agriculture news in marathi, sugarcane crushing season status, nagar, maharashtra | Agrowon

नगरमधील आठ कारखान्यांच्या गाळप हंगामाची सांगता
टीम अॅग्रोवन
रविवार, 15 एप्रिल 2018
नगर  ः जिल्ह्यातील आठ साखर कारखान्यांच्या गाळप हंगामाची सांगता झाली आहे. मात्र अजूनही मोठ्या प्रमाणात ऊस शिल्लक असल्याने चार सहकारी साखर कारखान्यांचा गाळप हंगाम मे अखेरपर्यंत चालण्याची शक्‍यता आहे. जास्त ऊस असलेल्या कारखान्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील ऊस इतर कारखान्यांना देण्याची तयारी दर्शविली असून, ‘मुळा’ने काही ऊस इतर कारखान्यांना दिला आहे. 
 
नगर  ः जिल्ह्यातील आठ साखर कारखान्यांच्या गाळप हंगामाची सांगता झाली आहे. मात्र अजूनही मोठ्या प्रमाणात ऊस शिल्लक असल्याने चार सहकारी साखर कारखान्यांचा गाळप हंगाम मे अखेरपर्यंत चालण्याची शक्‍यता आहे. जास्त ऊस असलेल्या कारखान्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील ऊस इतर कारखान्यांना देण्याची तयारी दर्शविली असून, ‘मुळा’ने काही ऊस इतर कारखान्यांना दिला आहे. 
 
जिल्ह्यात मागील दोन वर्षांत समाधानकारक पाऊस झाल्यामुळे, तसेच धरणांमध्ये पाणीसाठा चांगला असल्यामुळे अनेक ठिकाणी उसाचे क्षेत्र वाढले. पर्यायाने ऊस उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले आहे. या वर्षीचा गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वीच कारखान्यांना गाळपाचा अंदाज आला होता. एकीकडे ऊस उत्पादन वाढले असतानाच, दुसरीकडे साखरेचे दर कोसळल्याने कारखानदार धास्तावले होते. 
 
ज्ञानेश्‍वर, मुळा, अशोक या तीन सहकारी साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात उसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर आहे. त्यांच्याकडे त्याची नोंददेखील झाली आहे. त्यामुळे हे कारखाने मेअखेरपर्यंत चालण्याची शक्‍यता अधिक आहे. त्यातील अशोक आणि मुळा हे कारखाने ३१ मेपर्यंत, ज्ञानेश्‍वर कारखाना २० मेपर्यंत आणि वृद्धेश्‍वर कारखाना १५ मेपर्यंत चालण्याची शक्‍यता आहे.
 
मुळा कारखान्याने आपल्या कार्यक्षेत्रातील ऊस इतर काही कारखान्यांना दिला आहे. आतापर्यंत कुकडी, शिवाजीराव नागवडे (श्रीगोंदे), संजीवनी (कोपरगाव) या तीन सहकारी कारखान्यांचे आणि साईकृपा क्रमांक एक, पीयूष शुगर अँड पॉवर लि., क्रांती शुगर, जय श्रीराम शुगर, अंबालिका शुगर या खासगी अशा आठ कारखान्यांचे गाळप हंगाम बंद झाले आहेत.
 
उर्वरित कारखाने ३० एप्रिलपर्यंत बंद होण्याची शक्‍यता आहे. मुळा, अशोक, ज्ञानेश्‍वर आणि वृद्धेश्‍वर वगळता जिल्ह्यातील सर्वच कारखान्यांचे गळीत हंगाम एप्रिलअखेरपर्यंत बंद होतील, अशी माहिती प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयाने दिली आहे.

इतर ताज्या घडामोडी
सुधारित सोयाबीन आंतरपीक पद्धती राज्यामध्ये सोयाबीनच्या क्षेत्रात झपाट्याने वाढ...
नत्र स्थिरीकरणावर परिणाम करणारे घटक गेल्या भागापासून आपण मार्टीन ॲलेक्झांडर यांच्या...
पशुपालनातील मिथेन उत्सर्जन कमी करणे...मिथेनचे कमी उत्सर्जन करणाऱ्या गायींची पैदास करणे...
गिरणा नदीवरील बलून बंधाऱ्यांसाठी आर्थिक...जळगाव ः जिल्ह्यातील सतत दुष्काळाशी झगडणाऱ्या...
रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपलेरत्नागिरी ः मुसळधार पावसाने जिल्ह्याला चांगलेच...
गोसे खुर्दमधून होणार चार हजार हेक्‍टरवर...चंद्रपूर ः धानपट्ट्यात पावसाअभावी अस्वस्थता आहे....
नाशिक जिल्ह्यात धरणांच्या तपासणीसाठी...नाशिक : जिल्ह्यातील धरणांच्या सुरक्षितेतसाठी...
पेठ तालुक्यात जमिनीतून निघताहेत...नाशिक : पेठ तालुक्यातील निरगुडे गावात दोन...
जळगावात लाल कांद्याचे दर आणि आवक टिकूनजळगाव ः जिल्ह्यातील प्रमुख बाजार, उपबाजारांमध्ये...
नाशिकमध्ये हिरवी मिरची प्रतिक्विंटल...नाशिक ः नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
पुणे, नगर जिल्ह्यात पावसाअभावी चारा...पुणे  : पावसाळ्यात जनावरांसाठी चाऱ्याची अडचण...
`स्वाभिमानी`चे नाशिक जिल्हा बॅंकेसमोर...नाशिक : जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे. ती...
आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली...मुंबई   : युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे...
नवती केळी दरात सुधारणाजळगाव  ः खानदेशात दर्जेदार नवती केळीच्या...
रत्नागिरीत भात लागवड अंतिम टप्प्यातरत्नागिरी   ः जिल्ह्यात उशिरा पण...
रत्नागिरी जिल्ह्यातील आठ हजार शेतकरी...रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
नगर जिल्ह्यातील ४८२ गावांमध्ये...नगर  ः पावसाळ्याचा एक महिना उलटून गेला असला...
नाशिकमध्ये ७९१ कोटींच्या प्रारूप...नाशिक : पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या...
दक्षिण महाराष्ट्रात देशी बेंदूर...कोल्हापूर : वर्षभर काबाडकष्ट करणाऱ्या...
सांडपाणी प्रक्रियेची ‘रीड बेड पद्धती’रीड बेड पद्धतीची सांडपाणी शुद्धीकरणाची...