agriculture news in marathi, sugarcane crushing season status,satara, maharashtra | Agrowon

सातारा जिल्ह्यात ७५ लाख टन उसाचे गाळप
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 20 मार्च 2018

सातारा : जिल्ह्यातील १४ साखर कारखान्यांचे ऊस गाळप सुरळीत सुरू आहे. या कारखान्यांनी आतापर्यंत ७५ लाख ५७ हजार २५४ मेट्रिक टन उसाचे गाळप केले असून, त्याद्वारे ८९ लाख सात हजार ८३५ क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. जिल्ह्यात सरासरी उताऱ्यात वाढ झाली असून सध्या सरासरी ११.७९ टक्के साखर उतारा मिळत आहे. गाळपात ‘सह्याद्री’ तर साखर उताऱ्यात जयवंत शुगरची आघाडी कायम आहे.

सातारा : जिल्ह्यातील १४ साखर कारखान्यांचे ऊस गाळप सुरळीत सुरू आहे. या कारखान्यांनी आतापर्यंत ७५ लाख ५७ हजार २५४ मेट्रिक टन उसाचे गाळप केले असून, त्याद्वारे ८९ लाख सात हजार ८३५ क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. जिल्ह्यात सरासरी उताऱ्यात वाढ झाली असून सध्या सरासरी ११.७९ टक्के साखर उतारा मिळत आहे. गाळपात ‘सह्याद्री’ तर साखर उताऱ्यात जयवंत शुगरची आघाडी कायम आहे.

जिल्ह्यातील ऊस हंगाम अंतिम टप्प्यात आला असून अजूनही ऊस शिल्लक असल्याने किमान २० ते ३० दिवस हंगाम सुरू राहील असा अंदाज आहे. जिल्ह्यातील आठ सहकारी व सहा खासगी कारखान्यांचे गाळप सुरू आहे. या कारखान्यांनी ७५  लाख ५७ हजार २५४ मेट्रिक टन उसाचे गाळप केले असून, त्याद्वारे ८९ लाख सात हजार ८३५ क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. 
 
सह्याद्री कारखान्याने सर्वाधिक दहा लाख ३१ हजार २०० मेट्रिक टन उसाचे गाळप केले असून, १२ लाख ६७ हजार १७० क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे. ‘सह्याद्री’ नंतर कृष्णा कारखान्याने नऊ लाख ३७ हजार २२० टन उसाचे गाळप केले असून त्याद्वारे ११ लाख ७८ हजार ९३० क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे. जिल्ह्यात सर्वाधिक साखर उतारा ‘जयवंत शुगर’चा १२.८० तर सर्वात कमी साखर उतारा ‘स्वराज’चा १०.१२ टक्के आहे. 

पहिला हप्ता जाहीर करताना साखरेचे दर चांगले असल्याने साखर कारखान्यांनी २७०० ते तीन हजार रुपये दरम्यान दर दिला होता. मध्यंतरीच्या काळात साखरेच्या दरात घसरण झाल्यामुळे साखर कारखान्यांनी पहिल्या हप्प्यात घट केली होती. फेब्रुवारीच्या अखेरीपासून साखरेच्या दरात सुधारणा झाली आहे.

मात्र साखर कारखान्यांनी पहिल्या हप्त्यात केलेल्या कपातीत वाढ केलेली नाही. अजून शेतकऱ्यांच्या खात्यात कपातीचे बिल जमा केले जात असल्याने साखरेच्या वाढीव दराचा लाभ शेतकऱ्यांना कधी मिळणार असा प्रश्न केला जात आहे.

इतर ताज्या घडामोडी
रत्नागिरीत भात लागवड अंतिम टप्प्यातरत्नागिरी   ः जिल्ह्यात उशिरा पण...
रत्नागिरी जिल्ह्यातील आठ हजार शेतकरी...रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
नगर जिल्ह्यातील ४८२ गावांमध्ये...नगर  ः पावसाळ्याचा एक महिना उलटून गेला असला...
नाशिकमध्ये ७९१ कोटींच्या प्रारूप...नाशिक : पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या...
दक्षिण महाराष्ट्रात देशी बेंदूर...कोल्हापूर : वर्षभर काबाडकष्ट करणाऱ्या...
सांडपाणी प्रक्रियेची ‘रीड बेड पद्धती’रीड बेड पद्धतीची सांडपाणी शुद्धीकरणाची...
‘शेतकरी सन्मान’साठी रत्नागिरीतील दीड...रत्नागिरी   : पंतप्रधान शेतकरी सन्मान...
वृक्ष संवर्धनासाठी नागरिक, कर्मचारी...परभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
नांदेड जिल्ह्यात साडेपाच लाख हेक्टरवर...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
...तर रासायनिक खते, कीटकनाशकांचे ...पुणे  ः  केंद्र सरकारच्या वतीने झिरो...
पक्षांतरानंतर रिक्त जागांवर तरुणांना...नगर  : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये...
पुणे विभागात खरिपाचा ३६ टक्के...पुणे  ः जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अजूनही...
‘जलयुक्त’च्या पुरस्काराची गावांना...नगर  ः लोकसहभागातून जलयुक्त शिवार अभियान...
जनजागृतीसाठी अन्नसुरक्षा पंधरवडा...मुंबई  : राज्यात काही ठिकाणी होणारी दूध व...
भंडारा, गोंदिया जिल्ह्यातील दूध...भंडारा   ः रेल्वेच्या माध्यमातून नागपूर...
अमरावती जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकटअमरावती   ः जिल्ह्यातील चौदाही...
समृद्धी महामार्गामुळे राज्याच्या आर्थिक...अमरावती  : समृद्धी महामार्गामुळे राज्याच्या...
वनशेतीसाठी मोह लागवड उपयुक्तजंगलामध्ये पानझडी वृक्षवर्गातील मोह हे एक...
गुलटेकडीत टोमॅटो, शेवगा, फ्लॉवरच्या...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
लाल कांद्याची लागवड वाढण्याची शक्‍यताजळगाव ः खानदेशात आगाप कांदा लागवडीसंबंधी...