agriculture news in marathi, sugarcane crushing season update, pune, maharashtra | Agrowon

पुणे जिल्ह्यातील १४ कारखान्यांचा गाळप हंगाम आटोपला
टीम अॅग्रोवन
बुधवार, 24 एप्रिल 2019

पुणे  ः जिल्ह्यातील १४ साखर कारखान्यांचा गाळप हंगाम आटोपला आहे. तोडणी मजुरांनी आपआपल्या गावी जात पावसाळ्यापूर्वी खरीप हंगामाची पूर्वतयारी करण्यास सुरूवात केली आहे. 

पुणे  ः जिल्ह्यातील १४ साखर कारखान्यांचा गाळप हंगाम आटोपला आहे. तोडणी मजुरांनी आपआपल्या गावी जात पावसाळ्यापूर्वी खरीप हंगामाची पूर्वतयारी करण्यास सुरूवात केली आहे. 

जिल्ह्यात एक आॅक्टोबरपासून गाळप हंगामास सुरुवात झाली होती. यंदा सुमारे सहा ते साडे सहा महिने साखर कारखाने सुरू राहिले आहेत. हंगामात १८ साखर कारखान्यांपैकी १७ साखर कारखान्यांनी गळीत हंगाम सुरू केला होता. जिल्ह्यात भीमा पाटस साखर कारखान्याने १२ फेब्रुवारी, तर व्यंकटेशकृपा या खाजगी साखर कारखान्याने २१ फेब्रुवारीला गळीत हंगाम बंद केला होता. त्यानंतर हळूहळू कारखान्यांनी गळीत हंगाम आटोपता घेण्यास सुरुवात केली. जिल्ह्यात एप्रिलअखेरपर्यंत गाळप हंगाम चालण्याची शक्यता आहे.

यंदा गाळप हंगामासाठी जिल्ह्यात एकूण सहकारी ११ व खाजगी ६ साखर कारखाने सुरू झाले होते. या साखर कारखान्यांची दैनंदिन गाळपक्षमता अडीच ते साडेसात हजार टन होती. पाणीटंचाईची वाढती तीव्रता व जनावरांसाठी आवश्यक असलेल्या चाऱ्याची स्थिती बघता मार्चअखेरपर्यंत साखर कारखाने बंद होण्याचा अंदाज होता. परंतु उसाची उपलब्धता अधिक असल्याने गाळप हंगाम उशिराने बंद होत आहे. पुणे जिल्ह्यांतील अनेक भागात पाणीटंचाईची झळ वाढू लागली आहे. त्यामुळे साखर कारखान्यांनी १२ फेब्रुवारीपासून गळीत हंगाम संपवण्यास सुरवात केली. यंदाच्या हंगामात इंदापूर सहकारी साखर कारखान्याने सर्वाधिक ऊसगाळप केल्याचे पुणे प्रादेशिक सहसंचालक कार्यालयाच्या सूत्रांनी सांगितले.

इतर ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्ह्यात `सन्मान`ची पाच लाख...सोलापूर : जिल्ह्यात ‘आठ अ’नुसार असलेल्या ११...
सोलापुरात यंदाही खरीप कोरडाचसोलापूर : खरीप हंगाम सुरू होऊन दीड महिना उलटला....
नाशिक बाजार समितीची सुरक्षा वाढविण्याचा...नाशिक : नाशिक कृषी बाजार समितीत वाढलेल्या...
नाशिक जिल्ह्यात पावसाअभावी फळबागांवर...नाशिक : कळवण, देवळा, मालेगाव, नांदगाव,...
परभणी जिल्ह्यात १३ लघू तलावांतील...परभणी : यंदा पावसाळ्याचा दीड महिन्याचा कालावधी...
टंचाईस्थितीची वस्तुनिष्ठ माहिती सादर...हिंगोली : टंचाईस्थितीत शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत...
जालना जिल्ह्यात दुधाचे पैसे दोन...जालना : जिल्ह्यातील जामवाडी, गणेशपूर, नळणी, येवता...
औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली...औरंगाबाद  : मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर...
सांगली जिल्ह्यात पावसाची उघडीपसांगली ः जिल्ह्यात जून आणि जुलैमध्ये झालेल्या...
कंडारी पाणी योजनेतील गैरव्यवहारप्रकरणी...जळगाव ः कंडारी (ता. भुसावळ) येथील ग्राम...
शेततळ्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित...नागपूर ः विकासाच्या संकल्पनांमध्ये रस्ते, नाले व...
सातारा जिल्ह्याच्या पूर्व भागातील शेती...सातारा : जिल्ह्यात पश्चिमेकडे दमदार पाऊस, तर...
कापसाच्या हमीभावात ५०० रुपयांनी वाढ...अमरावती   ः राज्याची कमी असलेली कापूस...
दमदार पावसाअभावी पुणे जिल्ह्यातील पूर्व...पुणे  ः जिल्ह्याच्या पूर्व भागातील शिरूर,...
नगर जिल्ह्यात ऐन पावसाळ्यातही...नगर  ः दुष्काळाने होरपळ झालेल्या नगर...
पावसाअभावी धुळे, जळगाव जिल्ह्यांत...जळगाव  ः खानदेशात सुरवातीला पावसाने जोरदार...
नागपूर विभागात पावसाअभावी पिकांची वाढ...नागपूर  ः निम्मा जुलै महिना संपत आला असतानाच...
सांगलीत हळद प्रतिक्विंटल ६००० ते ८९००...सांगली ः येथील बाजार समितीत हळदीची आवक कमी झाली...
भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत...मुंबई  : भाजपचे ज्येष्ठ नेते, मंत्री...
सुधारित सोयाबीन आंतरपीक पद्धती राज्यामध्ये सोयाबीनच्या क्षेत्रात झपाट्याने वाढ...