्यात...
इंडोनेशियात कच्च्या साखरेची जादा...कोल्हापूर : भारताच्या दृष्टीने साखर निर्यातीसाठी...
चांगदेव यात्रेला प्रारंभ; दिंड्या दाखलचांगदेव, जि. जळगाव ः सिद्धेश्वर योगिराज चांगदेव...
सर्व्हर डाउनच्या गोंधळामुळे द्राक्ष...नाशिक : केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क...
विदर्भात पावसाला पोषक हवामान पुणे: राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात वाढ...
चारशे अधिकाऱ्यांच्या कृषी विभागात...पुणे ः कृषी विभागात गेल्या दोन ते तीन दिवसांत ३९९...
परराज्यापर्यंत विस्तारला ऊसरोपे...मुखई (जि. पुणे) येथील अभिजित धुमाळ या तरुण...
केळी ‘रायपनिंग चेंबर’चा यशस्वी केला...कोल्हापूर जिल्ह्यातील ऊसबहुल क्षेत्रात केळी...
शेतकऱ्यांवर अन्यायकारक करार नकोचअमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आपल्या...
ऐच्छिक पीकविम्याचे इंगितकें द्र सरकारने पीकविमा योजना शेतकऱ्यांसाठी...
नैसर्गिक नव्हे, सेंद्रिय शेतीची धरा काससुभाष पाळेकरांच्या पद्धतीनुसार बाह्य निविष्ठा...
जलयुक्त फेल, पुढे काय?उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती...
ऊस उत्पादकता २५० टनांपर्यंत न्यावीच...पुणे : देशातील ऊस उत्पादकता एकरी शंभर टन...
कर्जमाफीसाठी आकस्मिकता निधीतून दहा हजार...मुंबई : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी राज्य सरकारने...
पीकविमा हप्त्यापोटी पाचशे कोटी वितरणास...मुंबई ः पंतप्रधान पीकविमा योजना खरीप हंगाम २०१९...
मोसंबी क्लटरमध्ये शाश्‍वत उत्पादन,...औरंगाबाद : मोसंबी उत्पादकांसाठी उत्पन्नाची...
डाळिंब उत्पादनात ३० टक्के घटसांगली ः सुरुवातीला दुष्काळी परिस्थिती, त्यानंतर...
कोरोनाच्या अफवेमुळे पोल्ट्रीचे १५०...पुणे : कुक्कुट पक्षी व कुक्कुट उत्पादने यांचा...
प्रयोगशील शेतीच्या आधारे चिंचवलीने...पारंपरिक भातशेतीत बदल करून ऊसशेती व त्यास...
कहर ‘कोरोना’चाकोरोना विषाणूच्या वाढत्या उद्रेकाने जगभर दहशतीचे...