Agriculture news in Marathi Sugarcane cultivation area will increase | Agrowon

ऊस लागवड क्षेत्र वाढणार

टीम अॅग्रोवन
शनिवार, 15 जानेवारी 2022

चालू वर्षी चांगल्या झालेल्या पावसाचा परिणाम ऊस लागवड क्षेत्राच्या वाढीवर झाला आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात लागवडी केल्या आहेत.

पुणे  : चालू वर्षी चांगल्या झालेल्या पावसाचा परिणाम ऊस लागवड क्षेत्राच्या वाढीवर झाला आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात लागवडी केल्या आहेत. पुणे विभागात आडसाली, पूर्वहंगामी, सुरू आणि खोडवा उसाचे सरासरी ३ लाख ७० हजार ७८१ हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी १३ जानेवारी अखेरपर्यंत १ लाख ८६ हजार ५४० हेक्टरवर लागवडी झाल्या आहेत. येत्या काळात शेतकऱ्यांनी खोडवा उसाचे क्षेत्र राखल्यास उसाच्या क्षेत्रात आणखी वाढ होणार असल्याचे चित्र आहे.  

चालू वर्षी लवकर दाखल झालेल्या पावसामुळे पुणे विभागातील मुळा, भंडारदरा, कुकडी, उजनी, जायकवाडी, खडकवासला, पानशेत यासह अनेक धरणांत पाण्याची बऱ्यापैकी उपलब्धता आहे. मात्र इतर पिकांच्या तुलनेत ऊस पीक हे शाश्‍वत उत्पन्न म्हणून शेतकरी ऊस पिकांकडे पाहतात. त्यामुळे बहुतांशी शेतकरी दर वर्षी आडसाली उसाच्या लागवडी करतात. यंदा ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक शेतकऱ्यांनी उसाच्या लागवडीवर भर दिला आहे. परिणामी, ऊस लागवडीच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे पुढील वर्षीच्या गळीत हंगामात मोठ्या प्रमाणात ऊस उपलब्ध होण्याचा अंदाज वर्तविण्यात येण्यात येत आहे.

दर वर्षी शेतकरी आडसाली, पूर्वहंगामी, सुरू अशा तीन हंगामांत उसाच्या लागवडी करतात. जून ते जुलै महिन्यांत आडसाली उसाच्या, तर ऑगस्ट ते सप्टेंबरमध्ये पूर्वहंगामी व ऑक्टोबरनंतर सुरू उसाच्या शेतकरी प्रामुख्याने लागवडी करतात. आडसाली उसाच्या लागवड केल्यानंतर साधारणपणे पंधरा ते सतरा महिन्यांनी, तर पूर्वहंगामी १२ ते १४, पूर्वहंगामी १० ते १२ महिन्यांनी ऊस साखर कारखान्यास तोडणीस देतात. विभागात आडसाली उसाच्या ७४ हजार २३३ हेक्टर, पूर्वहंगामी ३९ हजार २५२ हेक्टर, सुरू १२ हजार ८०१ हेक्टर आणि खोडवा उसाच्या ६० हजार २५४ हेक्टरवर लागवड झाली आहे.

विभागातील नगर जिल्ह्यात शेवगाव, राहुरी, श्रीगोंदा, कर्जत, नेवासा, कोपरगाव या तालुक्यांत मोठ्या प्रमाणात लागवडी झाल्या आहेत. पुणे जिल्ह्यातील दौड, हवेली, शिरूर, बारामती, इंदापूर, जुन्नर, आंबेगाव, पुरंदर या तालुक्यांतही लागवडी झाल्या आहेत. मुळशी, मावळ, वेल्हे, खेड ही तालुके उसाच्या लागवडीपासून दूर आहेत. सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस, पंढरपूर, करमाळा, माढा, मोहोळ, दक्षिण सोलापूर, मंगळवेढा, अक्कलकोट या तालुक्यांत उसाच्या लागवडी झाल्या आहेत.


इतर अॅग्रो विशेष
उत्तर महाराष्ट्राला थंडीचा विळखा पुणे : उत्तर भारतातील गोठविणाऱ्या शीत वाऱ्यांमुळे...
राज्यातील ५१ अधिकारी, कर्मचाऱ्यांना...मुंबई : केंद्रीय गृहमंत्रालयाने प्रजासत्ताक...
‘सीडी रेशो’ घसरलेल्या  जिल्ह्यांमध्ये...पुणे ः कर्जवाटप व ठेवीचे गुणोत्तर (सीडी रेशो)...
खराब झालेल्या सोलर  पॅनेलची नुकसान...गडचिरोली : धानोरा तालुक्यातील गिरोला येथील सुरेश...
रब्बी हंगामात ज्वारी घटली; हरभऱ्याची...पुणे : राज्यात रब्बीच्या ९८ टक्के पेरा पूर्ण झाला...
डिजिटल सात-बारा प्रकल्पातून जगताप यांची...पुणेः देशात चर्चित ठरलेल्या डिजिटल सात-बारा...
बाजारपेठेत नव्या बेदाण्याची प्रतीक्षा सांगली ः गेल्या दोन महिन्यांपासून बेदाण्याला...
ऊसतोडणी रखडल्याने वैभववाडी, उंबर्डेत...सिंधुदुर्गनगरी ः वैभववाडी तालुक्यातील नादुरूस्त...
साताऱ्यात कृषिपंपांची वीज तोडणीचा धडाकासातारा : गेल्या १५ दिवसांपासून ग्रामीण भागात...
विविध वाण, तंत्रवापरातून दर्जेदार...वढोदा (ता.चोपडा, जि.जळगाव) येथील संदीप पाटील...
राज्यात थंडीची लाट पसरणार :...पुणे : पाकिस्तान मार्गे देशाच्या पश्चिम...
गरीब कुटुंबांच्या उत्पन्नात ५३...आर्थिक उदारीकरणानंतर (Economic liberalization)...
आंबा, काजू हंगाम उशिरा सुरू होण्याचा...  वृत्तसेवा - गेल्या आठवड्याच्या शेवटी...
खाद्यतेलातील तेजीचा  सोयाबीनला लाभ...पुणेः देशात पामतेलाची उपलब्धता कमी असल्याने...
तापमानात घट; द्राक्ष मण्यांना तडे नाशिक : रविवारी (ता.२३) रोजी सकाळपासूनच धुके आणि...
उत्तर महाराष्ट्रात थंडीच्या लाटेचा...पुणे : आखाती देशातून आलेल्या धूळ वादळामुळे...
जास्त उत्पादकतेच्या कापूस  बियाण्याला...पुणेः पाकिस्तानमध्ये कापसाची उत्पादकता दिवसेंदिवस...
गुहागरमध्ये दीडशे एकरातील  आंबा, काजू...गुहागर, जि. रत्नागिरी : तालुक्यातील गिमवी देवघर...
गावरान लाल मिरचीचा यंदा ठसकानांदेड : नायगाव तालुक्यातील बरबडा येथील गावरान...
उन्हाळ्यात पाणी टंचाई कमी भासणार पुणे : पावसाळ्यात जोरदार पाऊस झाल्याने भूगर्भातील...