agriculture news in marathi, sugarcane crushing season status, aurangabad, maharashtra | Agrowon

बावीस कारखान्यांकडून ६६ लाख टन उसाचे गाळप
टीम अॅग्रोवन
बुधवार, 28 फेब्रुवारी 2018
औरंगाबाद : येथील साखर सहसंचालक कार्यालयांतर्गत येत असलेल्या सहा जिल्ह्यांतील २२ सहकारी व खासगी साखर कारखान्यांनी यंदाच्या गाळप हंगामात आतापर्यंत ६६ लाख १७ हजार ५३१ टन उसाचे गाळप करून ६३ लाख ६२ हजार ४१७ क्‍विंटल साखर उत्पादन घेतले आहे. या कारखान्यांचा सरासरी साखर उतारा ९.६१ टक्‍के आहे. 
 
औरंगाबाद येथील प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयांतर्गत औरंगाबाद, जालना, बीड, धुळे, नंदूरबार, जळगाव हे सहा जिल्हे येतात. या सहा जिल्ह्यांतील २२ सहकारी व खासगी साखर कारखान्यांनी यंदाच्या गाळप हंगामात सहभाग नोंदविला. धुळे जिल्ह्यातील एकाही साखर कारखान्याने गाळपात सहभाग नोंदविला नाही.
 
नंदूरबार जिल्ह्यातील तीन साखर कारखान्यांनी ८ लाख ४१ हजार ८४६.२८ टन उसाचे गाळप केले. याद्वारे ८ लाख २१ हजार ३८३ क्‍विंटल साखर उत्पादन झाले आहे. जळगाव जिल्ह्यातील दोन साखर कारखान्यांनी ३ लाख ५१ हजार ८२७.६१ टन उसाचे गाळप करताना ३ लाख १७ हजार २० क्‍विंटल साखरेचे उत्पादन केले.
 
औरंगाबाद जिल्ह्यातील पाच साखर कारखान्यांनी ११ लाख ७८ हजार १४३ टन उसाचे गाळप करीत ११ लाख ३४ हजार २२५ क्‍विंटल साखरेचे उत्पादन केले. जालना जिल्ह्यातील पाच साखर कारखान्यांनी १५ लाख ६५ हजार १९८ टन उसाचे गाळप करीत १५ लाख २२ हजार ८०० क्‍विंटल साखरेचे उत्पादन केले. बीड जिल्ह्यातील सात साखर कारखान्यांनी यंदा आजवर २६ लाख ८० हजार ५१५ मेट्रिक टन उसाचे गाळप केले. यामधून २५ लाख ६७ हजार ४५ क्‍विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे.
 
बीड जिल्ह्यात ऊस गाळप हंगामात सहभाग नोंदविणाऱ्या सात साखर कारखान्यांपैकी येडेश्‍वरी शुगर कारखान्याचा साखर उतारा १०.३९, जालना जिल्ह्यातील श्रद्धा एनर्जी अँड इन्फाचा साखर उतारा १०.४८, तर औरंगाबाद जिल्ह्यातील मुक्‍तेश्‍वर शुगर्सचा साखर उतारा १०.१८ टक्‍के आहे. 

इतर ताज्या घडामोडी
औरंगाबादेत फ्लॉवर १८०० ते ३००० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
सांगली जिल्हा दुष्काळाच्या छायेतसांगली : पावसाळ्याचा दीड महिन्याचा कालावधी लोटला...
मराठवाड्यातील २६६ मंडळांमध्ये पाऊसऔरंगाबाद/नांदेड ः मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांतील ६३...
पावसाच्या आगमनाने नाशिकमधील शेतकरी...नाशिक : जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने...
पशुसंवर्धन विकासासाठी ७०० कोटींचा निधी...कोल्हापूर  : राज्यातील पशुसंवर्धन विकासाला...
मराठवाड्यातील पावणेनऊ लाखांवर शेतकरी...औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील...
विद्यार्थी, शेतकरीप्रश्नी ‘स्वाभिमानी’...बुलडाणा  : जिल्ह्यातील शेतकरी अनेक समस्यांना...
बारामतीत मुसळधार पाऊसपुणे  : जिल्ह्याच्या कोरडवाहू भागात असलेल्या...
नगर जिल्ह्यातील सहा महसूल मंडळांत...नगर : जिल्ह्यातील ३५ महसूल मंडळांत शनिवारी जोरदार...
कोणत्याही तंत्रज्ञानाचा डोळस स्वीकार...औरंगाबाद   : कोणत्याही तंत्रज्ञानाचा...
विधानसभा निवडणुकीत महायुतीने  २२० जागा...मुंबई  : आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीने...
सोलापूर जिल्ह्यात १७ हजार हेक्टर...सोलापूर ः गेल्या दोन वर्षांपासून सोलापूर जिल्हा...
नाशिक जिल्ह्यातील ४१ हजार हेक्टरवरील...नाशिक : जिल्ह्यात लष्करी अळीचा प्रादुर्भाव...
मराठवाड्यात ४१ हजार हेक्टरवरील मक्यावर...औरंगाबाद : अमेरिकन लष्करी अळीने औरंगाबाद व जालना...
सांगली जिल्ह्यात अमेरिकन लष्करी अळीने...सांगली ः जिल्ह्यात मक्यावर अमेरिकन लष्करी अळीचा...
लष्करी अळीच्या प्रादुर्भावाने नगर...नगर   ः गेल्या वर्षभरात दुष्काळाशी...
मोताळा, देऊळगावराजा तालुक्यात शंभर...बुलडाणा : खरिपात विदर्भात मका उत्पादनात...
साताऱ्यात अकराशे हेक्टरवरील मका पिकावर...सातारा : जिल्ह्यातील पूर्व भागात दुष्काळाची...
इंदापूर तालुक्यात अडीचशे हेक्टरवर...पुणे   ः गेल्या काही दिवसांपासून...
गुलटेकडीत टोमॅटोचे आवकेसह दरही वाढलेपुणे ः गेल्या आठ दिवसांत पावसाने दिलेल्या...