नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर संचलनाद्वारे कृषी कायद्यांविरोधात शक्तीप्रदर्शनावर
बातम्या
उसाचे ३१ लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर जमा ः इंगोले
नांदेड : ‘‘महाराष्ट्र शुगर (जि. परभणी) या खासगी कारखान्याने २०१५-१६ मध्ये गाळप केलेल्या उसाचे पैसे दिले नव्हते. याबाबत शेतकऱ्यांनी चार वर्ष दिलेल्या प्रदीर्घ लढ्यानंतर गुरुवारी (ता. २२) ३८२ शेतकऱ्यांच्या खात्यावर ३१ लाख रुपये जमा झाले आहेत.
नांदेड : ‘‘महाराष्ट्र शुगर (जि. परभणी) या खासगी कारखान्याने २०१५-१६ मध्ये गाळप केलेल्या उसाचे पैसे दिले नव्हते. याबाबत शेतकऱ्यांनी चार वर्ष दिलेल्या प्रदीर्घ लढ्यानंतर गुरुवारी (ता. २२) ३८२ शेतकऱ्यांच्या खात्यावर ३१ लाख रुपये जमा झाले आहेत. ही टोकण रक्कम आहे, पूर्ण ‘एफआरपी’ शेतकऱ्यांना मिळवून देईपर्यंत संघर्ष सुरूच राहील,’’ असे ऊस दर नियंत्रण मंडळाचे माजी सदस्य प्रल्हाद इंगोले यांनी सांगितले.
सोनखेड तालुक्यातील (जि. परभणी) महाराष्ट्र शुगर या खासगी कारखान्याने २०१५-१६ हंगामात नांदेड, परभणी, हिंगोली व लातूर जिल्ह्यातील ५०० शेतकऱ्यांच्या गाळप केलेल्या उसाचे पैसे दिले नाही. यानंतर हा कारखाना परस्पर विकला गेला. त्यामुळे शेतकऱ्यांना पैसे मिळण्याची शक्यता धूसर झाली होती.
कारखान्यावर जप्तीची कारवाई झाली. अनेक वेळा लिलाव करण्यात आले. परंतु, शेतकऱ्यांना पैसे मिळत नव्हते. रेकॉर्डनुसार ४५९ शेतकऱ्यांचा ऊस गेला. त्यापैकी ३८२ शेतकऱ्यांच्या खात्यांवर ३१ लाख रुपये जमा करण्यात आले. पैसे मिळाले नसल्याच्या तक्रारदारांपैकी ७६ शेतकऱ्यांचे पैसे सस्पेन्समध्ये ठेवण्यात आले.
महाराष्ट्र शुगर कारखान्याकडील थकीत एफआरपी प्रदीर्घ लढ्यानंतर मिळाला आहे. यानंतर शिल्लक एफआरपी व विलंब व्याजाची रक्कमही वसूल करू. भाऊराव चव्हाण कारखान्याकडे असलेले व्याज व थकीत बाकी वसूल करणार आहोत.
- प्रल्हाद इंगोले, याचिकाकर्ते, नांदेड