agriculture news in marathi, sugarcane crushing season may start late, solapur, maharashtra | Agrowon

गाळप हंगाम महिनाभर लांबला
तात्या लांडगे
गुरुवार, 10 ऑक्टोबर 2019

सध्या आचारसंहिता असल्याने आणि मंत्री समितीची बैठक न झाल्याने हंगामाचा निर्णय झालेला नाही. मात्र, १५ नोव्हेंबरपासून हंगाम सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले असून, नव्या सरकारच्या मंत्री समितीच्या बैठकीत अंतिम निर्णय होईल.
- दत्तात्रेय गायकवाड, सहसंचालक, विकास, साखर आयुक्‍तालय, पुणे

सोलापूर : दुष्काळ, चाऱ्याकरिताचा वापर, ऊस पट्ट्यातील महापुराने यंदाचा ऊस हंगाम एक महिना उशिरा सुरू होण्याची शक्यता आहे. १५ नोव्हेंबरला हंगाम सुरू होण्याची आणि नव्या सरकारचे मुख्यमंत्रीच याबाबत घोषणा करण्याची माहिती साखर आयुक्तालयातील सूत्रांनी दिली आहे. 

राज्यात गेल्याच्या वर्षीच्या दुष्काळामुळे पाण्याअभावी खुंटलेली उसाची वाढ, चारा छावण्यांसाठी वापरलेला ऊस आणि या वर्षीचा सांगली, सोलापूर, कोल्हापुरातील पुरामुळे तब्बल अडीच लाख हेक्‍टरवरील उसाचे नुकसान झाले. यामुळे यंदाचा हंगाम ऑक्‍टोबरऐवजी १५ नोव्हेंबरला सुरू करण्याचा निर्णय झाला असून, मंत्री समितीकडून औपचारिक घोषणा बाकी असल्याचे साखर आयुक्‍तालयाच्या सूत्रांनी सांगितले.राज्यात मागील साखर हंगामात १९८ कारखान्यांनी सुमारे १२ लाख हेक्‍टरवरील उसाचे गाळप घेतले. यंदा मात्र दुष्काळ व पुराचा सर्वाधिक फटका उसाला बसला.

या वर्षी गाळपासाठी १६४ कारखान्यांनी ऑनलाइन अर्ज केले असून, त्यांना अद्याप परवाना दिलेला नाही. दरम्यान, सीमावर्ती भागातील कारखान्यांनी अन्य राज्यातील उसाची चाचपणी सुरू केल्याचे चित्र आहे. तर विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीमुळे हंगाम सुरू करण्याबाबत मंत्री समितीची बैठकही झाली नाही. राज्यातील काही कारखान्यांनी गाळप हंगाम लांबणीवर टाकावा, अशी मागणीही साखर आयुक्‍तांकडे केली होती. त्यामुळे हंगाम १५ नोव्हेंबरपासून सुरू केला जाईल, असे आयुक्‍तालयाकडून सांगण्यात आले.
 
राज्याची सद्यःस्थिती

  • परवान्यासाठी कारखान्यांचे अर्ज  -  १६४
  • उसाचे शिल्लक क्षेत्र  - ८.२२ लाख हेक्‍टर
  • साखर उत्पादन  - ५९ लाख मे. टन
  • गाळप होणारा अंदाजित ऊस  -  ५.१८ लाख टन

इतर ताज्या घडामोडी
लातूर, उस्मानाबाद, नांदेड, हिंगोली,...उस्मानाबाद : मराठवाड्यातील लातूर, उस्मानाबाद...
धुळे : कांदा दरप्रश्‍नी शेतकरी संघटनेचे...धुळे  ः कांद्याचे दर बऱ्यापैकी वाढल्याने...
शिराळा तालुक्यात भाताचे उत्पादन २०...सांगली : शिराळा पश्‍चिम भाग हा भातपिकाचे माहेरघर...
शेतकऱ्यांना दरवर्षी दहा हजार देणारच :...इस्लामपूर, जि. सांगली  : ‘‘ गेल्या पाच...
उत्पादन खर्चावर आधारित दर हवेत :...भारत हा शेतीप्रधान देश असे आपण म्हणत असतो. मात्र...
शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणारच : उध्दव...सोलापूर : ‘‘शिवसेना बोलते ते करते, आम्ही...
अकोला जिल्ह्यात शासनाच्या हमीभाव...अकोला ः शेतमालाला किमान आधारभूत किंमत मिळवून...
पीकविम्याबाबत असुरक्षिततेचीच भावना...केंद्र सरकारने मोठा गाजा-वाजा करीत जाहीर केलेल्या...
`चासकमान`मधील आवर्तन तब्बल ८९...चास, जि. पुणे  ः चासकमान (ता. खेड) धरणातून...
पाण्याची कार्यक्षमता वाढविण्यावर भर...आपला देश सध्या आर्थिक संकटातून जात आहे. हे संकट...
परभणीत सरासरीपेक्षा जास्त क्षेत्रावर...परभणी : जिल्ह्यातील यंदाच्या रब्बी हंगामातील...
पाच जिल्ह्यात पीकविमा योजनेत ४५ लाख ९०...लातूर : खरीप हंगाम २०१९ मध्ये लातूर,...
नांदेड : पावसात भिजल्यामुळे पिकांचे...नांदेड : गेल्या आठवड्यात नांदेड, परभणी, हिंगोली...
जळगावात कोबी १५०० ते २८०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (...
नारळ बागेत आंतरपिके फायदेशीरसुरवातीच्या काळात नारळ बागेत भाजीपाला, केळी, अननस...
मेहकर तालुक्यात कृषी कर्मचाऱ्यांनी...अकोला ः मेहकर तालुक्यात यावर्षी समाधानकारक...
खामगावात टेक्सटाइल पार्क होणारच ः...बुलडाणा  ः तरुणांना रोजगार उपलब्ध करून...
खारपाण पट्ट्यात रब्बीत हजार हेक्टरवर...अकोला  ः जिल्ह्यात असलेल्या खारपाण पट्ट्यात...
जळगाव जिल्ह्यात हमीभाव खरेदी केंद्रांत...जळगाव  ः जिल्ह्यात शासकीय हमीभाव कडधान्य व...
वाघाच्या दहशतीखालील गावे टाकणार...वर्धा  ः कारंजा घाडगे तालुक्‍यातील अनेक...