Agriculture news in Marathi, Sugarcane cultivation in Nanded, Parbhani may increase | Agrowon

नांदेड, परभणीत ऊस लागवडी वाढण्याची शक्यता

टीम अॅग्रोवन
शनिवार, 12 ऑक्टोबर 2019

नांदेड ः गतवर्षीच्या तुलनेत जास्त पाऊस झाल्यामुळे यंदा नांदेड, परभणी जिल्ह्यातील सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता झालेल्या भागात ऊस लागवड क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे. परंतु गतवर्षीच्या दुष्काळामुळे ऊस मोडून टाकल्यामुळे यंदाच्या (२०१९-२०) हंगामात गाळपासाठी ऊसाची उपलब्धता कमी राहील. 

नांदेड, परभणी जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये यंदा गतवर्षीपेक्षा जास्त पाऊस झाल्यामुळे विहिरी, तलावात तसेच प्रकल्पांची जलाशये आदी सिंचन स्त्रोतांमध्ये पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. त्यामुळे रब्बी तसेच उन्हाळी हंगामात सिंचनासाठी पाणी उपलब्ध राहणार आहे. 

नांदेड ः गतवर्षीच्या तुलनेत जास्त पाऊस झाल्यामुळे यंदा नांदेड, परभणी जिल्ह्यातील सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता झालेल्या भागात ऊस लागवड क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे. परंतु गतवर्षीच्या दुष्काळामुळे ऊस मोडून टाकल्यामुळे यंदाच्या (२०१९-२०) हंगामात गाळपासाठी ऊसाची उपलब्धता कमी राहील. 

नांदेड, परभणी जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये यंदा गतवर्षीपेक्षा जास्त पाऊस झाल्यामुळे विहिरी, तलावात तसेच प्रकल्पांची जलाशये आदी सिंचन स्त्रोतांमध्ये पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. त्यामुळे रब्बी तसेच उन्हाळी हंगामात सिंचनासाठी पाणी उपलब्ध राहणार आहे. 

पैठण येथील जायकवाडी धरण शंभर टक्के भरल्यामुळे डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रातील परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. पाथरी, मानवत, परभणी, पूर्णा, गंगाखेड तालुक्यातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी आवर्तने मिळण्याची शाश्वती झाली आहे. 

विदर्भ मराठवाड्याच्या सीमेवरील इसापूर येथील उर्ध्वपैनगंगा धरणातील उपयुक्त पाणीसाठा ४० टक्के पर्यंत वाढल्याने पाणीआवर्तने मिळणे अपेक्षित आहे. त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी, वसमत तालुक्याचा काही भाग, नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर, मुदखेड, हदगाव आदी तालुक्यांमध्ये सिंचनासाठी पाणी मिळू शकेल. विष्णुपुरी प्रकल्प शंभर टक्के भरला आहे. गोदावरी नदीवरील अनेक बंधारे, मध्यम तसेच लघु प्रकल्पांमध्ये देखील पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. त्यामुळे नांदेड, परभणी तसेच हिंगोली जिल्ह्याच्या काही भागात ऊस लागवड वाढू शकते. 

सोयाबीन नंतर तसेच कपाशी नंतर जानेवारी महिन्यात सुरू उसाची लागवड होण्याची शक्यता आहे. प्रादेशिक साखर सहसंचालक अंतर्गंत नांदेड विभागातील परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर या चार जिल्ह्यांत २०१८-१९ मध्ये एकूण १ लाख ४२ हजार ६०३ हेक्टर एवढे उसाचे क्षेत्र गाळपासाठी निश्चित करण्यात आले होते. परंतु गतवर्षीच्या दुष्काळात पाणी कमी पडलेल्या भागातील शेतकऱ्यांनी ऊस मोडून टाकला. त्यामुळे यावर्षी ८१ हजार ६४२ हजार हेक्टर एवढ्या क्षेत्रावरील ऊस गाळपासाठी उपलब्ध होऊ शकणार आहे. गतवर्षीच्या तुलनेत ६० हजार ९६१ हेक्टर एवढे उसाचे क्षेत्र कमी झाले आहे. त्यामुळे यंदा ऊस कमी पडणार असल्याने नांदेड विभागातील साखर कारखान्यांचे गाळप हंगाम कमी कालावधीचे राहतील. 
 


इतर ताज्या घडामोडी
मराठवाड्यात पावसाचा जोर कमीऔरंगाबाद  : मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांत...
बियाण्यांच्या अडीच हजारांवर तक्रारींची...बीड : उगवण न झाल्याने दुबार पेरणीचे संकट...
नांदेड जिल्ह्यासाठी खरीप पीकविमा योजना...नांदेड : जिल्ह्यात यंदासाठी (२०२०-२१) खरीप हंगाम...
सततच्या खंडित वीजपुरवठ्याने माळीनगर...माळीनगर, जि. सोलापूर : वारंवार खंडित...
अत्यावश्यक वेळीच रासायनिक तणनियंत्रक...हिंगोली : ‘‘शेतकऱ्यांनी तणनियंत्रणासाठी केवळ...
सांगली जिल्ह्यातील प्रकल्पांत गेल्या...सांगली : जिल्ह्यात मध्यम व लघू ८४ प्रकल्पांची...
कृषिपंपांना दिवसा वीजपुरवठ्यासाठी...रत्नागिरी  : अनिश्‍चित पावसाचा हंगाम लक्षात...
`म्हैसाळ’ची कामे १५ ऑगस्टपूर्वी पूर्ण...सोलापूर  : म्हैसाळ योजनेतून सांगोला,...
काथ्या उद्योगातून कोकणाच्या विकासाला...नाशिक  : जगात भारत नारळ उत्पादनात आघाडीवर...
बियाणे बदलून देण्याच्या आदेशाची...अकोला  ः या हंगामात लागवड केलेल्या सोयाबीन...
मराठा आरक्षणाबाबत उपसमितीची वरिष्ठ...मुंबई : मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन प्रकरणांच्या...
शेती नियोजनातून साधावा आर्थिक प्रगतीचा...नागपूर  : शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीसोबतच...
भाजपची प्रदेश कार्यकारिणी जाहीरमुंबई : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील...
राज्यात चांगल्या पावसाचा अंदाजभारतीय हवामान शास्त्र विभागाच्या कृषी मोसम...
पुणे जिल्हा परिषदेची मागासवर्गीय...पुणे  : पुणे जिल्ह्यातील मागासवर्गीय...
नगरमध्ये १८ हजार हेक्टरवर उडदाची पेरणीनगर  ः नगर जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
औरंगाबादमध्ये बटाटा १००० ते २००० रुपये...औरंगाबाद  : येथील कृषी उत्पन्न बाजार...
आरोग्यदायी हिंगआपल्या रोजच्या स्वयंपाकात पदार्थ करताना फोडणीसाठी...
अकोला जिल्ह्यात जूनमध्ये सरासरीपेक्षा...अकोला  ः यंदाच्या हंगामात मृग नक्षत्रात...
खानदेशात कांदा रोपवाटिकांची संख्या वाढलीजळगाव  ः खानदेशात यंदा रोपवाटिकांची संख्या...