agriculture news in marathi, sugarcane crushing season status,pune, maharashtra | Agrowon

पुणे जिल्ह्यातील कारखान्यांकडून १०३ लाख टन ऊस गाळप
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 22 मार्च 2018
पुणे  ः जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा हंगाम वेगात सुरू आहे. जिल्ह्यातील कारखान्यांनी आतापर्यंत १०३ लाख ७ हजार ७८९ मेट्रिक टन उसाचे गाळप केले असून, ११५ लाख ५२ हजार १७० क्विटंल साखर उत्पादन झाले आहे. जिल्ह्यात सरासरी ११.२१ टक्के साखर उतारा असल्याचे विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाच्या सूत्रांनी सांगितले. 
 
पुणे  ः जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा हंगाम वेगात सुरू आहे. जिल्ह्यातील कारखान्यांनी आतापर्यंत १०३ लाख ७ हजार ७८९ मेट्रिक टन उसाचे गाळप केले असून, ११५ लाख ५२ हजार १७० क्विटंल साखर उत्पादन झाले आहे. जिल्ह्यात सरासरी ११.२१ टक्के साखर उतारा असल्याचे विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाच्या सूत्रांनी सांगितले. 
 
जिल्ह्यात उसाचे सुमारे एक लाख तीस हजार हेक्‍टरपर्यंत क्षेत्र असते. यंदाही मोठ्या प्रमाणात उसाचे क्षेत्र आहे. आत्तापर्यंत ७० ते ८० हजार हेक्‍टरहून अधिक क्षेत्रावरील उसाचे गाळप झाले आहे. जिल्ह्यात एकूण सतरा साखर कारखाने आहेत. यात सहकारी अकरा; तर खासगी सहा साखर कारखान्यांचा समावेश आहे.
 
या सर्व कारखान्यांमध्ये एक ते २१ नोव्हेंबर या कालावधीत गाळप सुरू झाले होते. या कारखान्यांची दैनंदिन ऊस गाळप क्षमता जवळपास अडीच ते आठ हजार मेट्रिक टन एवढी आहे. सध्या कारखान्यांचा हंगाम अर्ध्याहून अधिक संपला आहे. जिल्ह्यातील कारखान्यांचा हंगाम पंधरा मेपर्यंत सुरू राहण्याची शक्‍यता आहे.  
आत्तापर्यंत जिल्ह्यातील सहकारी साखर कारखान्यांनी ६६ लाख ७६ हजार ९४२ टन उसाचे गाळप केले आहे. साखरेचे ७४ लाख २७ हजार ८१५ क्विंटल साखर उत्पादन झाले असून, साखर उतारा ११.१२ टक्के एवढा आहे.
 
खासगी साखर कारखान्यांनी ३६ लाख ३० हजार ८४७ टन उसाचे गाळप केले आहे. साखरेचे ४१ लाख २४ हजार ३५५ क्विंटल उत्पादन झाले आहे. साखर उतारा ११.३६ टक्के एवढा आहे. 
 
जिल्ह्यात बारामती अॅग्रो साखर कारखान्याने सर्वाधिक दहा लाख ५ हजार २५० मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. त्यातून साखरेचे ११ लाख ४३ हजार ६०० क्विंटल साखर उत्पादन झाले असून, साखर उतारा ११.३८ टक्के एवढा आहे.
 
दौंड शुगर कारखान्याने साखर उताऱ्यात आघाडी घेतली असून, या कारखान्याचा सरासरी ११.८० टक्के साखर उतारा आहे. या कारखान्याने ८ लाख ७९ हजार ८९० टन उसाचे गाळप केले. त्यातून दहा लाख ३८ हजार १०० क्विंटल साखर उत्पादन झाल्याचे पुणे प्रादेशिक कार्यालयाच्या सूत्रांनी सांगितले. 

इतर ताज्या घडामोडी
औरंगाबाद, जालना जिल्ह्यांत पावसाचा कमी-...औरंगाबाद  : मराठवाड्यातील ४२१ पैकी तब्बल २७५...
कोल्हापूर, सिंधुदुर्गात पावसाची रिपरिपकोल्हापूर, सिंधुदुर्ग : सप्टेंबरच्या पहिल्या...
शेतीमाल तारण कर्ज योजनेसाठी एक कोटीपरभणी : ‘‘परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे...
पाचोरा, जामनेरातही १०० टक्के पाऊसजळगाव ः खानदेशात जळगाव, धुळ्यात या...
‘टेंभू‘चे पाणी आटपाडीत, शेतकऱ्यांना...आटपाडी जि. सांगली :  टेंभू पंपगृहातील पंपात...
‘शेतकरी सन्मान योजने‘च्या अनुदानासाठी...कळमनुरी : प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेंतर्गत...
तीन कारखान्यावरील कारवाई अंतिम टप्प्यातसोलापूर : ‘‘सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी...
संत्र्याला जागतिक बाजारपेठेत पोचवण्याचे...अमरावती : जिल्ह्यात उत्पादित होणाऱ्या...
बागलाण तालुक्यात शेतातून चंदनाची चोरीनाशिक  : बागलाण तालुक्यातील नवे निरपूर येथील...
तोलाई परिपत्रक होणार रद्द पुणे ः बाजार समित्यांमध्ये शेतमालाच्या...
‘शेतकरी सन्मान’साठी २० हजार कोटी दिले...नाशिक : शेतकऱ्यांना सन्मान मिळवून देत त्यांना मदत...
‘मी शेतकरी’ आंदोलनाला गांधी जयंतीपासून...नगर : शेतकऱ्यांच्या शेतीमालाला दीडपट हमीभाव तसेच...
शेतीपूरक व्यवसायांना राज्य शासनाची...सांगली ः अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास...
थकीत बिलासाठी मुंबईत दुग्धविकास आयुक्त...परभणी ः शासकीय दूध योजनेअंतर्गत परभणी येथील दुग्ध...
आर्थिक मंदीमुळे देशातील शेती क्षेत्राला...नांदेड ः सध्या प्रचंड मंदी आहे. गुंतवणूक केली जात...
सातारा जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यात...सातारा ः माण, खटाव, फलटण या दुष्काळी तालुक्यांना...
विषबाधेच्या चौकशीची फाइल अडली गृह...नागपूर: प्रशासन गतिमान असल्याचा दावा सरकारकडून...
मित्रबुरशींच्या संवर्धनातून लष्करी...सध्या राज्याच्या विविध भागात अनुकूल हवामानामुळे...
राज्यात लिंबांना प्रतिक्विंटल १५०० ते...सोलापुरात प्रतिक्विंटल सर्वाधिक १० हजार रुपये...
आचारसंहितेच्या धास्तीने जिल्हा परिषदेत...पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीच्या...