सांगलीत २८ टक्क्यांवरच ऊस लागवड

सांगली : जिल्ह्यात गेल्या आठवड्यापूर्वी झालेल्या पावसाने ऊस लागवडीची गती मंदावली आहे. जिल्ह्यात उसाचे सरासरी क्षेत्र ७१ हजार हेक्टर आहे. त्यापैकी १९ हजार ९२१ हेक्टरवर म्हणजे २८ टक्के इतकी लागवड झाली आहे.
Sugarcane cultivation in Sangli at 28% only
Sugarcane cultivation in Sangli at 28% only

सांगली :  जिल्ह्यात गेल्या आठवड्यापूर्वी झालेल्या पावसाने ऊस लागवडीची गती मंदावली आहे. जिल्ह्यात उसाचे सरासरी क्षेत्र ७१ हजार हेक्टर आहे. त्यापैकी १९ हजार ९२१ हेक्टरवर म्हणजे २८ टक्के इतकी लागवड झाली आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली. 

जिल्ह्यात प्रामुख्याने वाळवा, मिरज, पलूस, कडेगाव तालुक्यात आडसाली उसाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. आटपाडी, जत, कवठेमहांकाळ आणि तासगाव तालुक्यात पूर्व आणि सुरु हंगामातील ऊस लागवड करण्याचा कल अधिक आहे. जत तालुक्यात १०७ हेक्टर, आटपाडी तालुक्यात १३० हेक्टर, खानापूर तालुक्यात ५१५ हेक्टरवर उसाची लागवड झाली आहे. 

गेल्या आठवड्यात जिल्ह्यातील विविध भागात पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांनी ऊस लागवड थांबवली आहे. गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे ऊस लागवडीचे नियोजन शेतकरी करु लागले आहेत. ऑक्टोंबरअखेर आडसाली उसाच्या लागवडी पूर्ण होतील. त्यानंतर पूर्व हंगामातील लागवडीस प्रारंभ होईल.

साधारणपणे नोव्हेंबर आणि डिसेंबरअखेर या हंगामातील ऊस लागवडी आटोपतील. त्यानंतर डिसेंबर आणि जानेवारी अखेरपर्यंत सुरु हंगामातील ऊस लागवड संपतील, असा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला. कवठेमहांकाळ तालुक्यात नोंद नाही.

कवठेमहांकाळ तालुका तसा दुष्काळी आहे. तरीही या तालुक्यात महांकाली सहकारी साखर कारखाना उभा राहिला. म्हैसाळचे पाणी तालुक्यात फिरले. त्यामुळे उसाची लागवड झाली. त्यामुळे शेतकऱ्यांना याचा फायदा झाला. वास्तविक पाहता, गेल्यावर्षी हा कारखाना सुरु झाला नाही. तालुक्यात ४ हजार १७६ हेक्टरवरील ऊस गाळपासाठी तयार आहे. परंतु, आजअखेर या तालुक्यात एकाही हेक्टर क्षेत्रावर ऊस लागवड झालेली नसल्याची नोंद कृषी विभागाच्या पेरणी अहवालात आहे.

पावसामुळे ऊस लागवडी थांबल्या होत्या. आता लागवडी सुरु होतील. अजून पूर्व हंगामी आणि सुरु हंगामातील ऊस लागवड होणे बाकी आहे. सरासरी क्षेत्रापेक्षा ऊस लागवडीत वाढ होईल, असा प्राथमिक अंदाज आहे.  - सुरेश मगदमु, कृषी उप संचालक, सांगली.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com