उसाचे ३१ लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर जमा ः इंगोले

नांदेड: ‘‘महाराष्ट्र शुगर (जि. परभणी) या खासगी कारखान्याने २०१५-१६ मध्ये गाळप केलेल्या उसाचे पैसे दिले नव्हते. याबाबत शेतकऱ्यांनी चार वर्ष दिलेल्या प्रदीर्घ लढ्यानंतर गुरुवारी (ता. २२) ३८२ शेतकऱ्यांच्या खात्यावर ३१ लाख रुपये जमा झाले आहेत.
Sugarcane deposited in bank accounts of 31 lakh farmers: Ingole
Sugarcane deposited in bank accounts of 31 lakh farmers: Ingole

नांदेड : ‘‘महाराष्ट्र शुगर (जि. परभणी) या खासगी कारखान्याने २०१५-१६ मध्ये गाळप केलेल्या उसाचे पैसे दिले नव्हते. याबाबत शेतकऱ्यांनी चार वर्ष दिलेल्या प्रदीर्घ लढ्यानंतर गुरुवारी (ता. २२) ३८२ शेतकऱ्यांच्या खात्यावर ३१ लाख रुपये जमा झाले आहेत. ही टोकण रक्कम आहे, पूर्ण ‘एफआरपी’ शेतकऱ्यांना मिळवून देईपर्यंत संघर्ष सुरूच राहील,’’ असे ऊस दर नियंत्रण मंडळाचे माजी सदस्य प्रल्हाद इंगोले यांनी सांगितले. 

सोनखेड तालुक्यातील (जि. परभणी) महाराष्ट्र शुगर या खासगी कारखान्याने २०१५-१६ हंगामात नांदेड, परभणी, हिंगोली व लातूर जिल्ह्यातील ५०० शेतकऱ्यांच्या गाळप केलेल्या उसाचे पैसे दिले नाही. यानंतर हा कारखाना परस्पर विकला गेला. त्यामुळे शेतकऱ्यांना पैसे मिळण्याची शक्यता धूसर झाली होती.

कारखान्यावर जप्तीची कारवाई झाली. अनेक वेळा लिलाव करण्यात आले. परंतु, शेतकऱ्यांना पैसे मिळत नव्हते. रेकॉर्डनुसार ४५९ शेतकऱ्यांचा ऊस गेला. त्यापैकी ३८२ शेतकऱ्यांच्या खात्यांवर ३१ लाख रुपये जमा करण्यात आले. पैसे मिळाले नसल्याच्या तक्रारदारांपैकी  ७६ शेतकऱ्यांचे पैसे सस्पेन्समध्ये ठेवण्यात आले. 

महाराष्ट्र शुगर कारखान्याकडील थकीत एफआरपी प्रदीर्घ लढ्यानंतर मिळाला आहे. यानंतर शिल्लक एफआरपी व विलंब व्याजाची रक्कमही वसूल करू. भाऊराव चव्हाण कारखान्याकडे असलेले व्याज व थकीत बाकी वसूल करणार आहोत. - प्रल्हाद इंगोले, याचिकाकर्ते, नांदेड

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com