भीमाशंकर कारखाना डिस्टलरी प्रकल्प उभारणार ः दिलीप वळसे पाटील

भीमाशंकर कारखान्यात गव्हाणपूजन करताना मान्यवर
भीमाशंकर कारखान्यात गव्हाणपूजन करताना मान्यवर

पारगाव, जि. पुणे  : भीमाशंकर सहकारी साखर कारखाना इथेनॉल निर्मितीसाठी डिस्टलरी प्रकल्प उभारणार असून, दैनंदिन गाळप क्षमता साडेचार हजार मेट्रिक टनांवरून सहा हजार मेट्रिक टनांवर नेण्यात येणार आहे, अशी माहिती राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष व भीमाशंकर कारखान्याचे संस्थापक-अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी दिली.  

दत्तात्रेयनगर (पारगाव) येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या २० व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन संचालक अशोक घुले व त्यांच्या पत्नी अंजली घुले यांच्या हस्ते व गव्हाणपूजन संचालक अण्णासाहेब पडवळ व त्यांच्या पत्नी शकुंतला पडवळ यांच्या हस्ते झाले. कारखान्याचे उपाध्यक्ष बाळासाहेब बेंडे, माजी आमदार सूर्यकांत पलांडे, भीमाशंकरचे माजी अध्यक्ष व संचालक देवदत्त निकम, प्रदीप वळसे पाटील, मानसिंग पाचुंदकर, सदाशिव पवार, केशर पवार, प्रकाश पवार, उषा कानडे, विश्वास कोहकडे, जिल्हा परिषद सदस्या सविता बगाटे, कार्यकारी संचालक चंद्रकांत ढगे, सचिव रामनाथ हिंगे आदी यावेळी उपस्थित होते.

या वेळी श्री. वळसे पाटील म्हणाले, की मागील गाळप हंगामात १८० दिवसांत कारखान्याने ८ लाख १२ हजार ९०९ टन उसाचे गाळप करून सरासरी ११.८५ टक्के उताऱ्याने ९ लाख ६२ हजार ४७५ क्विंटल साखर उत्पादन घेतले. सहवीजनिर्मितीतून १८८ दिवसांत ६ कोटी ९२ लाख ९० हजार युनिट वीजनिर्मिती केली. कारखाना वापर वजा जाता ४ कोटी ५४ लाख ९५ हजार युनिट महावितरणला निर्यात केली आहे. या वर्षी परिस्थिती वेगळी आहे. अगोदर दुष्काळ आता अतिवृष्टी यामुळे उसाचे उत्पादन घटणार आहे. त्यामुळे गाळपासाठी कमी ऊस उपलब्ध होणार आहे. ‘भीमाशंकर’ने चालू हंगामासाठी साडेपाच लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्टे ठेवले असून, त्या दृष्टीने सर्व तयारी पूर्ण झाली आहे. डिस्टलरी प्रकल्प उभारणीला केंद्र शासनाने परवानगी दिली आहे. 

या वेळी प्रास्ताविक उपाध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी केले. सूत्रसंचालन नीलेश पडवळ यांनी केले. आभार संचालक ज्ञानेश्वर गावडे यांनी मानले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com