agriculture news in marathi, sugarcane factories boilers will stop soon, pune, maharashtra | Agrowon

साखर कारखान्यांचे बॉयलर लवकर थंडावणार
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 24 जानेवारी 2019

पुणे  : दुष्काळी स्थितीमुळे साखर कारखान्यांचे बॉयलर यंदा लवकर म्हणजे फेब्रुवारीपासून बंद होण्यास सुरूवात होईल, असा अंदाज साखर उद्योगातील सूत्रांनी व्यक्त केला आहे. 

पुणे  : दुष्काळी स्थितीमुळे साखर कारखान्यांचे बॉयलर यंदा लवकर म्हणजे फेब्रुवारीपासून बंद होण्यास सुरूवात होईल, असा अंदाज साखर उद्योगातील सूत्रांनी व्यक्त केला आहे. 

वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचे (विस्मा) अध्यक्ष बी. बी. ठोंबरे म्हणाले, की आर्थिक क्षमता घटल्याने अतिशय नाजूक स्थितीतून कारखाने जात आहेत. दुष्काळामुळे हंगाम रेटत नेत १५ ते २८ फेब्रुवारीदरम्यान गाळप संपविण्याचे नियोजन मराठवाड्यातील कारखान्यांचे आहे. १ ते १५ मार्चच्या दरम्यान सोलापूर आणि नगर भागातील हंगाम संपेल. पश्चिम महाराष्ट्रातील बहुतेक कारखाने मार्चअखेर बंद होतील.
राज्यात यंदा गेल्या हंगामाच्या तुलनेत साखर उत्पादन घटण्याचा साखर उद्योगाचा अंदाज आहे. ‘‘गेल्या हंगामात राज्यात १०७ लाख टन साखर  तयार झाली. यंदा उत्पादन १७ लाख टनांनी घटून ९० लाख टनाच्या आसपास राहिल. देशाचे उत्पादन देखील गेल्या हंगामाच्या तुलनेत २५ लाख टनांनी घटून ३०० लाख टनांच्या आसपास राहील,’’ असे श्री.ठोंबरे यांनी स्पष्ट केले. 

‘‘अतिरिक्त साखरेचा साठा असूनही निर्यातीसाठी राज्य शासन अजिबात पुढे येण्यास तयार नाही. राज्य सरकार केवळ घोषणाबाजी करते. प्रत्यक्षात उद्योगाला मदत करीत नाही. त्यामुळेच शेतकरी आणि कारखाने अडचणीत आहेत,’’ असे मत श्री. ठोंबरे यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर म्हणाले, की दुष्काळामुळे राज्याचे साखर उत्पादन अंदाजापेक्षा कमी राहील. कारखाने देखील लवकर बंद होतील. टॅंकरने पाणी आणून मराठवाड्यात काही ठिकाणी गाळप पूर्ण करण्याचे काम कारखाने करीत आहेत. फेब्रुवारीपासून मराठवाड्यातील कारखाने एकापाठोपाठ बंद होत जातील. एका बाजूला दुष्काळाचा फटका व दुस-या बाजूला एफआरपीची समस्या अशा दुहेरी कात्रीत कारखाने आहेत. साखर निर्यातीसाठी राज्य सरकारने पुढाकार न घेतल्याबद्दल सहकारी कारखान्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ‘‘केंद्राकडून एक हजार रुपये व राज्याकडून २०० रुपये प्रतिक्विंटल मदत मिळाल्यास जादा साखर साठ्यांची समस्या दूर होईल. जवळच्या आशियाई देशांना साखर निर्यात झाल्यास साठे कमी होतील. मात्र, त्यासाठी गप्प बसलेल्या राज्य सरकारला पुढाकार घ्यावा लागेल,’’ असेही श्री.दांडेगावकर यांचे म्हणणे आहे.

इतर अॅग्रो विशेष
राज्य बॅंकेच्या दारात जिल्हा बॅंकांचे...सोलापूर : राज्यात १९७२ ची आठवण करून देणारा भयावह...
विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी...पुणे  : कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मध्य...
पूर संकटाचा नव्याने अभ्यास पुणे  : कृष्णा व भीमा खोऱ्यात यंदा आलेल्या...
शेतजमीन मोजणीचा गोंधळ सुरूचपुणे : ड्रोनच्या माध्यमातून गावांचे डिजिटल नकाशे...
तंत्रज्ञानाच्या अतिरेकी वापराने शेतकरी...नागपूर ः ‘संकरित बियाण्यांचा करा पेरा, लक्ष्मी...
जलसमस्येच्या आढाव्यासाठी औरंगाबादेत...औरंगाबाद  : मराठवाडा आणि संपूर्ण...
कृषिसेवक भरती प्रक्रियेवरील बंदी...अकोला ः कृषी खात्याने १४१६ जागांसाठी राबवलेल्या...
यंदा ५० साखर कारखाने बंद राहण्याची...पुणे ः राज्यातील उसाचे क्षेत्र आधीच्या...
पन्नास लाख शेतकऱ्यांच्या खात्यात २४...मुंबई : शेतकऱ्यांना दुष्काळाच्या चक्रातून बाहेर...
कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात तुरळक...पुणे  : ओडिशाच्या किनाऱ्यालगत तयार झालेल्या...
झाडांच्या गोलाईच्या आकारानुसार...पुणे: दुष्काळावर मात करण्यासाठी शेतातील आणि...
राज्य बँक घोटाळाप्रकरणी दोषींवर कारवाई...जळगाव  ः महाराष्ट्र राज्य सहकारी बँक...
पीकविमा योजनेतील झारीतील ...मुंबई : शेतकऱ्यांसाठीच्या पीकविमा योजनेवरून...
मध्य प्रदेश भावांतर योजना बंद करणारनवी दिल्ली : शेतीमालाचे दर कमी झाल्यानंतर...
वाशीम बाजारपेठेत डंका मापारी यांच्या...वाशीम जिल्ह्यातील सोमठाणा येथील विश्वनाथ मापारी...
बोगस खतप्रकरणी ‘लोकमंगल’वर गुन्हापुणे : राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांना...
कोकण, विदर्भात पावसाची शक्यतापुणे : तापमानात झालेली वाढ आणि ढगाळ हवामान...
डाळी, प्रक्रिया उद्योगातील ‘यशस्विनी’...बोरामणी (ता. दक्षिण सोलापूर) परिसरातील तब्बल ८८५...