सांगलीत ३६ हजार हेक्टरवर ऊस लागवड Sugarcane cultivation on 36,000 hectares in Sangli
सांगलीत ३६ हजार हेक्टरवर ऊस लागवड Sugarcane cultivation on 36,000 hectares in Sangli

सांगलीत ३६ हजार हेक्टरवर ऊस लागवड

जिल्ह्यात ३६ हजार ४५८ हेक्टर क्षेत्रावर ऊस लागवड झाली आहे. त्यापैकी आडसाली उसाची २७ हजार ४५४ हेक्टवर झाली आहे. सर्वाधिक ऊस लागवड वाळवा तालुक्यात झाली असली तरी गतवर्षीच्या तुलनेत यंदा ऊस लागवडीस गती नाही.

सांगली : जिल्ह्यात ३६ हजार ४५८ हेक्टर क्षेत्रावर ऊस लागवड झाली आहे. त्यापैकी आडसाली उसाची २७ हजार ४५४ हेक्टवर झाली आहे. सर्वाधिक ऊस लागवड वाळवा तालुक्यात झाली असली तरी गतवर्षीच्या तुलनेत यंदा ऊस लागवडीस गती नसल्याचे चित्र पाहायला मिळते आहे. जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांत २६ हजार हेक्टरने क्षेत्र वाढले आहे. सन २०१९-२०२० मध्ये ९५ हजार हेक्टरवर उसाचे क्षेत्र होते. गतवर्षी सुमारे १ लाख ११ हजार ९४५ हेक्टरवर ऊस लागवड होती. अर्थात १७ हजार हेक्टरने वाढ झाली होती. त्यामुळे साखर कारखान्यांना ऊस गाळपासाठी मुबलक उपलब्ध झाला आहे. वास्तविक पाहता, गतवर्षी महापूर येऊन देखील उसाच्या क्षेत्रात वाढ झाली होती. यंदा जिल्ह्यातील वाळवा, पलूस, कडेगाव, तालुक्यात सर्वाधिक ऊस लागवड झाली आहे. यंदा ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी मे महिन्यापासून आडसाली उसाची लागवडीस सुरुवात झाली. त्यामुळे यंदा आडसालीच्या क्षेत्रात वाढ होईल, असा अंदाज साखर कारखान्यांच्या सूत्रांनी व्यक्त केली होती. मात्र, ऑक्टोंबर पर्यंत पाऊस पडला. त्यामुळे ऊस लागवडीस अडथळे निर्माण झाला होता. त्याचा परिणाम आडसाली ऊस लागवडीवर झाला आहे. आडसाली उसाचे क्षेत्र २७४५४ हेक्टरवर लागवड झाली आहे. जत आणि खानापूर तालुक्यात उसाच्या क्षेत्रात घट झाली असल्याचे चित्र आहे. पूर्व हंगामी ऊस लागवड ७ हजार ६६६ तर, सुरू ११० आणि खोडवा १२२८ हेक्टरवर लागवड झाली आहे. सुरू आणि खोडव्याच्या क्षेत्रात वाढ होईल. परंतु, गतवर्षीच्या तुलनेत यंदा उसाच्या क्षेत्रात घट होणार का? वाढ होणार याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. कवेठमहांकाळ तालुक्यात ऊस क्षेत्र वाढले कवठेमहांकाळ तालुका हा दुष्काळी म्हणून ओळख आहे. परंतु या तालुक्यात म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे शाश्वत पाणी मिळू लागले आहे. परंतु गतवर्षी पाणीटंचाईमुळे काही प्रमाणात उसाच्या क्षेत्रात घट झाली होती. परंतु यंदा तालुक्यात अपेक्षित पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांचा ऊस लागवडीकडे कल वाढला आहे. परिणामी तालुक्यात ४ हजार ५०१ हेक्टरवर उसाची लागवड झाली आहे.

तालुकानिहाय ऊस लागवड क्षेत्र         

तालुका आडसाली पूर्व हंगामी सुरू खोडवा
मिरज  १५१० १३६०    
जत   १०७      
खानापूर ५१५      
वाळवा  १०९२५   २११    
तासगाव १२३९      
शिराळा   ११७५  १७५६    
आटपाडी   १३३०  १३०  ११०   
कवठेमहांकाळ  ४१७६  ३२५    
पलूस ४१९०  २५६६   १२२८
कडेगाव   २२८७ १३१८    
एकूण   २७४५४   ७६६६  ११० १२२८
         

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com