Agriculture news in Marathi Sugarcane crushing season from 15th October | Page 3 ||| Agrowon

ऊस गाळप हंगाम १५ ऑक्टोबरपासून

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 14 सप्टेंबर 2021

राज्यात २०२१-२२ साठी उसाचा गाळप हंगाम १५ ऑक्टोबर २०२१ पासून सुरू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीत सोमवारी (ता. १३) घेण्यात आला.

मुंबई : राज्यात २०२१-२२ साठी उसाचा गाळप हंगाम १५ ऑक्टोबर २०२१ पासून सुरू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीत सोमवारी (ता. १३) घेण्यात आला. जे कारखाने १५ ऑक्टोबर २०२१ पूर्वी उसाचे गाळप सुरू करतील त्यांच्या कार्यकारी संचालकांवर गुन्हे नोंदविण्यात यावेत, असा निर्णय ही या बैठकीत सर्वसहमतीने घेण्यात आला.

सह्याद्री अतिथिगृहात झालेल्या बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, कृषिमंत्री दादा भुसे, राज्यमंत्री विश्वजित कदम, साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावंकर, मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्यासह मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, सहकार व पणन विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार, वित्त विभागाचे प्रधान सचिव ओ. पी. गुप्ता,  कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले, साखर आयुक्त शेखर गायकवाड, महाराष्ट्र बँकेचे संचालक विद्याधर अनासकर यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी, साखर संघाचे पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.

अभ्यासगटाच्या अहवालावर 
तत्काळ निर्णय घ्यावेत

केंद्रशासनाने दिलेल्या निर्देशानुसार एफआरपी निश्चित करण्यासाठी साखर आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यासगट स्थापन करण्यात आला होता. या अभ्यासगटाने आपला अहवाल आज शासनास सादर केला असून त्यावर सहकार विभागाने हा अहवाल ऊस नियंत्रण मंडळाकडे सादर करून लवकरात लवकर निर्णय घ्यावेत, अशा सूचनाही यावेळी देण्यात आल्या.

शेतकऱ्यांना एफआरपीची 
रक्कम तातडीने द्यावी

साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांची एफआरपीची रक्कम तातडीने द्यावी, असेही आजच्या बैठकीत निश्चित करण्यात आले. जे कारखाने शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम वेळेत  आणि पूर्णत्वाने देत नाहीत अशा कारखान्यांकडे आगामी हंगामात गाळपासाठी ऊस द्यायचा किंवा नाही हे शेतकऱ्यांनी ठरवावे, यासंबंधीच्या मार्गदर्शक सूचनाही निर्गमित केल्या जाव्यात, असेही बैठकीत निश्चित करण्यात आले. राज्यातील १४६ साखर कारखान्यांनी एफएआरपीची १०० टक्के रक्कम शेतकऱ्यांना दिली आहे, अशी माहिती बैठकीत देण्यात आल्यानंतर  ज्या कारखान्यांनी शेतकऱ्यांची एफआरपी रक्कम शेतकऱ्यांना पूर्णत्वाने दिली ते कारखाने सोडून इतर कारखान्यांना गाळप परवाने देऊ नयेत असाही निर्णय घेण्यात आला.  बँकांकडून मालतारण कर्जाची मिळणारी रक्कम कारखान्याने थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात यावी, असे निर्देशही बैठकीत देण्यात आले.

१० टक्के उताऱ्यासाठी 
२९०० रुपये प्रतिटन दर

गाळप हंगाम २०२१-२२ साठी केंद्र शासनाने निश्चित केलेल्या एफआरपी दराप्रमाणे १० टक्के उताऱ्यासाठी २९०० रुपये प्रतिटन दर निश्चित करण्यात आला आहे. २०२१-२२ मध्ये राज्यात ऊस लागवडीचे क्षेत्र  १२.३२ लाख हेक्टर असून ९७ टन प्रति हेक्टर उत्पादन अपेक्षित आहे. १०९६ लाख मे.टन उसाचे गाळप होण्याचा अंदाज असून ११२ लाख टन साखर उत्पादित होण्याची शक्यता आहे, अशी माहिती आजच्या बैठकीत देण्यात आली. या हंगामात  अंदाजे १९३ साखर  कारखाने सुरू राहतील.

इथेनॉल निर्मिती
राज्यात सहकारी आणि खासगी मिळून ११२  कारखान्यांमध्ये इथेनॉल प्रकल्प राबविला जातो. त्यातून २०६ कोटी लिटर इथेनॉलची निर्मिती होते.  केंद्र शासनाने शुगर, शुगर सिरप आणि बी-हेवी  मोलॅसिस पासून इथेनॉल निर्मितीला चालना देण्याचे धोरण स्वीकारल्याने २०२२ पर्यंत १० टक्के इथेनॉल मिश्रणाचा लक्षांक पूर्णत्वाला जाईल, असेही बैठकीत सांगण्यात आले.
 


इतर अॅग्रो विशेष
मॉन्सूनोत्तर पावसाचा पिकांना दणकापुणे : गेल्या दोन दिवसांपासून पावसासाठी पोषक...
देशातील सोयाबीनची केवळ २७ टक्के काढणीपुणे : खरीप हंगाम २०२१-२२मध्ये सोयाबीनची लागवड...
संघर्षातून फुलले शेतीमध्ये 'नवजीवन'अवघी दोन एकर जिरायती शेती. खाण्यापुरती बाजरी...
विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
विदर्भ, मराठवाड्यात उद्यापासून पावसाची...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) संपूर्ण...
सूक्ष्म सिंचन अनुदानात वाढपुणे ः केंद्र सरकारने पंतप्रधान कृषी सिंचन...
मॉन्सूनची महाराष्ट्रातून माघारपुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
भाजपच्या जातीयवादाला धर्मनिरपेक्षवादाने...मुंबई ः या देशात भाजप जो टोकाचा जातीयवाद करतो आहे...
‘कथनी आणि करणी’त फरक पुन्हा उघडपुणे : आधीच अतिवृष्टीच्या तडाख्यात सापडलेल्या...
बाजाराचा अंदाज घेऊनच सोयाबीन विक्री करापुणे : सरकारने खाद्यतेल आयात शुल्कात कपात...
लातुरात सोयाबीनच्या भावात तीनशेची घसरणलातूर ः खाद्यतेल आयात शुल्क कपातीच्या निर्णयानंतर...
आमदारांच्या स्थानिक विकास निधीत एक...मुंबई : आमदारांचा स्थानिक विकास निधी दोन...
झेंडूसह अन्य फुलांमध्ये शिरसोलीची ओळखजळगाव जिल्ह्यातील शिरसोली गाव फुलशेतीसाठी...
मॉन्सूनचा महाराष्ट्रातून निरोपपुणे : राजस्थानातून परतीच्या प्रवासाला उशिरा...
देशी केळी अन रताळ्यांना नवरात्रीसाठी...कोल्हापूर जिल्ह्यात नवरात्रीच्या निमित्ताने...
रब्बीसाठी बियाणे पुरवठादार म्हणून...अकोला ः येत्या रब्बी हंगामात राष्ट्रीय अन्न...
खाद्यतेल आयातशुल्कात मोठी कपातपुणे : काही केल्या खाद्यतेलाचे दर कमी होत नाही...
अतिवृष्टिग्रस्तांसाठी १० हजार कोटीमुंबई ः राज्यातील अतिवृष्टी व पुरामुळे...
‘सीसीआय’ करणार खुल्या बाजारातून कापूस...नागपूर ः आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजीचा परिणामी...
प्रयत्नशील व प्रयोगशीलतेचा पडूळ...लाडसावंगी (जि.. औरंगाबाद) येथील प्रयोगशील, जिद्दी...