agriculture news in marathi, sugarcane crushing season status,aurangabad, maharashtra | Agrowon

औरंगाबाद विभागात ८१ लाख ४९ हजार टन ऊस गाळप
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 5 एप्रिल 2018
औरंगाबाद  : यंदाच्या ऊस गाळप हंगामात सहभागी असलेल्या मराठवाडा व खानदेशातील पाच जिल्ह्यांतील २३ साखर कारखान्यांपैकी चार कारखान्यांच्या गाळप हंगामाची सांगता झाली. यामध्ये नंदुरबार जिल्ह्यातील एक, जळगाव जिल्ह्यातील दोन व जालना जिल्ह्यातील एका कारखान्याचा समावेश आहे. पाच जिल्ह्यांतील कारखान्यांनी आतापर्यंत ८१ लाख ४९ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप करून ८० लाख ६२ हजार ४८९ क्‍विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे.
 
औरंगाबाद  : यंदाच्या ऊस गाळप हंगामात सहभागी असलेल्या मराठवाडा व खानदेशातील पाच जिल्ह्यांतील २३ साखर कारखान्यांपैकी चार कारखान्यांच्या गाळप हंगामाची सांगता झाली. यामध्ये नंदुरबार जिल्ह्यातील एक, जळगाव जिल्ह्यातील दोन व जालना जिल्ह्यातील एका कारखान्याचा समावेश आहे. पाच जिल्ह्यांतील कारखान्यांनी आतापर्यंत ८१ लाख ४९ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप करून ८० लाख ६२ हजार ४८९ क्‍विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे.
 
यंदा आजवरच्या ऊस गाळप हंगामात औरंगाबाद, जालना, बीड व जळगाव, नंदुरबार या पाच जिल्ह्यांतील तेवीस साखर कारखान्यांनी सहभाग नोंदविला. ऊस गाळप करणाऱ्या २३पैकी चार कारखान्यांचा गाळप हंगाम आटोपला आहे.
 
यामध्ये नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी, जळगाव जिल्ह्यातील चोपडा व संत मुक्‍ताबाई अँड शुगर; तर जालना जिल्ह्यातील रामेश्‍वर साखर कारखान्याचा समावेश आहे. गाळपात सहभाग नोंदविलेल्या २३ साखर कारखान्यांनी ८१ लाख ४९ हजार ४६ मेट्रिक टन उसाचे गाळप केले. त्यामधून ८० लाख ६२ हजार ४८९ क्‍विंटल साखरेचे उत्पादन झाले. सर्व कारखान्यांचा साखर उतारा सरासरी ९.८९ टक्‍के राहिला.
 
गाळप हंगाम आटोपलेल्या नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी साखर कारखान्यांचा साखर उतारा १०.१९ टक्‍के राहिला. या कारखान्याने १ लाख ३२ हजार ९८६ मेट्रिक टन ऊस गाळप केले. त्याद्वारे १ लाख ३५ हजार ४७५ क्‍विंटल साखर उत्पादन झाले. जळगाव जिल्ह्यातील चोपडा साखर कारखान्याने ३४ हजार २८५ टन ऊस गाळपातून २८ हजार २७० क्‍विंटल साखरेचे उत्पादन घेतले. या कारखान्याचा साखर उतारा ८.२५ टक्‍के राहिला.
 
जळगावमधील संत मुक्‍ताबाई शुगर अँड एनर्जीने गाळप हंगामात १ लाख ३४ हजार ४६७ टन उसाचे गाळप करत १ लाख २५ हजार ४७० क्‍विंटल साखर उत्पादन घेतले. या कारखान्याचा साखर उतारा ९.३३ टक्‍के आहे. जालना जिल्ह्यातील रामेश्‍वर साखर कारखान्याने २ लाख २७ हजार ८७३ टन उसाचे गाळप करत २ लाख ८ हजार क्‍विंटल साखरेचे उत्पादन केले. 

नंदुरबार, औरंगाबाद, जालना, बीड या चार जिल्ह्यांतील १० कारखान्यांचा साखर उतारा दहा टक्‍क्‍यांपुढे राहिला आहे. यामध्ये नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी साखर कारखान्याचा साखर उतारा १०.१९,अॅस्टोरिया साखर कारखान्याचा १०.०९, औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड कारखाना बारामती अॅग्रोचा १०.०८, मुक्‍तेश्‍वर शुगर्सचा १०.५८, जालना जिल्ह्यातील समर्थ युनिट एक १०.३२, श्रद्धा एनर्जी अँड इन्फ्रा १०.७६, बीड जिल्ह्यातील ‘छत्रपती’चा १०.०४, जय महेश एनएसएल १०.०३, येडेश्‍वरी शुगर कारखान्याचा साखर उतारा १०.५२ टक्‍के राहिल्याची माहिती साखर विभागाच्या वतीने देण्यात आली. 

इतर ताज्या घडामोडी
रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपलेरत्नागिरी ः मुसळधार पावसाने जिल्ह्याला चांगलेच...
गोसे खुर्दमधून होणार चार हजार हेक्‍टरवर...चंद्रपूर ः धानपट्ट्यात पावसाअभावी अस्वस्थता आहे....
नाशिक जिल्ह्यात धरणांच्या तपासणीसाठी...नाशिक : जिल्ह्यातील धरणांच्या सुरक्षितेतसाठी...
पेठ तालुक्यात जमिनीतून निघताहेत...नाशिक : पेठ तालुक्यातील निरगुडे गावात दोन...
जळगावात लाल कांद्याचे दर आणि आवक टिकूनजळगाव ः जिल्ह्यातील प्रमुख बाजार, उपबाजारांमध्ये...
नाशिकमध्ये हिरवी मिरची प्रतिक्विंटल...नाशिक ः नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
पुणे, नगर जिल्ह्यात पावसाअभावी चारा...पुणे  : पावसाळ्यात जनावरांसाठी चाऱ्याची अडचण...
`स्वाभिमानी`चे नाशिक जिल्हा बॅंकेसमोर...नाशिक : जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे. ती...
आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली...मुंबई   : युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे...
नवती केळी दरात सुधारणाजळगाव  ः खानदेशात दर्जेदार नवती केळीच्या...
रत्नागिरीत भात लागवड अंतिम टप्प्यातरत्नागिरी   ः जिल्ह्यात उशिरा पण...
रत्नागिरी जिल्ह्यातील आठ हजार शेतकरी...रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
नगर जिल्ह्यातील ४८२ गावांमध्ये...नगर  ः पावसाळ्याचा एक महिना उलटून गेला असला...
नाशिकमध्ये ७९१ कोटींच्या प्रारूप...नाशिक : पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या...
दक्षिण महाराष्ट्रात देशी बेंदूर...कोल्हापूर : वर्षभर काबाडकष्ट करणाऱ्या...
सांडपाणी प्रक्रियेची ‘रीड बेड पद्धती’रीड बेड पद्धतीची सांडपाणी शुद्धीकरणाची...
‘शेतकरी सन्मान’साठी रत्नागिरीतील दीड...रत्नागिरी   : पंतप्रधान शेतकरी सन्मान...
वृक्ष संवर्धनासाठी नागरिक, कर्मचारी...परभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
नांदेड जिल्ह्यात साडेपाच लाख हेक्टरवर...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
...तर रासायनिक खते, कीटकनाशकांचे ...पुणे  ः  केंद्र सरकारच्या वतीने झिरो...